Aadhar Card On WhatsApp : आता व्हाट्सअपवरही आधार कार्ड उपलब्ध

Aadhar Card On WhatsApp : जाणून घ्या ते डाऊनलोड करण्याची सोपी पद्धत

Aadhar Card On WhatsApp : आता आधार कार्ड व्हाट्सअप वर MyGov helpdesk चॅटबॉट द्वारे डाऊनलोड करता येते. यासाठी आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर आणि डिजिलॉकर अकाउंट असणे आवश्यक आहे.

आधार कार्ड भारतीय नागरिकांसाठी सर्वात महत्त्वाचे ओळखपत्र पैकी एक आहे. आता पहिल्यापेक्षा अधिक सोप्या पद्धतीने ते उपलब्ध झाले आहे. भारत सरकारने यासाठी नवीन सुविधा सुरू केली आहे ज्याद्वारे नागरिक आपल्या व्हाट्सअप वर थेट आधार कार्ड डाऊनलोड करू शकतात.

ही सेवा अधिकृत MyGov helpdesk चॅटबॉट द्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. याद्वारे लाखो व्हाट्सअप युजर्स ना मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. यापूर्वी आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी लोकांना UIDAI वेबसाईटवर किंवा डिजिलॉकर ॲपच्या द्वारे ते डाऊनलोड करावे लागत होते. मात्र आता व्हाट्सअप वरच ते डाऊनलोड करता येत असल्याने नागरिकांना अधिक सोपी पद्धत मिळाली आहे.

आता नवीन सुविधा द्वारे कुठल्याही ॲप शिवाय व्हाट्सअप वर आधार आणि डीजीलॉकर संबंधित सर्व कागदपत्रे डाऊनलोड करता येणार आहेत. ही योजना खास करून अशा लोकांसाठी फायद्याची आहे जे रोज कामासाठी व्हाट्सअप चा वापर करतात.

असे करा आधार कार्ड डाउनलोड

How To Aadhar Card Download

व्हाट्सअप वर आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी तुमच्याकडे खालील दिलेली माहिती असणे आवश्यक आहे.
तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक असणे आवश्यक आहे.
तुमचे सक्रिय डिजिलॉकर अकाउंट असावे.
तुमचा मोबाईल मध्ये MyGov helpdesk चा अधिकृत व्हाट्सअप नंबर 9013151515 सेव केलेला असावा.

व्हाट्सअप वर आधार डाऊनलोड करण्याची सोपी प्रक्रिया

step by step process to download aadhaar card on whatsapp

  • सर्वात प्रथम तुम्ही MyGov helpdesk चा अधिकृत व्हाट्सअप नंबर 9013151515 आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये सेव करून घ्या.
  • व्हाट्सअप उघडून या नंबर वर Hi किंवा नमस्ते असे लिहून मेसेज पाठवा.
  • चॅटबॉट मेनूमध्ये डिजिलॉकर सेवानिवडा.
  • आपला डीजीलॉकर कन्फर्म करा आणि 12 अंकी आधार नंबर टाका.
  • तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो इथे टाका.
  • व्हेरिफिकेशन नंतर तुम्हाला कागदपत्रांची यादी दिसेल तिथे आधार कार्ड निवडा आणि तुम्ही तुमच्या आधार कार्ड चे पीडीएफ व्हाट्सअप वर डाऊनलोड करा.

लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी

Importance Of Aadhar Card On WhatsApp

  • एक वेळेस केवळ एकच कागदपत्र डाऊनलोड करता येते.
  • आधार कार्ड डीजीलॉकरशी लिंक असणे आवश्यक आहे.
  • जर लिंक नसेल तर डीजीलॉकर ॲप किंवा वेबसाईट द्वारे अपडेट करावे लागेल.
  • ही सुविधा संपूर्णपणे सुरक्षित आहे आणि तुमची खाजगी माहिती ची संपूर्ण काळजी घेतली जाते.

डिजिटल सुविधेकडे एक पाऊल

ही सुविधा नागरिकांना आधार डाऊनलोड करण्यासाठी सोपी आणि वेगवान पद्धत देते. देशांमध्ये व्हाट्सअप सर्वाधिक मेसेज साठी वापरण्यात येते. यासाठी या सेवेद्वारे आवश्यक सरकारी कागदपत्रे सतत तुमच्या मोबाईल मध्ये असतील तुमच्या बोटाच्या काही क्लिकवर ती उपलब्ध होतील यामुळे आधार संबंधित तुमची कामे वेगवान होण्यास मदत होईल.