Abua Swasthya Bima Yojana 2024 In Marathi : नागरिकांना मिळणार 15 लाख रुपयांचे मोफत उपचार
Abua Swasthya Bima Yojana : झारखंड राज्यातील असे अनेक परिवार आहेत ज्यांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळालेला नाही. जे या योजनेपासून वंचित आहेत अशा वंचित कुटुंबातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा देण्यासाठी राज्य सरकार द्वारे अबुआ आरोग्य विमा योजना ची सुरुवात करण्यात आली आहे. याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी केली आहे. 26 जून 2024 ला मुख्यमंत्री विमा योजना 2024 Abua Swasthya Bima Yojana 2024 लागू करण्याची घोषणा केली होती. या अंतर्गत पात्र कुटुंबीयांना 15 लाख रुपयांचा मोफत उपचार दिला जाणार आहे.
Abua Swasthya Bima Yojana ही योजना आयुष्यमान भारत योजनेच्या धरतीवर चालवली जात आहे. याची पात्रता पूर्ण करणाऱ्या कुटुंबीयांना याचा लाभ दिला जातो. या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला या योजनेची पात्रता, अटी शर्ती, लागणारे आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आदी बद्दल माहिती देणार आहोत.
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला या योजनेचे लाभ आणि अन्य माहिती असणे आवश्यक आहे. कारण कुठल्याही अडचणी शिवाय तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्यासाठी हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचा.
अबुआ आरोग्य विमा योजना म्हणजे काय
What Is Abua Swasthya Bima Yojana
Abua Swasthya Bima Yojana 2024 In Marathi आयुष्यमान भारत योजनेच्या धर्तीवर झारखंड सरकारने अबुआ स्वास्थ्य विमा योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी कुटुंबांना 15 लाख रुपयांचे मोफत उपचार सुविधा देण्यात येणार आहेत, तर आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार करण्यात येतात. तर अबुआ आरोग्य विमा योजनेच्या माध्यमातून 15 लाख पर्यंत मोफत उपचार करता येणार आहेत.
या योजनेमध्ये गंभीरातील गंभीर आजारांवर उपचार करण्यात येणार आहेत. राज्यात सुरू असलेली मुख्यमंत्री गंभीर बीमा योजना या योजनेत मर्ज करण्यात आलेली आहे. पात्रता नुसार राशन कार्ड धारक कुटुंबातील जे लोक गरिबरेषा खालील जीवन जगत आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे जे नागरिक या योजनेची पात्रता पूर्ण करतील त्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
अबुआ आरोग्य विमा योजना 2024 लाभ काय
Abua Swasthya Bima Yojana Benefits
- अबुआ स्वास्थ्य विमा योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील नागरिकांना 50 लाख रुपये पर्यंतचे मोफत उपचार देण्यात येणार आहेत.
- या योजनेचा लाभ राज्यातील 33 लाख नागरिकांना होणार आहे.
- गरीब कुटुंबातील लोक आता 15 लाखापर्यंत मोफत उपचार करू शकतात.
- ज्यांना गंभीर आजार आहेत त्यांनाही या योजनेचा मोठा लाभ होणार आहे त्यासाठी लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज करून नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
- या योजनेचा लाभ आयुष्यमान भारत योजने पासून जे वंचित नागरिक आहेत त्यांनाच दिला जाणार आहे.
मुख्यमंत्री मैय्या सन्मान योजना
अबुआ स्वास्थ्य विमा योजनेची पात्रता
Abua Swasthya Bima Yojana Eligibility
- अबुआ आरोग्य विमा योजनेचा लाभ केवळ झारखंड राज्यातील नागरिकांनाच मिळणार आहे.
- यासाठी नागरिकाकडे लाल, हिरवे, गुलाबी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे.
- गरिब रेषा खालील नागरिकांना त्या योजनेचा लाभ दिला जाईल.
- ज्या नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळाला नाही अशा नागरिकांनाच मिळेल.
अबुआ स्वास्थ्य विमा योजनेसाठीची कागदपत्रे
Abua Swasthya Bima Yojana Documents
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- उत्पन्न प्रमाणपत्र
- जातीचे प्रमाणपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट आकाराचा फोटो