Ration Card KYC 2025 : तुमचेही रेशन कार्ड बंद झाले का?
Ration Card KYC केंद्र सरकारकडून देशातील रेशन कार्डचे ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र अनेकांनी आजपर्यंत ई-केवायसी केलेली नाही त्यामुळे राज्यातील तब्बल 1.5 लाख रेशन कार्ड बंद होणार आहेत.
Ration Card KYC राज्यातील रेशन कार्डधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. त्यानुसार तुम्ही जर आतापर्यंत आपल्या रेशन कार्डची केवायसी केली नसेल तर तुमचे कार्ड बंद होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला ई केवायसी करणे बंधनकारक आहे. जर तुम्ही केवायसी केली नसेल तर तुमचा धान्य पुरवठा बंद होणार आहे. यासाठी अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने पाऊल उचलले आहेत.
1.5 लाख लाभार्थींची कार्ड होणार बंद?
Ration Card KYC Stop
Ration Card KYC केंद्र सरकारकडून रेशन कार्डची केवायसी करणे बंधनकारक केलेले असतानाही अनेक कार्डधारकांनी आतापर्यंत ई-केवायसी केली नाही. अशा ग्राहकांचे रेशन कार्ड बंद होणार आहे. त्यामुळेही केवायसी करणे आवश्यक आहे. याचा फटका ई-केवायसी न करणाऱ्या ग्राहकांना होणार आहे.
केंद्र सरकारकडून देशातील गरीब नागरिकांना मोफत धान्य वितरित केले जाते. त्यासाठी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. मात्र अनेकांचे रेशन कार्ड ई-केवायसी न केल्यामुळे बंद होणार असल्यामुळे चिंता वाढली आहे. प्रत्येक लाभार्थी व्यक्तीला केवायसी करणे अनिवार्य केलेले आहे.
केवायसी न केल्यास काय होणार
केंद्र आणि राज्य सरकारकडून देशातील नागरिकांना म्हणजेच रेशन कार्ड धारकांना ई केवायसी करण्यासाठी आव्हान केले जात आहे. मात्र एवढे करूनही अनेक रेशन कार्ड धारकांनी आपली ई-केवायसी पूर्ण केलेली नाही अशा लाभार्थ्यांना आता फटका बसू शकतो.
कारण ज्यांनी ई-केवायसी केली नाही त्यांचे नाव रेशन कार्ड यादीतून वगळले जाणार आहे आणि त्यांना धान्य देखील मिळणार नाही. त्यांना भविष्यात अनेक अडचणीचा सामना करावा लागू शकतो