ATM PF Withdrawal 2024 Update In Marathi : आता ATM मधून तुमचा PF काढता येणार

ATM PF Withdrawal 2024 Update In marathi : EPFO ची मोठी अपडेट

ATM PF Withdrawal : जे नोकरदार वर्ग आहे त्यांचा प्रत्येकाचा पीएफ त्यांच्या खात्यात जमा होतो. त्यांच्या पगारीतून एक ठराविक रक्कम पीएफ म्हणून जमा होत असते. तर आता तो पीएफ तुम्हाला ATM द्वारे काढता येणार आहे. तर एटीएम मधून पीएफ कसा काढता येईल आणि कोण काढू शकेल याची संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण आज पाहणार आहोत. 2025 पासून एटीएम मधून पीएफ म्हणजेच प्रॉव्हिडंट फंड तुम्ही काढू शकणार आहात.

सध्या नागरिकांना पीएफ काढायचा असेल तर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पीएफ रक्कम काढण्यासाठी अर्ज केल्यावर त्या अर्जावर एक आठवडा तरी प्रतीक्षा करावी लागते. त्यानंतर अर्ज तांत्रिक कारणासाठी रद्द देखील होऊ शकतो. पीएफची रक्कम तुमच्या खात्यात जमा होण्यासाठी बऱ्याच दिवसांचा कालावधी लागतो. क्लेम रिजेक्ट होण्याच्या घटना वाढल्या आहेत. कर्मचाऱ्यांनी अशा बऱ्याच तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे EPFO ने बँक खात्याप्रमाणेच पीएफ रक्कम काढण्यासाठी एटीएमची सुविधा देण्याची घोषणा केली आहे.

ATM PF Withdrawal

कोणाला काढता येईल एटीएम मधून पीएफ

EPFO सदस्य आणि त्यांचे वारसदार एटीएम चा उपयोग करून पीएफ वरील जमा रकमेवर दावा करू शकतात. ईपीएफओ बँक खाते आणि ईपीएफ खाते यांना जोडण्याची परवानगी देते. परंतु सध्या हे स्पष्ट झाले नाही की, ते थेट एटीएम मधून रक्कम काढण्यासाठी कोणते तंत्र वापरणार आहेत.

ATM PF Withdrawalकर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदारांना एटीएम चा वापर करून त्याच्या पीएफ खात्यातील रक्कम काढता येईल, परंतु त्यासाठी वारसदाराचे देखील खाते कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्याशी जोडावे लागेल. याविषयीची अधिकृत माहिती अद्याप ईपीएफओ ने दिलेली नाही. सध्याच्या सूत्रांच्या माहितीनुसार एकूण रकमेवरील 50% रक्कम काढण्याची परवानगी सुरुवातीला देण्यात येणार आहे. मयताच्या वारसदारांना ATM मधून पैसे काढता येतील. या योजनेअंतर्गत सदस्याच्या कुटुंबाला 7 लाख रुपये पर्यंतचा विमा दावा करता येईल ही रक्कम देखील वारसदाराला एटीएम मधून काढता येऊ शकेल.

कशी काढता येईल पीएफ ची रक्कम

EPFO च्या नियमानुसार बँक खात्याची जोडणी करणे आवश्यक आहे. ईपीएफ खात्याशी सदस्याचे बँक खाते जोडलेले असावे, परंतु अजूनही काही गोष्टी स्पष्ट केलेल्या नाहीत. रक्कम काढण्यासाठी बँकेचे एटीएम वापरता येणार की अजून दुसरे एखादे नवीन कार्ड देणार याची हे स्पष्ट झालेले नाही.

कधीपासून काढता येणार ही रक्कम

ATM PF Withdrawalसरकार ईपीएफ कर्मचाऱ्याला एटीएम द्वारे रक्कम काढण्यासंबंध तजबीज करत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात ही बातमी समोर आली. त्यानुसार EPFO सदस्याला कर्मचाऱ्यांना त्यांच्या पीएफ खात्यातील जमा रकमेतील 50% रक्कम काढण्याचा पर्याय देण्यात येईल. आता ही सुविधा मे ते जून 2025 या काळात देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. EPFO 3.0 लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना एटीएम मधून त्यांचा PF काढता येणार आहे.