APAAR ID Card : नक्की काय आहे अपार आयडी कार्ड
APAAR ID Card : आज आपण सुरुवातीला या लेखाच्या माध्यमातून अपार आयडीचे लघुरूप काय आहे हे पाहणार आहोत. त्याचबरोबर अपार आयडी ची संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण पाहू.
APAAR ID Card अपार आयडी कार्ड कोणासाठी असते? ते काय काम करते? कोणाला लाभ घेता येतो? याची सविस्तर माहिती त्याचबरोबर अपार आयडी कार्ड कसे काढावे याची माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण आज पाहू..
सर्वप्रथम अपार आयडी चे लघुरूप ऑटोमेटेड परमनंट अकॅडमी अकाउंट रजिस्ट्री हे आहे. अपार आयडी कार्ड हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत शिक्षण मंत्रालय आणि भारत सरकारने सुरू केलेला एक अप्रतिम महत्त्वाचा उपक्रम आहे.
What Is APAAR ID Card
देशातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक रेकॉर्ड डिजिटल पद्धतीने संग्रहित करणारा 12 अंकाचा एक खास आयडी देते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा इंटिग्रेटेड आयडेंटिफिकेशन सिस्टीम तयार होणार आहे. APAAR ID Card अपार आयडी कार्ड विद्यार्थ्यांना एक विशिष्ट ओळख देण्याचा प्रयत्न करते. जसे आपल्याकडे आधार कार्ड असते तसेच आता विद्यार्थ्यांकडे अपार आयडी असणार आहे.
हे वन नेशन वन स्टुडन्ट आयडी कार्ड One Nation One Student ID शैक्षणिक प्रगतीचे निरीक्षण करण्याची प्रक्रिया सोपी करणार असून देशात एक अनोखा शैक्षणिक अनुभव देखील देणार आहे. One Nation One Student ID हे कार्ड संपूर्ण भारतातील शाळा, महाविद्यालय, विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मिळणार असून यावर एक 12 अंकी ओळखपत्र क्रमांक देण्यात येतो. त्यामुळे शैक्षणिक रेकॉर्ड डिजिटल पद्धतीने सेव केले जाते.
APAAR ID Card अपार कार्ड हे विद्यार्थ्यांना त्यांचे संपूर्ण शैक्षणिक रेकॉर्ड, बक्षिसे, पदव्या, शिष्यवृत्ती आणि इतर शैक्षणिक यश एकत्र ठेवण्याचा सोपा मार्ग प्रदान करणार आहे.
अपार आयडी साठी काय आहे महत्त्वाचे
APAAR ID Documents
आपार आयडी साठी युनिक स्टुडन्ट आयडेंटिफायर PEN
विद्यार्थ्यांचे नाव
विद्यार्थ्याचे जन्मतारीख
लिंग
आईचे नाव
वडिलांचे नाव
आधारनुसार नाव
आधार क्रमांक
मोबाईल नंबर
अपार आयडी संमती अर्ज कसा करावा
APAAR ID Card Apply Online
- अपार आयडी संमती अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी सर्वप्रथम अपार वेबसाईटवर apaar.education.gov.in जा
- त्यानंतर रिसोर्सेस सेक्शन मध्ये जा
- त्यानंतर अपार पालक संमती फॉर्म म्हणजेच अपार पेरेंटल कन्सेंट डाउनलोड करा
- त्यानंतर आवश्यक माहिती अर्जात भरा
- संबंधित शाळा किंवा शैक्षणिक संस्थाकडे तो अर्ज जमा करा
- आपल्या मुलाने यापुढे अपार आयडी कार्यक्रमाचा भाग होऊ नये असं वाटत असल्यास पालक कधीही त्याची संमती मागे घेऊ शकतात.
अपार आयडी कार्डसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसे कराल
APAAR ID Card Online Registration
- ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यासाठी शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिट बँकेच्या वेबसाईटवर जा
- माय अकाउंट यावर क्लिक करा
- त्यानंतर स्टुडन्ट निवडा नोंदणी करा जिथे विद्यार्थ्यांना त्यांचा आधार क्रमांक आणि इतर तपशील द्यावा लागेल
- डीजे लोकर वर लॉगिन करा त्यानंतर केवायसी पडताळणीसाठी आधारचा तपशील द्या
- त्यानंतर शाळेचे नाव, वर्ग, अभ्यासक्रम, तपशील यासारखी आवश्यक माहिती भरा
- त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करा
- त्यानंतर तुमचे अपार ओळखपत्र तयार केले जाईल
अपार आयडी कार्ड डाऊनलोड कसा करावा
How To Download APAAR ID Card
- शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिट केबीसी बँकेच्या वेबसाईटवर लॉगिन करा
- त्यानंतर डॅशबोर्ड मध्ये आपार कार्ड डाउनलोड हा पर्याय शोधा
- त्यानंतर डाउनलोड किंवा प्रिंट हा पर्याय निवडा
- त्यानंतर तुमचे कार्ड डाउनलोड होईल किंवा तुम्हाला प्रिंट करून घेता येईल.