ITR Last Date 2025 In Marathi : तुम्ही ITR फाईल केलं आहे का
ITR Last Date 2025 In Marathi : इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै होती. आयकर विभागांना आर्थिक वर्ष 2024-25 साठी ही तारीख जाहीर केली होती. परंतु आता या तारखे मध्ये वाढ करण्यात आली आहे.
आता तुम्हाला आयटीआर 15 सप्टेंबर 2025 पर्यंत भरता येणार आहे. जर तुम्ही वेळेत रिटर्न भरला भरला नाही तर तुम्हाला दंड भरावा लागेल.
त्याचबरोबर तुरुंगवासासारख्या कार्यवाहीला देखील सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे प्रत्येकाने आयटीआर भरणे हे तितकेच महत्त्वाचे आहे.
कर विभागांना आर्थिक वर्ष 2024-25 म्हणजेच मूल्यांकन वर्ष 2025-26 साठी आयटीआर भरण्याची तारीख 31 जुलै वरून वाढवून ती आता 15 सप्टेंबर 2025 पर्यंत केली आहे.
कॅपिटल गेम टॅक्स मधील बदल नवीन टॅक्स स्लॅब व्यवस्था आधी आयटीआर फॉर्म मधील संरचनात्मक बदलांमुळे ही वाढ करण्यात आली आहे. यामुळे आयटीआर भरणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ITR Last Date 2025 परंतु वेळेत आयटीआर भरन हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. जर तुम्ही 15 सप्टेंबर पर्यंत आयटीआर भरला नाही तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल.
लेट फायलिंग फी
ITR Last Date 2025 विहित मुदतीत विवरण पत्र न भरल्यास प्राप्तिकर कायद्याच्या कलम 234 अंतर्गत लेट फायलिंग फी भरावी लागणार आहे. जर तुमचे एकूण कर पात्र उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर 5000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. पाच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या नागरिकांसाठी 1000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
महिन्याला 1 टक्के व्याजदर
ITR Last Date उशिरा विवरणपत्र भरल्यास कलम 234 अ अंतर्गत दरमहा एक टक्के व्याज आकारले जाईल. 15 सप्टेंबर 2025 नंतर आयटीआर दाखल होईपर्यंत किंवा महसूल विभागाकडून बेस्ट जजमेंट असेसमेंट होईपर्यंत दर महिन्याला व्याज आकारले जाईल किंवा काही भागावर हिरव्या जाकारले जाईल. या व्याजामुळे करदायित्वावर अतिरिक्त बोजा पडू शकतो.