Adhar card Update : तिसऱ्या नियमाकडे दुर्लक्ष कराल तर पडेल महागात
aadhaar card update from name change to new fees 3 things change from November 1 know details in marathi : 1 नोव्हेंबर पासून आधारच्या नियमांमध्ये तीन महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे आता आधार कार्ड धारकांना काही महत्त्वाचे अपडेट करण्यासाठी आधार सेंटरला जाण्याची आवश्यकता नाही, ते आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आधार अप्लिकेशनच्या मदतीने आधारवरील अपडेट घरबसल्या करू शकतील.
Adhar card Update : नवीन महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजेच 1 नोव्हेंबर 2025 पासून भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाचे असलेल्या ओळखपत्रापैकी एक म्हणजे आधार कार्ड संबंधित नियमांमध्ये मोठे बदल झाले आहेत. भारतीय विशेष ओळखपत्र UIDAl ने या बदलाद्वारे नागरिकांना आधार संबंधित प्रक्रिया अधिक सोपी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
Aadhaar card update rules change : सर्वात मोठा दिलासा म्हणजे अनेक प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आता आधार कार्डधारकाला आधार केंद्रावर जाण्याची आवश्यकता पडणार नाही.
ग्राहकांसाठी ही प्रक्रिया अधिक सोपी आणि सहज बनवण्यासाठी आता आधार कार्डधारक डेमोग्राफिक माहितीला ऑनलाईन अपडेट करू शकतात. आधार कार्डधारक आता आपले नाव, पत्ता, जन्मतारीख आणि मोबाईल नंबर सारखी महत्त्वाची माहिती ऑनलाईन घरबसल्या ॲपच्या माध्यमातून अपडेट करू शकतील.
डेमोग्राफिक माहिती ऑनलाईन अपडेट
Update Aadhaar Card details online from November 1 : UIDAI ने ग्राहकांच्या सुविधेसाठी आता आधार कार्डधारकांना डेमोग्राफिक माहिती ऑनलाईन अपडेट करण्यासाठी मंजुरी दिली आहे. आधार कार्डधारक आता आपले नाव, पत्ता, जन्मतारीख आणि मोबाईल नंबर यासारखी माहिती घर बसून ऑनलाइन पद्धतीने अपडेट करू शकतात. या बदलामागील महत्त्वाचा उद्देश म्हणजे आधार कार्डधारकांसाठी प्रक्रिया अधिक सोपी आणि सहज बनवणे हा आहे. यामुळे ग्राहकांचा वेळ वाचेल आणि पैसाही.
नवीन फीस स्ट्रक्चर
UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, फिंगर प्रिंट आणि फोटोच्या बायोमेट्रिक अपडेटसाठी आता 125 रुपये शुल्क म्हणून द्यावे लागेल.
मात्र जर आधार कार्डधारकाचे वय 5 ते 7 वर्ष दरम्यान आहे आणि हे अपडेट पहिल्यांदा करण्यात येत असेल तर ही सेवा निशुल्क असणार आहे.
याचप्रमाणे 15 ते 17 वयोगटातील कार्डधारकांसाठी दोनदा अपडेट करण्याच्या स्थितीमध्ये कुठल्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागणार नाही.
Adhar card Update : याव्यतिरिक्त जर आधार कार्ड एनरोलमेंट नंबर, लिंग, जन्मतारीख, पत्ता, मोबाईल नंबर आणि ई-मेल ऍड्रेस संदर्भात डेमोग्राफिक अपडेट करायचे असेल तर बायोमेट्रिक अपडेट सोबत हे निशुल्क असेल आणि वेगळे करायचे असेल तर 75 रुपये फीस म्हणून द्यावे लागतील.
आधार रीप्रिंट करण्यासाठी आता 40 रुपये फीस म्हणून द्यावे लागतील.
याव्यतिरिक्त आधार कार्डसाठी पहिले एप्लीकेंडसाठी होम अनरोलमेंट सर्विस शुल्क 700 रुपये असेल.
या पत्त्यावर अन्य व्यक्तीसाठी हे शुल्क 350 रुपये प्रति व्यक्ती असेल.
आधार- पॅन लिंक करणे बंधनकारक
Aadhaar update gets easier from November 1: UIDAI announces new rules; check Aadhaar update new fee structure, PAN linking and other information : याव्यतिरिक्त आधार कार्डधारकांना 31 डिसेंबर 2025 पूर्वी त्यांचे पॅन कार्ड- आधार कार्डशी लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे तुम्हीही आपले आधार कार्ड- पॅन कार्डशी लिंक केले नसेल तर 31 डिसेंबर पूर्वी हे काम पहिले करून घ्या.
14 जून 2026 पर्यंत निशुल्क असेल ही सुविधा
aadhaar card update from name change to new fees 3 things change from November 1 know details in marathi : आधार कार्ड धारक आपली ओळख आणि पत्ता संबंधित प्रमाण किंवा नाव, जेंडर आणि जन्मतारीख साठी डॉक्युमेंटला आधार पोर्टलवर विना कोणत्याही शुल्काशिवाय सबमिट करू शकतील. मात्र ही सुविधा 14 जून 2026 पर्यंतच निशुल्क असणार आहे.
FAQs : Adhar card Update
1 नोव्हेंबर पासून आधार कार्ड धारकांना कुठला दिलासा मिळाला?
आता कार्डधारकांना नाव, पत्ता, जन्मतारीख आणि मोबाईल नंबर सारखी माहिती अपडेट करण्यासाठी कुठल्याही आधार केंद्रावर जाण्याची आवश्यकता नाही. ते आपल्या घरी बसून ऑनलाइन पद्धतीने ही प्रक्रिया निशुल्क पूर्ण करू शकतील.
फिंगरप्रिंट आणि फोटो बायोमेट्रिक अपडेटसाठी किती शुल्क लागेल?
बायोमेट्रिक अपडेटसाठी सामान्य शुल्क 125 रुपये निश्चित करण्यात आले आहे.
मुलांच्या बायोमेट्रिक अपडेटसाठी काही सूट आहे का?
होय…पाच ते सात वर्षाच्या मुलांना पहिले बायोमेट्रिक अपडेट निशुल्क असणार आहे. याबरोबरच 15 ते 17 वयोगटातील आधार कार्डधारक मुलांना दोन वेळेस अपडेट पण निशुल्क असणार आहे.
डेमोग्राफिक अपडेट वेगळे केल्यावर काय शुल्क लागेल?
डेमोग्राफिक अपडेट बायोमेट्रिक अपडेट विना वेगळे केले तर 75 रुपये फीस म्हणून द्यावे लागतील.
डोमोग्राफिक अपडेट निशुल्क करता येईल?
होय.. जर डेमोग्राफिक अपडेट बायोमेट्रिक अपडेट सोबत केले तर ते निशुल्क करता येणार आहे.