HSRP number plate Registration Deadline : HSRP नंबर प्लेट न बसवल्यास 10,000 रुपयांचा दंड
HSRP number plate Registration Deadline : राज्यातील सर्व वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सर्व वाहनधारकांना HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य केले आहे. जर तुमच्या वाहनाला HSRPनंबर प्लेट बसवले नसेल तर तुम्हाला आता दंड भरावा लागणार आहे.
HSRP number plate बसवण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट आहे. त्यासाठी केवळ आता एक दिवस बाकी आहे. तुम्हाला फक्त एका दिवसात HSRP नंबर प्लेट बसवून घ्यावी लागणार आहे. असे न केल्यास तुमच्या गाडीसाठी तुम्हाला 10,000 रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो.
HSRP number plate Registration Deadline एचएसआरपी म्हणजेच हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट ही नंबर प्लेट देशातील सर्व वाहनांना बसवावी लागणार आहे. परंतु 2019 नंतरच्या वाहनांसाठी ही नंबर प्लेट आधीच बसवण्यात आली आहे. त्या आधीच्या सर्व वाहनांसाठी नंबर प्लेट तुम्हाला बसवून घ्यावी लागणार आहे असे निर्देश सरकारने जारी केले आहेत.
HSRP number plate update important news आतापर्यंत अनेकांचे नंबर प्लेट बसवून झाले आहे. परंतु अनेक नागरिक असे आहेत ज्यांची अजूनही HSRP number Plate बसवायची राहिली आहे. त्यांच्यासाठी फक्त शेवटचा एक दिवस उरलेला आहे, कारण की आता कोणत्याही प्रकारची मुदतवाढ यामध्ये होणार नाहीये.
जर तुम्ही HSRP नंबर प्लेट बसवली नाही तर तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. तुम्हाला 10,000 रुपयांचा दंड यासाठी भरावा लागेल जर 15 ऑगस्ट नंतर कोणतेही वाहन HSRP नंबर प्लेट शिवाय दिसले तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे.
यादरम्यान तुम्ही 15 ऑगस्ट पूर्वी रजिस्ट्रेशन केले असेल आणि तुमच अपॉइंटमेंट नंतरची असेल तर त्यासाठी तुम्हाला कोणताही दंड भरण्याची आवश्यकता नाही.
कशी बसवाल नंबर प्लेट
How To Install HSRP Number Plate
HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
तिथे जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल.
तुमची संपूर्ण माहिती भरावी लागेल.
गाडीचा आरसी नंबर आणि इतर माहिती द्यावी लागेल.
त्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळचे सेंटर निवडावे लागेल.
त्यानंतर जे शुल्क आकारले आहे ते भरावे लागेल.
त्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट ची तारीख समजेल.
त्यानंतर अपॉइंटमेंटच्या दिवशी तुम्ही तेथे जाऊन तुमच्या गाडीचे नंबर प्लेट बसवावी लागेल.