Aadhaar Pan Link Process In Marathi : पॅन कार्ड लिंक करण्यासाठी शेवटचे 6 दिवस

Aadhaar Pan Link Process : अन्यथा पॅन कार्ड होईल बंद

Aadhaar Pan Link Process : सध्या आपण पाहतो की, प्रत्येक नागरिकांसाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. आता प्रत्येक नागरिकाकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड आहे. परंतु आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केलेले आहे का? हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. कारण आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक नसेल तर तुमचे पॅन कार्ड बंद पडू शकते. आधार पॅन कार्ड लिंक करण्यासाठी तुमच्याकडे शेवटचे 6 दिवस शिल्लक आहेत.

Aadhaar Pan Link यासाठी 31 डिसेंबर पर्यंतची मुदत सरकारने दिली आहे. त्यानंतर जर तुम्ही आधार आणि पॅन कार्ड लिंक केले नाही तर तुमचे कार्ड 1 जानेवारी 2025 पासून बंद होईल. त्यामुळे जर तुम्ही अजूनही लिंक केले नसेल तर लवकरात लवकर तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणे आवश्यक आहे.

Aadhaar Pan Link ज्या नागरिकांचे आधार कार्ड ऑक्टोंबर 2024 च्या आधी जाहीर केले आहेत त्यांना 31 डिसेंबर पर्यंत आधार पॅन लिंक करायचे आहे. जर तुम्ही हे काम केले नाही तर तुमची टॅक्स आणि बँकिंग संबंधीची अनेक कामे अडकवू शकतील.

का करावे आधार पॅन लिंक

link pan aadhaar before new year

आधार आणि पॅन कार्ड लिंक न झाल्यामुळे तुम्हाला अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. टॅक्स करण्यासाठी अडचणी येऊ शकतात. यामुळे बँक, म्युच्युअल फंड, शेअर, बॉण्ड, इन्शुरन्स अशी अनेक कामांमध्ये अडथळा येऊ शकतो.

डेडलाईन आधी काम न केल्यास दंड आकारला जाईल

link pan aadhaar before new year

जर तुम्ही आधार पॅन कार्ड लिंक केले नाही तर तुम्हाला पॅन कार्ड पुन्हा सुरू करण्यासाठी 1000 रुपयांचे दंड भरावा लागेल. हा दंड Income Tax e-Pay Tax द्वारे करावे लागणार आहे. त्यानंतर आधार पॅन कार्ड लिंक होईल.

कसे कराल आधार पॅन लिंक

Aadhar-Pan Link Online Process

  • सर्वप्रथम तुम्हाला Income Tax e-Filling Portal वर जावे लागेल.
  • त्यानंतर Link Aadhar हा पर्याय निवडावा लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला Pan आणि आधार नंबर टाकायचा आहे.
  • त्यानंतर तुमच्या फोनवर एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकून व्हेरिफाय करा.
  • त्यानंतर तुम्ही आधार पॅन लिंक करू शकतात.
  • त्याच सोबत 1000 रुपये भरावे लागणार आहेत.
  • त्यानंतर तुमचे आधार आणि पॅन लिंक केले जाईल.