Ladki bahin yojana e-kyc date will end before 18 November 2025 information about Aditi tatkare : या तारखेपर्यंत करा e-kyc

Ladki Bahin Yojana E-KYC in marathi : संधी चुकली तर नाही मिळणार 1500 रुपये

adki bahin yojana e-kyc date will end before 18 November 2025 information about Aditi tatkare : लाडक्या बहिणींकडून ऑक्टोंबर महिन्याचा मिळणारा 15 व्या हप्त्याची मोठ्या प्रमाणात प्रतीक्षा होत आहे. या दरम्यान सरकारची ई- केवायसी संदर्भात मोठा अपडेट समोर आला आहे.

या शेवटच्या तारखेपर्यंत जर तुम्ही लाडक्या बहिणींनी केवायसी केली नाही तर तुमचा लाडक्या बहिणीचा लाभ बंद होऊ शकतो. चला जाणून घेऊया कुठली आहे शेवटची तारीख..

राज्यातील लाडक्या बहिणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. यादरम्यान राज्य सरकारकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी पुढील हप्त्यापूर्वी महत्त्वाची माहिती दिली आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात मंत्रालयामध्ये बुधवारी महत्त्वाची बैठक झाली.

माझी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने पुन्हा एकदा ई-केवायसी प्रक्रिया आवश्यक केली आहे. आदिती तटकरे यांनी सोशल मीडिया एक्स या अकाउंट वरूनही माहिती दिली आहे. त्यानुसार सर्व पात्र लाभार्थी महिलांनी 18 नोव्हेंबर पूर्वी आपली ई केवायसी करणे बंधनकारक आहे.

यासंदर्भात बुधवारी एक महत्त्वाची बैठक झाली. माझी लाडकी बहीण योजना मध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ई केवायसी करणे आवश्यक आहे, जेणेकरून पात्र महिलांना कुठल्याही अडचणी शिवाय मदत मिळत राहील अशी माहिती तटकरे यांनी दिली.

लाभार्थी महिलांना मंत्र्यांचे आवाहन

लाडकी बहीण योजनाच्या आर्टिफिशियल पोर्टलवर 18 सप्टेंबर 2025 ला ई- केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या इ केवायसी साठी दोन महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. राज्यातील अनेक लाडक्या बहिणींनी केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली आहे.

मात्र अजूनही काही महिलांची केवायसी करण्याची प्रक्रिया बाकी आहे, अशा सर्व लाभार्थी महिलांना 18 नोव्हेंबर पूर्वी आपली केवायसी करावी असे आवाहन आदिती तटकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून केले आहे. यापूर्वी केवायसी करताना लाडक्या बहिणींना अनेक तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागला होता.

यामुळे देवेंद्र फडणवीस सरकारने ही केवायसी प्रक्रिया काही काळासाठी थांबवली होती. मात्र आता पुन्हा ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आणि 18 नोव्हेंबर ही ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख आहे. यापूर्वी राज्यातील लाभार्थी महिलांनी आपली केवायसी करावी असे सरकारकडून सांगण्यात येत आहे.

अशी करा काही क्षणात e-kyc

केवायसीसाठी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर जा. तिथे गेल्यानंतर तुम्हाला पोर्टलवर ई- केवायसी हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर नवीन पर्याय उघडेल. समोर असलेल्या बॉक्समध्ये तुमचा रजिस्टर नंबर टाका. कॅपच्या कोड भरा.

आता तुम्हाला आधार द्वारे व्हेरिफिकेशन मंजुरी द्यावी लागेल. यासाठी “मी सहमत आहे” यावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर ओटीपी वर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल. तो तिथे टाका. पुढे जी माहिती मागविण्यात येईल ती भरत रहा.

स्वतःचा आधार ओटीपी झाल्यानंतर पतीचा आधार ओटीपी व्हेरिफिकेशन करा आणि अशा पद्धतीने तुम्ही लाडक्या बहिणीची केवायसी घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता.

कधी मिळणार 1500 रुपये

दिवाळी होऊन गेली तरी लाडक्या बहिणींना पंधराव्या हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत. अशा होती की दिवाळीला पैसे मिळतील मात्र असे झाले नाही. असे सांगितले जात आहे की नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये ऑक्टोंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात.

मात्र 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसीची प्रक्रिया असल्याने ही शक्यता कमी दिसत आहे. असू शकते की महिलांना यावेळी थोडी अधिक प्रतीक्षा करावी लागू शकते. त्यामुळे लाभार्थी महिलांना आवाहन करण्यात येत आहे की लवकरात लवकर त्यांनी आपली ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी.