Aata Hou De Dhingana Season 3 : आपला सिद्धू परत येतोय धिंगाणा दाखवायला
Aata Hou De Dhingana Season 3 : सिद्धार्थ जाधव हा “आता होऊ दे धिंगाणा” या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून अत्यंत धिंगाणा घालतो आणि सर्वांची मने जिंकून घेतो. अभिनेता सिद्धार्थ जाधवने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. हा धिंगाणा पाहायला सर्वजण खूप उत्सुक असतात. आता तीच उत्सुकता अजून वाढणार आहे. कारण “आता होऊ दे धिंगाणा” या कार्यक्रमाचे तिसरं पर्व आपल्याला पाहायला मिळणार आहे. सिद्धार्थ जाधवची विनोदी शैली आणि एनर्जी प्रेक्षकांना खूप आवडते.
Aata Hou De Dhingana Season 3 आता होऊ दे धिंगाणा या कार्यक्रमाची परीक्षक उत्सुकतेने वाट पाहतात. त्यांचे आतुरता आता संपली आहे. Star Pravah स्टार प्रवाह वाहिनीवरील भन्नाट कार्यक्रम म्हणजे आता होऊ दे धिंगाणा. या कार्यक्रमाची सुरुवात ऑगस्ट 2022 मध्ये झाली होती. Siddharth Jadhav सिद्धार्थ जाधवने या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते. त्यानंतर आता होऊ दे धिंगाणा दुसरे पर्व देखील आले होते आणि त्यामध्ये देखील Siddharth Jadhav सिद्धार्थ जाधवने सूत्रसंचालन करून सगळ्यांच्या घरोघरी या कार्यक्रमा अंतर्गत धिंगाणा घातला होता आणि सगळ्यांच्या मनामनात पोहोचला होता. तर त्यामुळे दरवर्षी हा कार्यक्रम चांगला गाजत आहे. स्टार प्रवाहच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर आता होऊ दे धिंगाणा कार्यक्रमच्या तिसऱ्या पर्वाचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये सिद्धार्थ जाधव Siddharth Jadhav म्हणतो की “मुक्काम पोस्ट” “धिंगाणा बुद्रुक” आपला सिद्धू घेऊन येतोय नव पर्व.
Aata Hou De Dhingana Season 3 आता होऊ दे धिंगाणा पर्व 3 हे 16 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. हा कार्यक्रम Star Pravah स्टार प्रवाह वाहिनीवर दर शनिवार आणि रविवारी रात्री 9 वाजता पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहमीप्रमाणे सिद्धार्थ जाधव याने केले आहे. दोन मालिकेच्या टीम मध्ये अनोखी लढत पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. आता होऊ दे धिंगाणा च्या तिसऱ्या पर्वासाठी प्रेक्षकांनी भरपूर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही प्रतिक्रिया अशा आहेत की इथे सिद्धू दादा येतोय. खूप वाट पाहिली. खूप उत्सुकता आहे. खूप आतुरता होती अशा अनेक प्रतिक्रिया या कार्यक्रमाबद्दल नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
Aata Hou De Dhingana Season 3 सध्या स्टार प्रवाह Star Pravah वाहिनीवर शनिवार- रविवारी रात्री 9 वाजता “मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद” 3 हा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमात सचिन पिळगावकर, आदर्श शिंदे, वैशाली सामंत परीक्षक म्हणून पाहायला मिळत आहेत. तर सिद्धार्थ चांदेकर यांनी सूत्रसंचालन केले आहे. मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 3 कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा सुरू असून हा कार्यक्रम लवकरच निरोप घेणार आहे आणि त्या जागेवर 16 नोव्हेंबर पासून “आता होऊ दे धिंगाणा” चे तिसरे पर्व आपल्याला पाहायला मिळणार आहे.
नथणी पाहिजे गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ