Ladki Bahin Yojana News In Marathi : कोणाचा अर्ज होणार रद्द
Ladki Bahin Yojana News In Marathi : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत एका कुटुंबातील केवळ 2 महिलांना लाभ मिळणार आहे. जर 2 पेक्षा अधिक महिला लाभ घेत असतील तर त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत.
Ladki Bahin Yojana News त्यांना इथून पुढील महिन्यात पैसे मिळणार नाहीत. यासाठी आता महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. यातून अनेक महिलांच्या अर्ज बात केले जाणार आहेत.
Ladki Bahin Yojana News दोन पेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर त्यांचे अर्ज बाद केले जातील. एका कुटुंबातील फक्त 2 महिलांनाच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे.
परंतु आता हा लाभ नक्की कोणत्या महिलेला द्यायचा आणि कोणत्या महिलेचा लाभ बंद करायचा हे कसे ठरवणार यावर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
या दरम्यान आता कोणत्या महिलांना लाभ द्यायचा आणि कोणाला नाही हे ठरवण्याचा अधिकार कुटुंबप्रमुखाला देण्यात येणार आहेत. मात्र यामुळे कुटुंबात तणावाचे वातावरण सुरू आहे.
अंगणवाडी सेविका करणार पडताळणी
अंगणवाडी सेविका महिलांच्या घरोघरी जाऊन अर्जाची पडताळणी करणार आहेत. या योजनेतून 26 लाख महिला अपात्र असल्याचे समोर आले आहे. प्रत्येक जिल्ह्यातील अपात्र महिलांच्या घरी जाऊन त्यांना काही प्रश्न विचारण्यात येतील.
Ladki Bahin Yojana जसे की तुमचे वार्षिक उत्पन्न किती ?, तुमच्या घरात कोणी सरकारी कर्मचारी आहे का ?, तुमच्या घरात चार चाकी वाहन आहे का ? असे अनेक प्रश्न विचारले जातील.
त्यावरून महिलांना पात्र किंवा अपात्र ठरवले जाईल. यासोबतच एका कुटुंबातील किती महिला या योजनेचा लाभ घेतात याची पडताळणी केली जाणार आहे.
किती महिलांचे अर्ज बाद
लाडकी बहीण योजनेतून Ladki Bahin Yojana आतापर्यंत जवळपास 42 लाख महिलांचे अर्ज रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांना सरसकट पैसे दिले जात होते. मात्र आता लाखो महिलांचे अर्ज बाद केले जात आहेत.
छत्रपती संभाजीनगर मधील एकूण 1 लाख 4 हजार महिलांच्या अर्ज बाद केले आहेत, तर साताऱ्यातील 84 हजार महिलांच्या अर्ज बाद करण्यात आले आहेत. इतर जिल्ह्यातील किती महिलांचे अर्ज बाद झाले याबाबत माहिती समोर आलेली नाही.