PM Ujjwala Yojana 2025 In Marathi : 25 लाख नवीन LPG कनेक्शन होणार वितरित

PM Ujjwala Yojana 2025 In Marathi : प्रधानमंत्री उज्वला योजना

PM Ujjwala Yojana 2025 In Marathi : प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत 25 लाख मोफत नवीन LPG कनेक्शन वाटल्यानंतर देशांमध्ये उज्वला लाभार्थ्याची एकूण संख्या वाढून 10.6 कोटी होणार आहे. गरीब कुटुंब SC व ST प्रवर्गातील वयस्कर महिला ज्यांच्या घरांमध्ये LPG कनेक्शन नाही त्या उज्वला 2.0 अंतर्गत मोफत LPG कनेक्शन मिळवण्यासाठी पात्र आहेत.

PM Ujjwala Yojana सण उत्सवाच्या काळात GST कमी करून मोठी गिफ्ट मोदी सरकारने गरीब कुटुंबांना दिले आहे. दरम्यान केंद्र सरकारने नवरात्र उत्सव दरम्यान प्रधानमंत्री उज्वला योजना अंतर्गत मोफत 25 लाख नवीन LPG कनेक्शन वाटण्याचा निर्णय घेतला आहे.

PM Ujjwala Yojana याबरोबरच देशांमध्ये उज्वला लाभार्थ्यांची एकूण संख्या वाढवून 10.6 कोटी होणार आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री अर्पितसिंहपुरी यांनी ही माहिती दिली.

Free LPG Connection ते म्हणाले की सरकार उज्वला योजनेअंतर्गत प्रत्येक कनेक्शन वर 2050 खर्च करणार आहे. यामध्ये एक मोफत LPG सिलेंडर, गॅस शेगडी, रेगुलेटर आणि अन्य संबंधित उपकरणाचा समावेश आहे.

Free LPG Connection जर तुम्हालाही या योजनेअंतर्गत मोफत गॅस कनेक्शन पाहिजे असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो या योजनेची पात्रता काय आहे आणि तुम्ही अर्ज कसा करावा.

प्रधानमंत्री उज्वला योजनेचे नियम

PM Ujjwala Yojana Terms And Conditions

Free LPG Connection गरीब कुटुंब एससी व एसटी प्रवर्गातील वयस्कर महिला यांच्या घरामध्ये एलपीजी कनेक्शन नाही अशा महिला उज्वला 2.0 अंतर्गत मोफत एलपीजी कनेक्शन मिळवण्यासाठी पात्र आहेत.

नोंदणी करण्यासाठी महिलांकडे आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि बँक खात्याचा तपशील असणे आवश्यक आहे.

कसा करावं अर्ज

PM Ujjwala Yojana Apply

  • उज्वला 2.0 योजनेअंतर्गत अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.
  • वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्ही कंपनीचे नाव निवडा उदाहरणार्थ इंडियन भारत गॅस, एचपी गॅस.
  • कनेक्शनचा प्रकार निवडा जसे की उज्वला 2.0 नवीन कनेक्शन राज्य, जिल्हा, वितरकाचे नाव निवडा, मोबाईल नंबर, कॅपच्या आणि ओटीपी भरा.
  • श्रेणीची निवड केल्यानंतर कुटुंबाची माहिती वैयक्तिक माहिती, पत्ता, बँकेची माहिती, सिलेंडरचे प्रकार, ग्रामीण किंवा शहरी भाग आणि घोषणापत्र यांची निवड करून तुम्ही सबमिट करा.
  • अर्ज केल्यानंतर रिफ्रेश नंबर जनरेट होईल तो घेऊन तुम्ही जवळच्या गॅस एजन्सी वर जा.

दरम्यान सध्या मोदी सरकारच्या 300 रुपये अनुदान सोबत 10.33 कोटी प्लस उज्वला परिवारांना सिलेंडर केवळ 553 रुपयांमध्ये दिले जात आहे. ही किंमत जगभरातील LPG उत्पादक देशापेक्षा पण कमी आहे.