Lado Laxmi Yojana Launched Date In Marathi : लाडो लक्ष्मी योजनेची तारीख जाहीर

Lado Laxmi Yojana Launched Date : महिलांच्या खात्यात 2100 रुपये होणार जमा

Lado Laxmi Yojana महिलांसाठी सरकार नवनवीन योजना सतत राबवत असते. हरियाणा राज्यातील सरकारने देखील महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यापैकीच एक योजना हरियाणा सरकार सुरू करणार आहे ती म्हणजे लाडो लक्ष्मी योजना. हरियाणा सरकारने लाडो लक्ष्मी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Haryana 2100 Rupees Scheme या योजनेअंतर्गत 23 वर्षावरील पात्र महिलांना दरमहा 2100 रुपये मिळणार आहेत. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी महिलांच्या योजनेसाठी एक मोठी घोषणा केली आहे.

Lado Laxmi Yojana Haryana आता राज्यातील महिलांना दीनदयाळ लाडो लक्ष्मी योजनेअंतर्गत 2100 रुपये दरमहा मिळणार आहेत. यासाठी केवळ 23 वर्ष वयोमर्यादा आहे. या योजनेची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

Lado Laxmi Yojana Haryana मुख्यमंत्री नायब सैनी यांनी घोषणा केली आहे की लाडो लक्ष्मी योजना 25 सप्टेंबर 2025 रोजी दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त लागू केली जाईल.

Lado Laxmi Yojana Launched Date सीएम सैनी असे म्हणाले की, या योजनेअंतर्गत सर्व पात्र महिलांना 2100 रुपये आर्थिक मदत मिळणार आहे. हरियाणा सरकार महिलांच्या सुरक्षेसाठी, महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी अनेक नवनवीन योजना राबवत असते त्यापैकीच मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी लाडो लक्ष्मी योजनेची घोषणा केली आहे.

23 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या आमच्या सर्व बहिणी 25 सप्टेंबर पासून लाडो लक्ष्मी योजनेचा लाभ घेऊ शकतील असे ते म्हणाले.

लाडो लक्ष्मी योजनेचे फायदे

Lado Laxmi Yojana Benefits

स्टेज ३ आणि ४ कर्करोगाने ग्रस्त रुग्ण (महिला), ५४ सूचीबद्ध दुर्मिळ आजारांनी ग्रस्त रुग्ण, हिमोफिलिया, थॅलेसेमिया आणि सिकलसेल रुग्णांना आधीच पेन्शन मिळत आहे. या महिलांना या योजनेचे अतिरिक्त फायदे देखील मिळतील.

लाडू लक्ष्मी योजनेची पात्रता

Lado Laxmi Yojana Eligibility

या योजनेसाठी विवाहित आणि अविवाहित दोन्ही महिला पात्र असतील.

योजनेचा अर्ज करण्यासाठी महिलेचे वय 23 वर्ष किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे.

महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.

पहिल्या टप्प्यात 19 ते 20 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळेल.

टप्प्याटप्प्याने पुढील काळात यात आणखी वाढ होईल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी विवाहित आणि अविवाहित अर्जदाराच्या पतीने गेल्या 15 वर्षापासून हरियाणाचे रहिवासी असणे आवश्यक आहे.

कुटुंबातील महिलांच्या संख्येवर कुठलेही बंधन नसेल.

जर एका कुटुंबात तीन पात्र महिला असतील तर तिघांनाही या योजनेचा लाभ मिळेल.

पात्र महिलांना अर्ज करण्यासाठी एसएमएस मिळेल.

लाडो लक्ष्मी योजनेची अपात्रता

Lado Laxmi Yojana Uneligibility

मुख्यमंत्री नायब सैनी यांनी सांगितले की जर सरकारकडून आधीच चालवल्या जाणाऱ्या 9 योजनांमध्ये महिलांचा समावेश असेल आणि त्यांना कोणत्याही योजनेअंतर्गत 2100 रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळत असेल तर त्या महिला लाडो लक्ष्मी योजनेसाठी पात्र राहणार नाहीत.