Raksha Bandhan 2025 Puja Vidhi, Shubh Muhurt : चला पाहूया रक्षाबंधनाचा मुहूर्त
Raksha Bandhan 2025 : भाऊ बहिणीचा प्रेम व्यक्त करण्याचं एक अतूट नातं आणि महत्त्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधन हा सण बहिण भावाच्या नात्यासाठी बनला गेला आहे. रक्षाबंधन या नावामध्येच सर्व काही मिळते.
Raksha Bandhan 2025 Puja Vidhi, Shubh Muhurt रक्षा म्हणजे राखण करणारा बंधन म्हणजे धागा, दोरा म्हणजेच रक्षण करणारा दोरा भावाच्या हातावर बहीण बांधते आणि प्रार्थना करते भाऊ देखील आपल्या बहिणीला काहीतरी भेटवस्तू देऊन तिला आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन देतो.
Raksha Bandhan 2025 In Marathi भावाबहिणीचा हा अतूट नात्याचा सण यावर्षी कधी आहे राखी बांधण्याचे मुहूर्त कोणते याची सविस्तर माहिती आपण आज या लेखाच्या माध्यमातून पाहूया.
Raksha Bandhan 2025 In Marathi यावर्षी 9 ऑगस्ट 2025 रोजी भावा बहिणीचा साजरा केला जाणार आहे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला दरवर्षी रक्षाबंधन हा सण अति उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी बहिण भावाला राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्याची, यशाची आणि सुरक्षिततेचे प्रार्थना करते. त्याला उत्तम आयुष्य लाभो अशी मनोकामना बहीण करते.
भाऊ देखील बहिणीला काहीतरी भेटवस्तू देऊन आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन देतो. परंतु राखी बांधताना काही नियम पायांना देखील आवश्यक आहे ते कोणते ते पाहूया.
राखी बांधताना अनेक वेळा बहिण धाग्याच्या तीन गाठी बांधतात हे आपण पाहिलं असेल पण या तीन गाठीच महत्त्व काय. धार्मिक आणि भावनिक महत्त्व आहे या तीन गाठीच. या गाठी केवळ एक समारंभाचा भाग नसून त्या त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानला जातात.
पहिली गाठ ब्रह्मदेवाला समर्पित असते जे सृष्टीचे निर्माता मानले जातात. या गाठी मुळे जीवनात सकारात्मकतेची सुरुवात होते. दुसरी गाठ भगवान विष्णूंना अर्पण केली जाते. जे पालन करते आहे. त्यामुळे भावाच्या रक्षणासाठी त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी ही गाठ दुसरी गाठ बांधली जाते आणि तिसरी गाठ महादेवांना समर्पित आहे हे शिवशक्तीचे प्रतीक असून वाईट शक्तींपासून रक्षण आणि जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी तिसरी गाठ बांधली जाते.
Rakhi Tradition यामुळे रक्षाबंधनच्या दिवशी बहिण भावाला राखी बांधताना बहिणीने राखीच्या तीन गाठी बांधणे आवश्यक आहे. त्याचबरोबर बहिण भावाच्या नात्यातील या राखीच्या तीन गाठी म्हणजेच प्रेम, विश्वास आणि संरक्षण या तीन मूल्यांचे ही प्रतीक माणल्या जातात. राखीचा धागा हा एक परंपरा नसून त्यामागे बहिण भावाच्या भावना आणि नात्याचे गुढ अर्थ दडलेला आहे.
रक्षाबंधन शुभ मुहूर्त
Raksha Bandhan 2025 Puja Vidhi, Shubh Muhurt
Rakshabandhan 2025 श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीला रक्षाबंधन साजरा केला जातो. यावेळी पौर्णिमा तिथी ८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी 2 वाजून 12 मिनिटांनी सुरू होणार आहे. तर 9 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजून 21 मिनिटापर्यंत तिथी समाप्त होणार आहे. परंतु उदय तिथीनुसार 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे.
भद्रकाळ आहे की नाही
Rakshabandhan 2025 शास्त्रानुसार भद्रकाळात राखी बांधणे अशुभ मानले जाते. त्यामुळे या काळात भावाला राखी बांधू नाही परंतु यावर्षी रक्षाबंधनाच्या काळात भद्राचे सावट नाही त्यामुळे कोणतीही चिंता करण्याची गरज नाही तुम्ही दिवसभरात कधीही रक्षाबंधनाचा सण साजरा करू शकता.
भद्रकाळात राखी का बांधू नये
2025 Raksha Bandhan पौराणिक मान्यतेनुसार भद्रा भगवान सूर्य आणि त्यांची पत्नी छाया यांची कन्या आहे. शनि देवाची बहीण आहे. मान्यतेनुसार भद्रकाळामध्ये राखी न बांधण्यामागे एक आख्यायिका आहे. त्यानुसार लंकेचा राजा रावणाला भद्रकाळात त्याच्या बहिणीने राखी बांधली होती. Rakhi Tradition
2025 Raksha Bandhan भद्रकाळामध्ये राखी बांधल्यामुळे रावणाचा नाश झाला. अशा स्थितीत या श्रद्धेच्या आधारे जेव्हा जेव्हा भद्रकाळ लागतो तेव्हा बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधत नाहीत. भद्रकाळ लोटल्यानंतर राखी बांधता येते. परंतु यावर्षी कोणताही भद्रकाळ नसल्यामुळे तुम्हाला कोणतीही चिंता करण्याची गरज नाही.