Shree Ganesh Chaturthi 2025 Date Shubh Muhurt In Marathi : गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी?

Shree Ganesh Chaturthi 2025 Date Shubh Muhurt In Marathi : गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया

Shree Ganesh Chaturthi 2025 Date Shubh Muhurt In Marathi : दरवर्षी देशभरासह महाराष्ट्र मोठ्या उत्साहात लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होत असते. गणपती बाप्पाची प्रतीक्षा अनेक दिवसापासून भक्त करत असतात. विद्येचा देवता, नशिबाला पावणारा गणपती अशी त्याची ओळख आहे.

Shree Ganesh Chaturthi Shubh Muhurt In Marathi दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपती बाप्पाचे दिमाखात आगमन होणार आहे. यंदा 27 ऑगस्ट रोजी गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत. मात्र गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्त कधी आहे? हे अनेकांना माहीत नसते चला तर मग जाणून घेऊया.

Shree Ganesh Chaturthi 2025 Shubh Muhurt बुद्धीचा देवता म्हणून गणेशाचे वंदन केले जाते. हिंदू परंपरेनुसार चातुर्मासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या काळात वर्तव्य केले जातात. श्रावण महिना म्हणजे उपवासाचा महिना म्हणून संबोधले जाते. श्रावणामध्ये कृष्णअष्टमी श्री कृष्ण जयंती आणि गोपाळकाला झाल्यानंतर सर्वांना वेद लागतात ते लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे.

खरे तर श्रावण सुरू झाला कीच आपल्या गणपती बाप्पाचे वेद सर्वांना लागतात. तर श्रीकृष्ण जन्माष्टमी नंतर याला अधिक वेग येतो. गणपती बाप्पाच्या नामस्मरणाने चैतन्यमय ऊर्जेचा संचार होत असतो. हिंदू धर्मामध्ये कोणत्याही कार्याची सुरुवात करताना प्रथम गणपती बाप्पाला स्मरण केले जाते. यंदा 27 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे.

देशभरासह महाराष्ट्रात गणेश उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विशेष करून महाराष्ट्रामध्ये याला अधिक महत्त्व आहे. बुद्धीची देवता, विघ्नहर्ता, सुखकर्ता 14 विद्याचा आणि 64 कलाचा अधापती असलेल्या गणपतीचे पूजन या महिन्यात केले जाते.

महाराष्ट्राच्या प्रत्येक घरामध्ये गणेशाची मूर्ती स्थापन केली जाते. गणपतीचे आवडीचे मोदक, लाडू केले जातात. लहानापासून ते मोठ्या पर्यंत गणपती उत्सवाचे मोठे अप्रूप असते. सर्वजण मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा करतात.

Shree Ganesh Chaturthi 2025 Date Shubh Muhurt In Marathi

गणेश चतुर्थी बुधवार 27 ऑगस्ट 2025
भाद्रपद शुद्ध चतुर्थी प्रारंभ मंगळवार 26 ऑगस्ट 2025 दुपारी 1 वाजून 54 मिनिटांनी
भाद्रपद शुद्ध चतुर्थी समाप्ती बुधवार 27 ऑगस्ट 2025 दुपारी 3 वाजून 43 मिनिटांनी
राहू काळ बुधवार 27 ऑगस्ट 2025 दुपारी 12 ते दुपारी 1 वाजून 30 मिनिटापर्यंत

भारतीय पंचांगानुसार सूर्योदयाची स्थिती मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे श्री गणेश चतुर्थी गणपती प्राणप्रतिष्ठा पूजा 27 ऑगस्ट रोजी आहे. 27 ऑगस्ट पासून गणेश उत्सवाला सुरुवात होणार आहे आणि 6 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे. या दिवशी गणेश उत्सवाची सांगता होईल. गणपती बाप्पाला बुद्धीची देवता मानले जाते.

गणपती पूजनाचे महत्त्व

यंदा गणपती बाप्पाचे आगमन 27 ऑगस्ट रोजी म्हणजेच बुधवारी होणार आहे. साधारणपणे मंगळवारी गणपतीचे पूजन नामस्मरण करायला प्राधान्य दिले जाते. याबरोबर बुधवारी केलेल्या विशेष गणपती पूजन, भजन, नामस्मरण यालाही खूप महत्त्व आहे.

गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर प्रसाद म्हणून लाडू, मोदक, पेढा आदिचा नैवेद्य दाखवला जातो. बाप्पाला आवडणाऱ्या गोष्टी अर्पण केल्या जातात. याबरोबरच गणपती बाप्पाचा “ओम गण गणपतये नमः” हा मंत्र 108 वेळा किंवा तुम्हाला जेवढे शक्य असेल तितक्या वेळा म्हणावा.

गणपती पूजनाच्या वेळेस लाल फुल आणि दुर्वा गणपतीला व्हाव्या कारण दुर्वाहिल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्याही लागत नाही अशी मान्यता आहे.