Gyan Bharatam Yojana 2025 In Marathi : ज्ञान भारतम योजना म्हणजे काय?

Gyan Bharatam Yojana 2025 In Marathi : मोदींनी केली नव्या योजनेची घोषणा

Gyan Bharatam Yojana 2025 In Marathi : केंद्र सरकारकडून अनेक जनकल्याणकारी योजना राबवल्या जातात. या योजनेच्या माध्यमातून महिला सशक्तीकरण असेल, शेतकऱ्यांचा विकास असेल किंवा तरुणांना रोजगार देण्याच्या योजना असते यामुळे देशभरातील नागरिकांना मोठा लाभ होत आहे.

Gyan Bharatam Yojana In Marathi केंद्र सरकारने ‘ज्ञान भारतम’ Gyan Bharatam Yojana ही योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून दुर्लक्षित राहिलेल्या जुन्या हस्तलिखित आणि कागदपत्रे आता डिजिटल स्वरूपात रूपांतरित करून नवीन पिढीसाठी जतन केली जाणार आहेत. अशी घोषणाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणाच्या वेळी केली आहे.

Gyan Bharatam Yojana 2025 स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. या घोषणा पैकीच एक महत्त्वाची घोषणा म्हणजे ‘ज्ञान भारतम’ Gyan Bharatam योजना सुरू करण्याची आहे. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील जुन्या हस्तलिखिते आणि कागदपत्राची माहिती डिजिटल स्वरूपात जतन केली जाणार आहे.

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गेल्या अनेक काळापासून दुर्लक्षित असलेल्या पुरातन हस्तलिखिते आणि कागदपत्राचे डिजिटलायझेशन करण्यात येणार आहे.

‘ज्ञान भारतम’ योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे जुनी पुरातन हस्तलिखिते भावी पिढ्यांसाठी जतन केली जाणार आहेत. यामुळे नवीन पिढ्यांना आपल्या संस्कृतीची माहिती या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मिळेल.

What Is Gyan Bharatam Yojana भारत देशामध्ये भाषिक विविधता खूप मोठी आणि अमूल्य आहे. आपण मराठी, असामी, बंगाली, पाली आणि प्राकृत यांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. आपल्या भाषा जितक्या समृद्ध असतील तितक्यात ज्ञान प्रणाली मजबूत राहणार आहेत.

या युगात एक जागतिक शक्ती आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून बोलताना सांगितले. पुढे बोलताना मोदी म्हणाले की, आपल्याला याचा अभिमान असला पाहिजे आणि त्याच्या विकासासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे.

जुनी हस्तलिखिते यांनी कागदपत्रे दुर्लक्षित आहेत. आपण ती या योजनेच्या माध्यमातून डिजिटलायझेशन करत आहोत. याचा फायदा येणाऱ्या अनेक पिढ्यांना होत राहणार आहे.

लाल किल्ल्यावरून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील तरुणांना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील स्वदेशी सोशल मीडिया ऑपरेटिंग सिस्टीम आणि इतर प्लॅटफॉर्म विकसित करण्याचे आव्हान केले आहे.

Gyan Bharatam Scheme ऑपरेटिंग सिस्टिम च्या माध्यमातून सायबर सुरक्षा डीप फेक पासून आर्टिफिशियल इंटिरिएशन पर्यंत सर्व गोष्टी आपल्या स्वतःच्या असाव्यात यावर आपण स्वतःच्या लोकांच्या क्षमता एकत्रित केल्या पाहिजे असे पंतप्रधान म्हणाले.

21 वे शतक हे तंत्रज्ञानावर आधारित असणार आहे आणि तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवलेल्या देशांनी विकासाची उंची ओलांडली आहे. त्यामुळे आपणही तंत्रज्ञानामध्ये मागे न राहता अधिक काम करण्याची गरज असल्याचेही पंतप्रधान म्हणाले.