New Ration Card Online Process In Marathi : असे काढा ऑनलाईन रेशन कार्ड

New Ration Card Online Process In Marathi : जाणून घ्या सोपी प्रोसेस

New Ration Card Online Process In Marathi : आज अनेक कामे करण्यासाठी रेशन कार्ड आपल्या जवळ असणे खूप गरजेचे झाले आहे. आधार कार्ड प्रमाणेच रेशन कार्डचाही वापर अनेक ठिकाणी केला जात आहे. मात्र आता तुम्ही ते ऑनलाईनही काढू शकता.

New Ration Card Online Process याबरोबरच तुम्ही आता नवीन रेशन कार्ड, नावे वगळण्याची समाविष्ट करण्याची, रेशन बाबत कोणती तक्रार करण्याची सुविधा ऑनलाईन उपलब्ध झालेली आहे.

New Ration Card आता जर तुम्हालाही नवीन रेशन कार्ड काढायचे असल्यास तुम्ही ते ऑनलाइन काढू शकता. कसे ते आपण आज पाहूया. नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी अर्ज कसा करावा.

आवश्यक कागदपत्रे

New Ration Card Document

  • ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र इत्यादी
  • पत्त्याचा पुरावांमध्ये तुम्ही विज बिल, भाड्याचा करार, आधार कार्ड इत्यादीचा वापर करू शकता
  • उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे
  • कुटुंबातील सदस्यांचे फोटो असणे आवश्यक आहेत
  • इतर आवश्यक कागदपत्रे जसे की राशन कार्ड असल्यास ते रद्द केल्याचा दाखला वगैरे वगैरे

असा करा अर्ज

New Ration Card Online Process

  • सर्वात प्रथम तुम्ही अन्नपुरवठा विभागाच्या https:/ rcms.mahafood.gov.in/Publiclogin/frmpubliclogin.aspx अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • तेथे साइन इन किंवा रजिस्टर या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर पब्लिक लॉगिन पर्याय क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्या समोर न्यू युजर सिंग अप हेअर वर क्लिक करा.
  • नवीन राशन कार्ड साठी अप्लाय फॉर द न्यू रेशन कार्ड या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्ही register user वर क्लिक करा आपले यूजर आयडी पासवर्ड किंवा आधार नंबर टाकून लॉगिन करा.
  • त्यानंतर कॅपच्या नीट भरा गेट ऑफ ओटीपी यावर क्लिक करा.
  • त्यानंतर ओटीपी आल्यानंतर ओटीपी टाकून सबमिट हा पर्याय निवडा.
  • अकाउंट उघडल्यानंतर पुन्हा एकदा लॉगिन वर जाऊन रजिस्टर युजर चा वापर करून तुमचा पासवर्ड टाकून तुम्ही लॉगिन करा.
  • त्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशन रिक्वेस्ट मध्ये अप्लाय फॉर न्यू रेशन कार्ड या पर्यायावर क्लिक करा.
  • तिथे मागितलेली सर्व माहिती अचूक पद्धतीने भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर तुम्ही सबमिट फॉर पेमेंट यावर क्लिक करून शुल्क भरा.
  • ऑनलाइन फी जमा केल्यावर तुमची माहिती पडताळणीसाठी तहसील कार्यालयातील अधिकाऱ्याकडे जाईल त्यानंतर ते व्हेरिफाय करून तुमचे राशन कार्ड तुम्हाला मिळेल.