About Us

https://yojanamazi.com/wp-login.php

नमस्कार,

सर्व मराठी वाचकांचे सर्वात आधी आपल्या ‘योजना माझी’ या मराठी लोकप्रिय वेबसाईटवर मनापासून स्वागत आहे. ‘योजना माझी’ ही वेबसाईट तुम्हाला केंद्र सरकार आणि राज्य सरकारद्वारे सुरू केलेल्या विविध योजनाची परीपूर्ण माहिती देण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. यावर तुम्हाला देशभरातील नागरिकांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने सुरू केलेल्या विविध योजनेची परिपूर्ण आणि अधिकृत माहिती दिली जाणार आहे. या विविध योजनेची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या मातृभाषेत म्हणजेच मराठीमध्ये वाचायला मिळेल.

सरकारने देशातील सर्वसामान्य नागरिक, महिला, मुली, वृद्ध आणि विशेष करून शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या विविध योजनांची माहिती एकाच ठिकाणी वाचकांना मिळणार आहे. त्यामुळे वाचकांना इतर ठिकाणी माहिती मिळवण्यासाठी जाण्याची गरज पडणार नाही. योजने संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला yojanamazi.com या वेबसाईटला भेट दिल्यानंतर मिळून जाईल. त्या योजनाचा लाभ कसा घ्यायचा,  त्यासाठी काय पात्रता आहे, त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे काय लागतील, अर्ज कसा व कुठे करावा या सर्व विषयांची माहिती आम्ही तुम्हाला आपल्या या वेबसईटवरून देणार आहोत. यासाठी तुमचे सहकार्य आमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. तुम्हाला कुठल्याही योजनेची माहिती मिळवायची असेल तर आपल्या ‘योजना माझी’ या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका… तुम्हालाही योजनेची माहिती आवडल्यास तुमच्या नातेवाईक आणि मित्रांनाही या बद्दल माहिती द्या, म्हणजे त्यांनाही या वेबसाईटवर असलेल्या विविध योजनाचा लाभ घेता येईल.

केंद्र आणि राज्य सरकार मिळून सर्वसामन्यांच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना सुरू करत असते. मात्र अनेकांना या योजनांची परिपूर्ण माहिती न मिळाल्यामुळे ते या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहतात. पण आता ‘योजना माझी’ या वेबसाइटच्या माध्यमातून या सर्व योजनांची माहिती तुम्हाला एकाच ठिकाणी मिळेल. त्यासाठी yojanamazi.com या आपल्या वेबसाइटला भेट देऊन तुम्ही विविध योजनांची माहिती मिळवून योजनांचा लाभ घेऊ शकता.