ABHA Card yojana 2024 in marathi : आभा कार्डच्या एका क्लिकवर मिळवा “आरोग्य कुंडली”

ABHA Card yojana 2024 information in marathi :

आभा कार्ड ABHA Card म्हणजे आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट याद्वारे तुम्हाला 14 अंकी आभा कार्ड नंबर दिला जातो. तो तुम्हाला भारताच्या डिजिटल हेल्थकेअर मध्ये एक भागीदार म्हणून विशेष ओळख देतो. आभा नंबर तुमच्यासाठी एक मजबूत आणि विश्वासू ओळख निर्माण करतो याचा वापर तुम्ही देशभरातील कुठल्याही रुग्णालयात करू शकता. यामुळे तुमची संपूर्ण आरोग्य विषयाची माहिती डिजिटल पद्धतीने या आभा ABHA नंबर वर सेव केली जाते त्यामुळे तुम्हाला आरोग्यासंबंधीचे कागदपत्रे सांभाळण्याची आवश्यकता राहत नाही आणि आभा हेल्थ कार्ड ABHA health Card वर सर्व माहिती साठवली जाते. साधारणता सर्वजण आपले मेडिकल रिपोर्ट किंवा मेडिकल संबंधित सर्व कागदपत्र सोबत घेऊनच हॉस्पिटलमध्ये जातात ते गहाळ होण्याची किंवा हरवण्याची भीती जास्त असते मात्र आभा कार्ड ABHA Card नंबर वर तुमची आरोग्य माहिती डिजिटल रूपामध्ये संग्रहित होत असल्याने तो धोका आभा कार्डमुळे राहत नाही.

ABHA card

आभा कार्ड म्हणजे काय?

What is ABHA Card?

Abha card / Health ID Card ही भारत सरकारची एक योजना आहे. आभा कार्डचा फुल फॉर्म आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट आहे ऑनलाइन रजिस्ट्रेशन नंतर तुम्हाला 14 अंकी आभा कार्ड ABHA Card नंबर दिला जातो याद्वारे रुग्णाच्या उपचारासंबंधीची सर्व माहिती डिजिटल पद्धतीने या नंबरवर सेव्ह केली जाते विशेष करून केंद्र सरकार आर्थिक दृष्ट्या मागास परिवाराला समोर ठेवून आभा कार्ड हेल्थ आयडी सुविधा सुरू केली आहे तसे पाहिले तर परिवारातील ज्याचे आर्थिक उत्पन्न अडीच लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे तो आभा कार्ड ABHA Card सहज बनवू शकतो.

ठळक मुद्दे :

आभा कार्ड म्हणजे काय?

आभा कार्डची थोडक्यात माहिती

आभा कार्ड काढण्याचे फायदे

आभा कार्डची वैशिष्ट्ये

आभा कार्डचे लाभ

आभा कार्ड कसे बनवावे

आभा कार्ड डाऊनलोड कसे करावे?

आभा कार्ड साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

आयुष्मान कार्ड आणि आभा हेल्थ कार्ड यामधील फरक

FAQ

आभा कार्डची थोडक्यात माहिती

योजनेचे नावआभा हेल्थ कार्ड
कोणी सुरू केलीआरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार
आभा कार्डची सुरुवात2022
कोणाला मिळणार लाभदेशतील प्रत्येक व्यक्ती
अर्ज कसा करावाऑनलाइन
अधिकृत वेबसाईटabha.abdm.gov.in
हेल्पलाइन नंबर1800114477
abha.abdm.gov.in

ABHA Card

आभा कार्ड काढण्याचे फायदे

Benefits of ABHA Card

आभा हेल्थ आयडी ABHA health Card मध्ये आरोग्य सेवाची गुणवत्ता, दक्षता आणि सुविधा उपलब्ध करून देण्याची महत्त्वपूर्ण क्षमता आहे याचे डिजिटल विशेषता उत्तम सुरक्षा उपाय आणि आरोग्य सेवा मिळवून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. याबरोबरच एकीकडे व्यक्ती आणि आरोग्यसेवा देण्यासाठी समान रूपाने मूल्यवान बनवते, याचे अनेक फायदे आहेत.

सुगम हेल्थकेअर : व्यक्तींना याद्वारे अद्वितीय डिजिटल आरोग्य प्रोफाइल बनवण्याची परवानगी मिळते. हेल्थ आयडी कार्ड याद्वारे आरोग्य सेवा पुरवल्या जातात तसेच या सुविधा पुरवताना रुग्णाचा डेटा सहज उपलब्ध होतो.

व्यक्तिगत आरोग्य रेकॉर्ड लिंक : तुम्ही तुमची सर्व आरोग्य तपासणीची माहिती जसे की रक्त परीक्षण, निदान औषधे आधी सर्व माहिती सहज पद्धतीने यावर सेव्ह करू शकता यानंतर तुम्ही एका क्लिकवर तुमची सर्व रिपोर्ट्सची माहिती तात्काळ पाहू शकता.

डॉक्टर पर्यंत पोहोचणे सोपे: आभा हेल्थ कार्ड ABHA health Card व्यक्तींना मोबाईल ॲपचा वापर करून स्वतःची आरोग्य रेकॉर्ड तपासणीचा इतिहास तत्काळ मिळवण्यास मदत करून देते नवीन डॉक्टराकडे जाणे किंवा आपत्कालीन स्थितीमध्ये हे विशेष करून मोठ्या प्रमाणात उपयोगी पडते. यातून रुग्णाला यापूर्वी कुठला आजार होतो, कुठले उपचार सुरू आहेत याची सर्व माहिती आभा कार्ड ABHA Card नंबरवर कोणताही डॉक्टरांना मिळते त्यानुसार डॉक्टरांना तुमच्यावर पुढील उपचार करण्यासाठी ही माहिती उपयोगाची ठरणार आहे

आयुष उपचार : आयुष उपचार संस्थांमध्ये आभा कार्ड स्वीकारले जाणार आहे यामध्ये आयुर्वेद, नैसर्गिक चिकित्सा, योग, युनानी, सिद्ध आणि होमियोपॅथिक उपचार दिले जातात

आरोग्य विमा लाभ : आपले हेल्थ आयडी कार्ड आरोग्य विमा पॉलिसी जोडून व्यक्ती सहज पद्धतीने आपल्या पॉलिसीची माहितीपर्यंत पोहोचू शकतो यामुळे कॅशलेस रुग्णालयामध्ये भरती होण्यासाठी मोठी मदत होते.

pradhanmantri ujjwala yojana clik here

Atal pension yojana clik here

आभा कार्डची वैशिष्ट्ये

Features of ABHA Card

साधारणता सर्वजण आपले मेडिकल रिपोर्ट किंवा मेडिकल संबंधित सर्व कागदपत्र सोबत घेऊनच हॉस्पिटलमध्ये जातात ते गहाळ होण्याची किंवा हरवण्याची भीती जास्त असते मात्र आरोग्य सेवा उद्योग वेगाने डिजिटल तंत्रज्ञान आत्मसात करत आहे. याद्वारे आरोग्य माहिती डिजिटल रूपामध्ये संग्रहित करून सुविधा पुरवण्याचे काम करत आहे. यातीलच एक भाग म्हणून आभा कार्ड दिले जात आहे.

आभा हेल्थ कार्डची ABHA health Card काही प्रमुख वैशिष्ट्ये

अद्वितीय आणि विश्वास पूर्ण ओळख : डिजिटल स्टोरेज (माहिती सेव करणे) आजचा एक प्रमुख लाभ म्हणजे ही विविध आरोग्य सेवा प्रदान करणाऱ्यांना एक प्रकारे अद्वितीय आणि विश्वास पूर्ण ओळख देते याद्वारे डॉक्टर आणि पोलिसांना आभा कार्डच्या ABHA Card आधारे कोणत्याही व्यक्तीची ओळख पटवण्यास अधिक मदत होते

आभा कार्ड ABHA Card नंबर हा एक 14 अंकी कोड आहे जो भारत सरकारच्या डिजिटल हेल्थकेअर इकोसिस्टीम मध्ये भाग घेणाऱ्या व्यक्तींसाठी एक विशिष्ट ओळख निर्माण करून देण्याचे काम करतो

अडचणी दूर करण्यास मदत : आभा कार्ड ABHA Card एक फोल्डरमध्ये रुग्णाची सर्व माहिती संग्रहित करून ठेवते त्यामुळे आरोग्य सुविधा घेण्यासाठी रुग्णाला नोंदणी करण्यासाठी रांगेत उभे राहण्याची आवश्यकता पडत नाही या व्यतिरिक्त आभा ABHA आरोग्य डेटा शेअर करण्यासाठी आभा कार्ड एप्लीकेशन सारखे व्यक्तिगत आरोग्य रेकॉर्डच वापर करण्यासाठी एक सहज साइन – अप प्रक्रिया प्रदान करतात

कागद रहित आरोग्य रेकॉर्ड : आभा हेल्थ आयडी कार्ड ABHA health Card कोणत्याही तपासणी कागदपत्र शिवाय डिजिटल पद्धतीने रुग्णाचे रेकॉर्ड पाहून त्याच्यावर उपचार करता येतात

पोर्टेबिलिटी : आभा हेल्थ कार्ड ABHA health Card संपूर्ण देशात पोर्टेबल आहे, उपयुक्त आहे हे एका व्यक्तीला देशातील कुठल्याही ठिकाणी आरोग्य सेवा- सुविधा देण्यामध्ये सक्षम आहे

हे ABHA कार्ड व्यक्तींना आपले आरोग्य रेकॉर्ड डिजिटल पद्धतीने ट्रेक करण्यास मदत करते त्यामुळे डॉक्टरांसाठी रुग्णावर उपचार करणे सोपे होते

डिजिटल रूपात सुरक्षित : एका व्यक्तीचे संपूर्ण आरोग्य तपासणी रेकॉर्ड डिजिटल पद्धतीने याद्वारे सुरक्षित संग्रहित करून ठेवल्या जाते त्याच्या परवानगीशिवाय कोणालाही ते पाहता किंवा देता येत नाही त्यामुळे ते सुरक्षित आहे

डिजिटल हेल्थ आयडी कार्ड साठी अर्ज करणे संपूर्ण वैयक्तिक आहे हे एक व्यक्ती आपल्या मर्जीनुसार अर्ज करू शकते किंवा वापसही घेऊ शकते.

ABHA Card

आभा कार्डचे लाभ

Benefits of ABHA Card

आभा कार्ड ABHA Card किंवा हेल्थ आयडी कार्ड health Card या अंतर्गत लाभार्थी डिजिटल हेल्थ प्रोफाइल बनवण्याची पूर्वी परवानगी मिळते याद्वारे आरोग्य सेवा पुरवणे सोपे होऊन जाते

तुम्ही तुमची संपूर्ण मेडिकल माहिती जसे की रक्ताची तपासणी, रिपोर्ट अहवाल, औषध अन्य तपासणी अहवाल आधी संपूर्ण मेडिकल माहिती सहज पद्धतीने यावर सेव्ह करू शकता यानंतर ही माहिती हवी असल्यास तुम्हाला ही माहिती त्यावर काही क्लिक मध्ये तुम्हाला संपूर्ण तुमची आजपर्यंतचे तपासणी अहवाल पाहता येतील यामुळे कागदपत्र हरवण्याचा धोका राहणार नाही

आभा हेल्थ आयडी कार्ड ABHA health Card लाभार्थ्यांना मोबाईल ॲपच्याद्वारेही पाहण्याची सुविधा आहे या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या आरोग्य संबंधित रेकॉर्ड आणि मेडिकल हिस्टरी पाहू शकता. आयुष ट्रीटमेंट संस्थांमध्ये पण आभा कार्ड ABHA Card स्वीकारले जाते याद्वारे आयुर्वेदिक, नैसर्गिक उपचार, योग, युनानी, सिद्धी आणि होमिओपॅथिक उपचार केले जातात

तुम्ही तुमच्या हेल्थ आयडीला आरोग्य विमा पॉलिसीशी जोडू शकतात यामुळे लाभार्थीला आपली स्वतःची पॉलिसीचे विवरण पाहता येते यामुळे कॅशलेस हॉस्पिटलमध्ये भरती होण्यासाठी लाभ होतो.

ABHA Card

आभा कार्ड कसे बनवावे

How to Create ABHA Card

आभा कार्ड ABHA Card काढण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला http://nehmi.gov.in/ या वेबसाईटला भेट द्यावी लागेल त्यानंतर आयुष्यमान भारत डिजिटल मिशन तुमच्यासमोर ओपन होईल.

त्यामध्ये क्रिएट आभा कार्ड ABHA Card नंबर या नावावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.

यापुढे तुम्हाला तिथे एक तर तुमचा आधार कार्डचा नंबर किंवा तुमचे ड्रायव्हिंग लायसन वापरून आभा हेल्थ कार्ड काढू शकता.

जर तुम्हाला तुमचे आभा कार्ड Abha Card हे आधार कार्ड वापरून काढायचं असेल तर त्यासाठी तुमचा आधार नंबर हा मोबाईलशी लिंक असणे गरजेचे आहे.

त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करावे लागेल नंतर तुमच्यासमोर दुसरे पेज ओपन होईल त्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि तेथील सूचना काळजीपूर्वक वाचायच्या आहेत.

जर तुम्ही सर्व माहिती भरलेली आहे त्यानंतर सहमत असाल तर तेथील रकान्यात क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक छोटासा खाली प्रश्न येईल त्या प्रश्नाचे उत्तर लिहून नेक्स्ट या बटन वर क्लिक करावे लागेल.

नंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी तिथे टाकावा लागेल नंतर पुन्हा तुमच्यासमोर दुसरे पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुमच्या आधार कार्ड वरील नाव, लिंग, फोटो, जन्मतारीख, पत्ता इत्यादी संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी लागेल.

आधार अथेंटीकेशन सक्सेसफुल झाल्याची सूचना तुम्हाला तिथे दिसेल, त्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करा नंतर तुमच्या स्क्रीनवर अजून एक नवीन पेज ओपन होईल तिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जो की तुमच्या आधार कार्डची लिंक आहे नंतर पुन्हा तुम्हाला नेक्स्ट या बटन वर क्लिक करायचा आहे

त्यानंतर तुम्हाला आवश्यक असल्यास तुमचा मेल आयडी ही तुम्ही आभा कार्डच्या क्रमांकाची जोडू शकता नंतर तुमच्या स्क्रीनवर आभा कार्ड ABHA Card नंबर तयार झाल्याचा मेसेज दिसेल त्याखाली आभा कार्ड नंबर नमूद केलेला असेल पुढे आभा कार्ड ऍड्रेस या बटन वर क्लिक करावे लागेल

तिथे सुरुवातीला तुम्हाला तुमचे प्रोफाईल डिटेल्स दाखवले जातील ते तुम्ही व्यवस्थित टाकले आहे का हे नीट तुम्हाला वाचून घ्यावे लागेल आणि नंतर तुम्हाला आभा कार्ड ABHA Card तयार करावा लागेल

त्यानंतरच्या रकान्यामध्ये तुम्ही तुमचं नाव, जन्मतारीख यापैकी जे लक्षात राहील आणि तुम्हाला जे सोपं आहे ते टाकून आभा ॲड्रेस तयार करू शकता नंतर क्रिएट अँड लिंक या पर्यायावर क्लिक करा.  तुमचा आभा कार्ड नंबर ऍड्रेस लिंक झाल्याचा मेसेज तुम्हाला स्क्रीनवर येईल अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या आभा हेल्थ कार्ड बनवू शकता.

आभा कार्ड डाऊनलोड कसे करावे?

How to download ABHA Card?

आभा कार्ड ABHA Card डाऊनलोड करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला या healthid.ndhm.gov.in अधिकृत वेबसाईटला भेट द्यावि लागेल

वेबसाईटच्या होम पेजवर लॉगिन करून लिंक वर क्लिक करावे लागेल त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज ओपन होईल त्यावर तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकून लॉगिन करायचे आहे.

त्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो ओटीपी इथे टाकून  लॉगिन करावे त्यानंतर तुम्हाला आभा कार्ड Abha Card डाउनलोड हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा आणि आपले आभा कार्ड सोप्या पद्धतीने डाउनलोड करून घ्या.

आभा कार्ड साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

Documents of ABHA Card

आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन

मोबाईल नंबर

पासपोर्ट साईज फोटो

आयुष्मान कार्ड आणि आभा हेल्थ कार्ड यामधील फरक

Difference between Ayushyaman card and ABHA health Card

आयुष्मान कार्ड हेल्थ इन्शुरन्स आहे, आणि आभा कार्ड हे डिजिटल अकाउंट आहे.

आयुष्यमान कार्ड हे गरीब कुटुंबातील लोकांसाठी आहे, तर आभा कार्ड हे देशातील कोणताही व्यक्तीसाठी काढू शकतो.

आयुष्मान कार्ड साठी उपचारादरम्यान तुम्हाला आर्थिक मदत मिळते, तर आभा कार्ड उपचारादरम्यान तुम्हाची वैद्यकीय हिस्ट्री समजून घेता येते.

आयुष्मान कार्ड हे शहर आणि ग्रामीण भागात वेगवेगळे बनवण्याचा नियम आहे, तर आभा कार्ड काढण्यासाठी कोणताही नियम लागू नाही.

FAQ

आभा कार्ड म्हणजे काय ?

आभा कार्ड हे तुमचे डिजिटल अकाउंट आहे. यावर तुमच्या आरोग्याच्या संबंधित संपूर्ण माहिती डिजिटल पद्धतीने सेव केली जाते. त्यामुळे तुमची आरोग्यासंबंधीची कागदपत्रे गहाळ होत नाहीत आणि सुरक्षित राहतात.

आभा कार्ड कोणाला काढता येते?

देशातील कोणताही व्यक्ती आभा कार्ड काढू शकतो

आभा कार्डसाठी कुठले ॲप आहे का?

हो तुम्हाला प्ले स्टोर वरून आबा ॲप या नावाचे आहे ते तुम्ही डाऊनलोड करू शकता

आभा कार्डचा फायदा काय?

आभा कार्ड नंबर मुळे तुमची संपूर्ण आरोग्यासंबंधीची माहिती डिजिटल पद्धतीने सेव होत असल्याने महत्वाची कागदपत्रे गहाळ होण्याचा धोका राहत नाही.

ABHA कार्डचे संक्षिप्त रूप काय?

आभा कार्ड म्हणजे आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट.