Annual Fastag Pass information in marathi : 15 ऑगस्ट पासून वाहनांसाठी नवीन नियम लागू
Annual Fastag Pass : जर तुम्ही महामार्गावरून सतत प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय 15 ऑगस्ट पासून एक नवीन पास लॉन्च करत आहे. या पासच नाव आहे FASTag.
Annual Fastag Pass आज आपण हे फास्टैग पास कशी काढायची? याचा कुणाला फायदा होणार आहे? हे नक्की कशाची पास आहे? याची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
Fastag Annual Pass जर तुम्ही सतत महामार्गावरून प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे. भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिन म्हणजेच 15 ऑगस्ट 2025 पासून सरकार प्रवाशांसाठी एक नवीन पास घेऊन आले आहे.
15 ऑगस्ट पासून तुम्हाला टोल भरण्याची भरण्यासाठी कुठलाही त्रास होणार नाही. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने फास्टैग साठी एक नवीन वार्षिक पास सुरू करण्याची घोषणा केली आहे.
Fastag Annual Pass Price या पासची किंमत फक्त 3000 रुपये आहे. ही तुम्हाला राष्ट्रीय महामार्ग NH आणि राष्ट्रीय द्रुतगती महामार्ग NE वरील टोल प्लाजावर वर्षभर किंवा 200 टोल फ्री साठी वैद्य असेल. या दोन्हीपैकी जी अट आधी पूर्ण होईल तोपर्यंत तुमची तुमच्याजवळ असलेली पास काम करेल.
Fastag Annual Pass Price ही पास अशा प्रवाशांसाठी आहे जे वर्षातून सुमारे 200 वेळा महामार्गावरून प्रवास करतात. यामुळे त्यांना वारंवार टोल भरावा लागतो आणि जास्तीचे पैसे खर्च होतात. आता या पासमुळे त्यांना टोल भरावा लागणार नाही आणि चार्टचा त्रासही होणार नाही. ही पास कोणासाठी आहे आणि ही पास कशी मिळवायची हे आपण पाहूया.
कोण आहे पास साठी पात्र
Fastag Annual Pass
ही पास फक्त खाजगी कार, जीप आणि व्हॅन साठी लागू असेल.
व्यवसायिक वाहनांसाठी म्हणजेच ट्रक, टेम्पो यासाठी ही पास लागू नसेल.
ही पास फक्त राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI या हद्दीत येणाऱ्या टोल प्लाजा वर वैध असेल.
राज्य सरकार किंवा स्थानिक संस्थांच्या महामार्गावर ही पासच काम करणार नाही. तिथे तुम्हाला टोल भरावा लागेल.
कसा मिळवाल पास
Fastag Annual Pass
वार्षिक टोल पास खरेदी करण्यासाठी अत्यंत सोपी पद्धत आहे. तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने ही पास मिळवू शकता.
तुमच्याकडे तुमच्या खाजगी वाहनासाठी म्हणजेच कार, जीप किंवा व्हॅन वैद आणि कार्यान्वित फास्टैग असणे आवश्यक आहे. ही पास तुम्ही राजमार्ग यात्रा ॲप किंवा NHAI च्या www.nhai.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ही पास खरेदी करू शकता.
तुम्हाला 3000 रुपयांची रक्कम फास्टैग वॉलेट मधून किंवा त्याला जोडलेल्या बँक खात्यातून भरावी लागेल.
पेमेंट आणि पडताळणी झाल्यानंतर ही पास तुमच्या फास्टैगशी जोडला जाईल आणि 15 ऑगस्ट 2025 पासून ते आपोआप सक्रिय केले जाईल. त्यानंतर तुम्ही बिना टोलचा प्रवास करू शकता.