LIC Golden Jubilee Scholarship 2025 In Marathi : जाणून घ्या आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया
LIC Golden Jubilee Scholarship 2025 In Marathi : पैसे नाहीत म्हणून आता शिक्षण थांबणार नाही, कारण लाइफ इन्शुरन्स ऑफ इंडिया म्हणजेच LIC ने गोल्डन जुबली फाउंडेशन अंतर्गत देण्यात येणारी स्कॉलरशिप च्या माध्यमातून तुम्ही तुमचे शिक्षण पूर्ण करून आपण स्वप्न पूर्ण करू शकता.
LIC द्वारे मेडिकल इंजीनियरिंग सह ITI सारखा डिप्लोमा कोर्सेस साठी स्कॉलरशिप देण्यात येते. या वर्षापासून फाउंडेशनने स्कॉलरशिप वाढवण्याची घोषणा केली आहे.
LIC Golden Jubilee Scholarship Scheme याबरोबरच या वर्षाची LIC स्कॉलरशिप साठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. 6 ऑक्टोंबर 2025 ही शेवटची तारीख आहे. यापूर्वी तुम्ही या योजनेसाठी अर्ज करून लाभ घेऊ शकता.
LIC Golden Jubilee Scholarship Scheme चला तर मग जाणून घेऊया LIC फाउंडेशन स्कॉलरशिप 2025 साठी कोण कोण अर्ज करू शकता आणि स्कॉलरशिप प्राप्त करण्यासाठी पात्रता काय आहे.
आता 11200 विद्यार्थ्यांना मिळणार स्कॉलरशिप
Golden Jubilee Scholarship Scheme
Golden Jubilee Scholarship Scheme एलआयसी गोल्डन जुबली फाउंडेशन यावर्षी आपल्या स्कॉलरशिप चे मर्यादा 3 पटीने वाढवली आहे. आता 11200 विद्यार्थ्यांना या स्कॉलरशिपचा लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे हजारो मुलांना आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत मिळणार आहे आणि ते आपले स्वप्न पूर्ण करू शकतील.
आवश्यक कागदपत्रे
LIC Golden Jubilee Scholarship 2025 Documents
- आधार कार्ड
- उत्पन्न प्रमाणपत्र
- पत्त्याचा पुरावा
- जातीचे प्रमाणपत्र
- शिक्षणसंबंधित कागदपत्रे
- बँक खाते पासबूक
- मेल आयडी
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- मोबाइल नंबर
शिष्यवृत्तीचे प्रमाण
LIC Golden Jubilee Scholarship 2025
सामान्य शिष्यवृत्ती
वैद्यकीय शिक्षण (MBBS, BAMS, BHMS, BDS) : ₹40,000 प्रति वर्ष (₹20,000 चे दोन हप्ते).
अभियांत्रिकी (BE, BTech, BArch) : ₹30,000 प्रति वर्ष (₹15,000 चे दोन हप्ते).
पदवी, इंटिग्रेटेड, डिप्लोमा, व्यावसायिक कोर्सेस, ITI : ₹20,000 प्रति वर्ष (₹10,000 चे दोन हप्ते).
मुलींसाठी विशेष शिष्यवृत्ती
₹15,000 प्रति वर्ष (₹7,500 चे दोन हप्ते).
कालावधी : 2 वर्षे.
कोण करू शकतो अर्ज?
LIC Golden Jubilee Scholarship Scheme Apply
- या स्कॉलरशिप योजनेसाठी असेच विद्यार्थी अर्ज करू शकतात ज्यांनी नुकतेच दहावी किंवा बारावी अथवा डिप्लोमा ची परीक्षा चांगल्या गुणांनी पास केलेली आहे.
- त्यांनी या परीक्षेमध्ये कमीत कमी 60% गुण मिळवणे असणे आवश्यक आहे.
- ही स्कॉलरशिप शिष्यवृत्ती अशाच विद्यार्थ्यांना देण्यात येईल ज्यांनी दहावी आणि बारावीची परीक्षा सत्र 2022-23, 23-24 आणि 24-25 मध्ये पास केली आहे. याबरोबरच त्यांनी 2025-26 साठी शैक्षणिक सत्र मध्ये पहिल्यांदा कुठल्या कोर्ससाठी प्रवेश घेतला आहे
LIC गोल्डन जुबली स्कॉलरशिपच्या महत्वाच्या अटी
LIC Golden Jubilee Scholarship Scheme 2025 In Marathi
- पदव्युत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती नाही.
- वार्षिक उत्पन्न ₹0–2,50,000 असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य.
- XII नंतर अर्ज करणाऱ्यांना X नंतर अर्ज करणाऱ्यांपेक्षा प्राधान्य.
- इतर खाजगी ट्रस्टची शिष्यवृत्ती घेतल्यास अपात्र. मात्र शासकीय शिष्यवृत्ती घेणाऱ्यांना परवानगी.
- शिष्यवृत्ती टिकवण्यासाठी दरवर्षी ठराविक गुण आवश्यक :
- वैद्यकीय/अभियांत्रिकी : किमान 55% गुण.
- पदवी व इतर कोर्स : किमान 50% गुण.
- मुलींसाठी विशेष शिष्यवृत्ती : 11वीत किमान 50% गुण.
- एकाच कुटुंबातील एका विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती. परंतु दुसरा विद्यार्थी मुलगी असल्यास दोघांना परवानगी.
- नियमित उपस्थिती आवश्यक.
- उत्पन्न प्रमाणपत्र (तहसीलदार/ जिल्हाधिकारी/ उपविभागीय अधिकारी इत्यादीकडून) द्यावे लागेल.
निवड प्रक्रिया
- देशभरातील LIC च्या 112 विभागांतून प्रत्येकी 100 विद्यार्थ्यांची निवड.
- 80 विद्यार्थी : सामान्य शिष्यवृत्ती (40 मुलगे + 40 मुली).
- 20 विद्यार्थी : मुलींसाठी विशेष शिष्यवृत्ती.
- निवड गुणांच्या आधारे व उत्पन्नाच्या स्थितीनुसार होईल.
- निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ईमेलद्वारे कळविले जाईल.
अर्ज प्रक्रिया
LIC Golden Jubilee Scholarship 2025 Apply
अर्ज फक्त ऑनलाईन करावा.
LIC च्या अधिकृत वेबसाईटवरून अर्ज लिंक उपलब्ध https://licindia.in
अर्ज सादर केल्यानंतर अर्जदारास ईमेलवर acknowledgment मिळेल.
अधिकृत अप्लाय लिंक
कोणाला मिळेल स्कॉलरशिप?
LIC Golden Jubilee Scholarship Scheme 2025 In Marathi मेडिकल इंजिनिअरिंग कुठल्याही विषयातील अंडर ग्रॅज्युएट कोर्स डिप्लोमा अथवा आयटीआय सारखे डिप्लोमा किंवा आयटीआय द्वारे कोर्स करणारे विद्यार्थी स्कॉलरशिप साठी पात्र आहेत.
जे विद्यार्थी अकरावी, बारावी किंवा दहावी नंतर कुठल्याही क्षेत्रामध्ये 2 वर्षाचा डिप्लोमा करत आहेत अशा विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाईल.
LIC Golden Jubilee Scholarship Scheme 2025 In Marathi भारतीय जीवन विमा निगम ने गोल्डन जुबली स्कॉलरशिप 2025 साठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची मर्यादा वाढवली आहे. आता इच्छुक आणि पात्र उमेदवार licindia.in अधिकृत वेबसाईटवर जाऊन 6 ऑक्टोंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.
एलआयसी शिष्यवृत्ती अर्ज 2025 साठी प्रक्रिया सुरू आहे. विद्यार्थी आपली वयक्तिक माहिती म्हणजेच नाव, वडिलांचे नाव, पत्ता, कुटुंबाची आर्थिक उत्पन्न, बँक पासबुक ची माहिती, राज्य आणि अन्य महत्त्वपूर्ण माहिती या अर्जावर भरावी लागते. त्यांना शैक्षणिक माहिती आणि ओळखपत्र, आधार कार्ड, वोटर आयडी अधिक कागदपत्र या वेबसाईटवर अपलोड करावे लागतात.
LIC Golden Jubilee Scholarship Scheme In Marathi एलआयसी सुवर्ण जयंती शिष्यवृत्ती 2025 ही योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करणे. जेणेकरून त्यांना उच्च शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील. दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थी LIC द्वारे देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र आहेत.
एलआयसी स्वर्ण जयंती शिष्यवृत्ती 2025 विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी पुढील भविष्यासाठी मदत केली जाते. जे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत ते या योजनेसाठी अर्ज करू शकणार. यासाठी काही पात्रताही निश्चित करण्यात आले आहेत.
यामध्ये विद्यार्थ्यांना मागील परीक्षेमध्ये कमीत कमी 60 टक्के गुण मिळालेले असणे आवश्यक आहे. याबरोबरच त्याचे आई-वडील चे आर्थिक उत्पन्न 4.5 लाख रुपये पेक्षा अधिक नसावे मात्र ज्यांचे कुटुंबाचे आर्थिक वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपये पेक्षा कमी आहे अशांना अधिक प्राधान्य दिले जाते.
जर या 2.5 लाखाच्या वार्षिक उत्पन्नामध्ये विद्यार्थ्यांची निश्चित विद्यार्थी संख्या न मिळाल्यास 4.5 लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश केला जातो.
विद्यार्थ्यांची शॉर्टलिस्टिंग
विद्यार्थ्यांची शॉर्टलिस्टिंग आणि अंतिम निवड करण्यासाठी दहावी आणि बारावी मध्ये प्राप्त टक्केवारी वर ही निवड केली जाते. जे विद्यार्थी आपली बारावी परीक्षा उत्तीर्ण होऊन नंतर नियमित शिष्यवृत्ती सेनेसाठी अर्ज करतात त्यांना निवड प्रक्रियेदरम्यान दहावी परीक्षा पूर्ण केल्यानंतर अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राथमिकता दिली जाते.
विद्यार्थ्यांसाठी खास स्कॉलरशिप
LIC Golden Jubilee Scholarship Scheme In Marathi एलआयसीच्या या योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दहावी पास झाल्यानंतर सरकारी मान्यताप्राप्त महाविद्यालय संस्था किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआय मध्ये इंटर मीडियर व्यावसायिक किंवा डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी 2 वर्ष उच्चशिक्षण घेण्यासाठी प्रति वर्ष 15000 रुपये विशेष शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. अभ्यासक्रमाचा कालावधी दरम्यान प्रतिवर्ष 7500 रुपये 2 टप्प्यांमध्ये रक्कम विद्यार्थ्यांना दिली जाते.
स्कॉलरशिप संख्येत 3 पट वाढ
एलआयसी गोल्डन जुबली फाउंडेशन स्कॉलरशिप 2025 साठी ची अर्ज प्रक्रिया सुरू आहे तर यावर्षी या फाउंडेशनने स्कॉलरशिप संख्येमध्ये तीन पटीने वाढ केली आहे. ज्यामुळे देशातील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.