Asmita Yojana 2024 Information : अस्मिता योजना 2024 मराठी माहिती
Asmita Yojana 2024 : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांचा विचार करून अस्मिता योजना सुरू केली आहे. महिलांचा व मुलींचा सामाजिक तसेच आर्थिक विकास व्हावा हा अस्मिता योजना मागचा उद्देश आहे. महिला सशक्त व आत्मनिर्भर होण्यासाठी सरकार सतत प्रयत्नशील असते, त्यामुळे सरकार विविध योजना अमलात आणते. अशाच एका योजनेचची आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. ती योजना म्हणजे Asmita Yojana अस्मिता योजना. महाराष्ट्र सरकारने महिलांना सशक्त व आत्मनिर्भर बनवण्यासाठी व सक्षमीकरणाच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी आणि मुलींसाठी अस्मिता योजनेची सुरुवात केली. या योजनेची सुरुवात 8 मार्च 2018 रोजी करण्यात आली. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिला व मुली तसेच जिल्हा परिषद शाळेमधील किशोरवयीन म्हणजेच 11 ते 19 वयोगटातील मुली यांना अत्यंत कमी दरात सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करण्यात येते. या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिला व मुलींसाठी व जिल्हा परिषद शाळेमधील मुलींना अगदी कमी दरात सॅनिटरी नॅपकिन वाटप होते. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील महिला व मुलींना मासिक पाळीच्या दरम्यान वैयक्तिक स्वच्छतेच्या अभावी भरपूर समस्यांना सामोरे जावे लागते. ग्रामीण भागामध्ये आज देखील मासिक पाळी बद्दल बरेच गैरसमज आहेत तसेच ग्रामीण भागामधील मुलींना व महिलांना सॅनेटरी नॅपकिन महाग असल्यामुळे ते त्या विकत घेऊ शकत नाहीत. आणि ते त्यांनी न वापरल्यामुळे त्यांना विविध प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते. जिल्हा परिषद शाळांच्या माध्यमातून व ग्रामीण भागातील मुलींना व महिलांना स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण होण्यासाठी अस्मिता योजनेची Asmita Yojana सुरुवात करण्यात आली आहे. आजच्या लेखात आपण अस्मिता योजना म्हणजे काय, या योजनेचा लाभ कोणाला होतो, अस्मिता योजनेची काय आहेत फायदे, याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
अस्मिता योजना म्हणजे काय?
What Is Asmita Yojana Maharashtra
Asmita Yojana महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील महिलांना व किशोरवयीन मुलींना त्यांच्या मासिक पाळी दरम्यान स्वच्छते वैयक्तिक स्वच्छतेच्या बाबतीत भरपूर त्रास सहन करावा लागतो, आणि अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ग्रामीण भागात महिलांच्या मासिक पाळी बद्दल बरेच गैरसमज निर्माण झाले आहेत. नॅपकिन हे महाग असल्यामुळे ग्रामीण भागातील महिला आणि मुली हे नॅपकिन विकत घेऊ शकत नाहीत आणि ते त्या वापरू शकत नाही. त्यामुळे त्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. या मुलींना व महिलांना कमी दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत अस्मिता योजनेची सुरुवात केली आहे. Asmita Yojana योजनेचे एक मोबाईल ॲप्लिकेशन आहे, आणि डिजिटल अस्मिता कार्ड देखील सुरू करण्यात आले आहे. याचा वापर करून अस्मिता योजनेचा लाभ ग्रामीण भागातील महिलांना, किशोरवयीन मुलींना तसेच जिल्हा परिषद शाळेतील मुलींना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो आणि त्यामुळे त्यांचे आरोग्य देखील चांगले राहते.
ठळक मुद्दे :
अस्मिता योजना म्हणजे काय?
What Is Asmita Yojana Maharashtra
अस्मिता योजनेबद्दल थोडक्यात माहिती
Asmita Yojana Maharashtra In Short
अस्मिता योजनेचे उद्देश
Asmita Yojana Purpose
अस्मिता योजनेची वैशिष्ट्ये
Asmita Yojana Maharashtra Features
अस्मिता योजनेचे लाभार्थी
Asmita Yojana Eligibility
कसे मिळेल अस्मिता कार्ड
Asmita Yojana Maharashtra
अस्मिता योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे
Asmita Yojana Maharashtra Documents
अस्मिता योजना मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून कशी करता येईल नोंदणी
जिल्हा परिषद शाळांमधील किशोरवयीन मुलींसाठी अस्मिता योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया
FAQ’s
अस्मिता योजनेबद्दल थोडक्यात माहिती
Asmita Yojana Maharashtra In Short
योजनेचे नाव | अस्मिता योजना |
कोणी सुरू केली | महाराष्ट्र सरकार |
कधी सुरू झाली | 8 मार्च 2018 |
लाभार्थी | ग्रामीण भागातील महिला व किशोरवयीन मुली |
अधिकृत वेबसाईट | https://regasmita.mahaonline.gov.in/ |
Asmita Yojana Purpose
- महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील महिला व किशोरवयीन मुली तसेच जिल्हा परिषद शाळेमधील 11 ते 19 या वयोगटातील मुलींना सॅनिटारी नॅपकिन अत्यंत कमी दरात उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. जेणेकरून त्यांची वैयक्तिक स्वच्छता संदर्भात जागृती निर्माण होईल.
- महाराष्ट्र राज्यातील महिलांचे व मुलींचे जीवनमान सुधारेल.
- महिलांना, किशोरवयीनी मुलींना अत्यंत कमी दरामध्ये सॅनिटरी नॅपकिन चा पुरावाठा करणे व उपलब्ध करून देणे
अस्मिता योजनेची वैशिष्ट्ये
Asmita Yojana Maharashtra Features
- ग्रामीण भागातील महिलांचे व मुलींचे जीवनमान सुधारणे व त्यांचे बाबतीतले मासिक पाळीचे, व्ययक्तीक स्वच्छतेची जाणीव निर्माण होण्यासाठी अस्मिता योजना ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे.
- मासिक पाळी मधील स्वच्छता न पाळल्यामुळे अनेक अडचणींचा सामना आणि आजारांचा सामना करावा लागतो ते थांबवणे हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे.
- महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून ग्राम विकास विभागातर्फे अस्मिता योजनेची सुरुवात करण्यात आली.
- Asmita Yojana अस्मिता योजनेअंतर्गत स्वयंसहायता समूहाची सॅनेटरी नॅपकिन ची मागणी करण्यासाठी अस्मिता योजना हे मोबाईल ॲप्लिकेशन सुरू करण्यात आले.
- जिल्हा परिषद शाळेमधील 11 ते 19 वयोगटातील किशोरवयीन मुलींसाठी अस्मिता योजना राबविण्यात आली आहे.
- या योजनेदरम्यान मुलींना अस्मिता कार्ड देखील देण्यात येते.
- या योजनेमुळे महिलांचे व मुलींचे जीवनमान सुधारते त्यांना कुठल्याही अडचणींचा आजारांचा सामना करावा लागत नाही.
अस्मिता योजनेचे लाभार्थी
Asmita Yojana Eligibility
महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील महिला व मुली तसेच जिल्हा परिषद शाळेमधील 11 ते 19 वयोगटातील किशोरवयीन मुली या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.
कसे मिळेल अस्मिता कार्ड
Asmita Yojana Maharashtra
Asmita Yojana अस्मिता योजनेअंतर्गत लाभार्थी मुलींना अस्मिता कार्ड देण्यात येते. या कार्डच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेमधील किशोरवयीन मुली 11 ते 19 वयोगटातील या वयोगटातील मुलींना अत्यंत कमी दरात मिळवता येईल या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा परिषद शाळा मधील मुलींना त्यांचे नाव आपले सरकार सेवा केंद्र मार्फत नोंदणी करून घ्यावे लागेल, नोंदणी झाल्यानंतर मुलींना अस्मिता योजना अंतर्गत अस्मिता योजना कार्ड दिले जाईल, त्यानंतर लाभार्थी मुलींना बचत गटाकडून सॅनेटरी नॅपकिन ची खरेदी करता येईल. अस्मिता कार्ड अंतर्गत सरकार कडून बचत गटांना पॅकेटच्या संख्येच्या प्रमाणात प्रति पॅकेट 15.20 रुपयांप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत किशोरवयीन मुलींना वर्षभरात एकूण 13 सॅनिटरी नॅपकिनचे पॅकेट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
अस्मिता योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे
Asmita Yojana Maharashtra Documents
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- जन्म प्रमाणपत्र
- बोनफाईड बाक खाते पासबूक
- रहिवासी प्रमाणपत्र
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- जातीचे प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचे फोटो
अस्मिता योजना मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून कशी करता येईल नोंदणी
अस्मिता योजनेअंतर्गत उमेदद्वारे नॅपकिन मागणी नोंदणी नोंदवावी लागेल व त्यासाठी त्यांचा पुरवठा करण्यासाठी अस्मिता नावाच्या मोबाईल अॅप्लिकेशनचा वापर करावा लागेल स्वयंसहायता गटांनी नोंदणीसाठी सर्वप्रथम प्ले-स्टोअर वरून अस्मिता ॲप डाऊनलोड करावे लागेल.
त्यानंतर स्वयंसहायता गटांनी त्या ॲपवर NIC कोड टाकावा लागेल.
स्वयंसहायता गटांच्या नोंदणीकृत मोबाईलवर नोंदणी साठी ओटीपी येईल तो ओटीपी टाकावा लागेल.
जर एखाद्या स्वयंसहायता गटांचा मोबाईल नंबर हा NIC च्या SHG पोर्टलवर नोंदणी झालेला नसेल तर त्यांना त्या गटांना अस्मिता ॲपवर नोंदणी करता येणार नाही. त्यासाठी त्यांनी मोबाईल नंबरची नोंदणी करणे आवश्यक आहे.
अस्मिता ॲप वरून सॅनिटरी नॅपकिन ची ऑनलाईन मागणी करण्यासाठी अस्मिता ॲप मध्ये असलेल्या वॉलेट मध्ये पुरेशी रक्कम असणे आवश्यक आहे जर त्यात पुरेशी रक्कम नसेल तर रिचार्ज करावे लागेल हे रिचार्ज तुम्हाला कोणत्याही आपले सरकार सेवा केंद्र द्वारे करता येईल किंवा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड चा वापर करून देखील तुम्ही रिचार्ज करू शकता
प्रत्येक प्रकारच्या सॅनिटरी नॅपकिनची मागणी नोंदविताना ही 140 पॅकेटच्या पटीत नोंदविणे आवश्यक आहे. जसे की 240 मी.मी.चे किमान 140 पॅकेट किंवा 280 मी.मी.चे किमान 140 पॅकेट किंवा मुलींसाठी 240 मी.मी.चे किमान 140 पॅकेट अशा प्रकारे नोंदणी नोंदवणे आवश्यक आहे.
त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर एसएमएस पाठवला जाईल आणि त्यानंतर सॅनिटरी नॅपकिन ची किंमत ही तुमच्या वॉलेट मधून डेबिट केली जाईल
त्यानंतर तालुका पातळीवरील वितरकाकडून हे नॅपकिन त्यांच्या संबंधित स्वयंसहायता गटाकडे प्राप्त करून घेतील आणि अस्मिता पावती बद्दल नोंदणी करतील.
जिल्हा परिषद शाळांमधील किशोरवयीन मुलींसाठी अस्मिता योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया
जिल्हा परिषद शाळेमध्ये 11 ते 19 वयोगटातील किशोरवयीन मुलींसाठी ही योजना राबवण्यात आलेली असून आलेली आहे.
या मुलींना अत्यंत कमी दराने सॅनेटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यात येते. त्यांना 8 नॅपकिन चे 1 पॅकेट 5 रुपये या दरात उपलब्ध करून देण्यात येते.
प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमधील मुलीकडे अस्मिता कार्ड असणे आवश्यक आहे.
जिल्हा परिषद शाळेमध्ये नोंदविलेल्या यादीमध्ये 11 ते 19 वयोगटातील सर्व मुलींची यादी मुख्याध्यापक यांच्या स्वाक्षरीने ग्रामपंचायतीच्या आपले सरकार सेवा केंद्रात प्रत्येक शाळेला जमा करावी लागेल.
त्यानंतर शाळेतील किशोरवयीन मुलींची नोंदणी आपले सरकार सेवा केंद्राचे केंद्रप्रमुख गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये जाऊन करतील यासाठी मुलींकडून कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही.
फक्त प्रत्येक मुलीच्या नोंदणी करता 5 रुपये प्रमाणे नोंदणी फिस शासनाकडून जमा करण्यात येईल.
त्यानंतर नोंदणी झालेल्या सर्व मुलींचे अस्मिता कार्ड बनवण्यात येईल आणि ते उमेद मार्फत जिल्हा परिषद शाळेत पोहोचवण्यात येईल.
अस्मिता कार्ड मिळाल्यानंतर स्वयंसहायता गटाकडून मुलींना 5 रुपये किमतीत सॅनिटरी नॅपकिन विकत घेता येईल.
हे सॅनिटरी नॅपकिन विकत घेताना मुली जवळ तिचे अस्मिता कार्ड असणे आवश्यक आहे त्या अस्मिता कार्ड वरील किंवा कोड रीड केल्याशिवाय स्वयंसहायता गटांना हे विकता येणार नाही.
आशा प्रकारे तुम्ही लाभ मिळवू शकता.
FAQ’s
प्रश्न: अस्मिता योजनेची सुरुवात कधी झाली?
उत्तर: अस्मिता योजनेची सुरुवात 8 मार्च 2018 रोजी झाली.
प्रश्न: अस्मिता योजनेचा कोणाला होतो लाभ?
उत्तर: अस्मिता योजनेचा लाभ ग्रामीण भागातील महिला व मुली तसेच जिल्हा परिषद शाळेतील 11 ते 19 वयोगटातील किशोरवयीन मुलींना होतो.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA