Ayushman Arogya Yojana Rajasthan 2025 In Marathi : आयुष्मान आरोग्य योजना

Ayushman Arogya Yojana Rajasthan 2025 In Marathi : आयुष्मान आरोग्य योजना

Ayushman Arogya Yojana Rajasthan 2025 In Marathi : मुख्यमंत्री आयुष्यमान आरोग्य योजना ही सरकारची एक प्रमुख आरोग्य विमा योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील आरोग्य सेवांचा विस्तार आणि सुधारणा करणे हा मुख्य उद्देश आहे.

mukhymantri ayushman arogya yojana ही योजना सुरू असलेल्या चिरंजीवी आरोग्य विमा योजनेवर आधारित आहे. तिला आता नवीन रूप देऊन मुख्यमंत्री आयुष्यमान आरोग्य योजना असे नाव देण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला आरोग्य समस्या सोडवण्यासाठी आर्थिक संरक्षण दिले जाते. जेणेकरून त्यांना उपचार घेण्यासाठी आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये.

mukhymantri ayushman arogya yojana मुख्यमंत्री आयुष्यमान आरोग्य योजना राजस्थान च्या माध्यमातून मोफत उपचार सुविधा राज्यातील बीपीएल कार्डधारक शेतकरी, राज्यातील कर्मचारी, गरीब आणि मध्यम कुटुंबातील व्यक्तींना दिले जातात. याव्यतिरिक्त अन्य कुटुंबातील व्यक्तींना 850 रुपये प्रति कुटुंब हा प्रीमियम भरून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

mukhymantri ayushman arogya yojana जर तुम्हालाही राजस्थान मुख्यमंत्री आयुष्यमान आरोग्य योजना योजनेसाठी अर्ज करून योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा. यामध्ये अर्ज कसा करावा या योजनेचा लाभ काय आहे? अर्ज कुठे करावा? पात्रता आणि त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे याची संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

योजनेची थोडक्यात माहिती

योजनेचे नावआयुष्यमान आरोग्य योजना
कोणी सुरू केलीराजस्थान सरकार
कधी सुरू केली19 फेब्रुवारी 2024
संबंधित विभागआरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग राजस्थान
उद्देशराज्यातील प्रत्येक कुटुंबाला आरोग्य विमा संरक्षण मिळावे
लाभार्थीराजस्थान मधील गरीब, मध्यम कुटुंबातील सर्व व्यक्ती
आरोग्य विमा रक्कम25 लाख रुपये
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
अधिकृत वेबसाईटsso.rajasthan.gov.in
हेल्पलाइन नंबर1800 18 021 17

मुख्यमंत्री आयुष्यमान आरोग्य योजनेची वैशिष्ट्ये

Mukhyamantri Arogya Yojana Rajasthan Features

  • या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील गरीब, मध्यमवर्गी कुटुंबातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे.
  • या योजनेअंतर्गत लाभार्थी कुठल्याही सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात जाऊन मोफत उपचार घेऊ शकतात.
  • या योजनेअंतर्गत रुग्णालयात भरती होण्यापूर्वी 5 दिवस आणि रुग्णालयातून सुट्टी मिळेपर्यंत 15 दिवस चा संपूर्ण खर्च कव्हर केला जातो.
  • या योजनेअंतर्गत राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम आणि सामाजिक आर्थिक जनगणना 2011 ते लाभार्थी तीनदा नोंदणी करणे आवश्यक नाही.
  • राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम आणि सामाजिक आर्थिक जनगणना 2011 ची पात्र कुटुंब छोटे शेतकरी व श्रमिक कामगार विमा प्रीमियम राज्य सरकार द्वारे दिला जाईल. मात्र अन्य कुटुंबातील व्यक्तींना 850 रुपये प्रति वर्ष असा प्रीमियम देऊन या योजनेचा लाभ घेता येईल.
  • या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी जनआधार नंबर किंवा जनआधार नोंदणी असने अनिवार्य आहे.

आवश्यक कागदपत्रे

Mukhyamantri Ayushman Arogya Yojana Rajasthan Documents

  • आधार कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • ऑनलाईन केलेल्या अर्जाची प्रत

योजनेसाठीची पात्रता

Mukhyamantri Ayushman Arogya Yojana Eligibility

  • अर्जदार शेतकरी हा राजस्थानचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार हा जनआधार नोंदणीकृत असला पाहिजे.
  • जर तुमच्याकडे जन आधार कार्ड नाही तर तुम्हाला अर्ज करण्यापूर्वी जनआधार नोंदणी करावी लागेल.
  • या योजनेचा लाभ राजस्थानातील सर्व कुटुंब घेऊ शकतात. मात्र काही कुटुंबांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी 850 रुपये प्रति वर्ष प्रीमियम द्यावा लागेल.

आयुष्यमान आरोग्य योजनेसाठी ची नोंदणी

Mukhyamantri Ayushman Arogya Yojana

Mukhyamantri Ayushman Arogya Yojana ज्या नागरिकांना या योजनेचा लाभ ऑगस्ट पासून घ्यायचा आहे त्यांनी 31 जुलैपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. यानंतर नोंदणी करणाऱ्या लाभार्थ्यांना लाभ घेण्यासाठी 3 महिने प्रतीक्षा करावी लागेल. 31 जुलै नंतर नोंदणी केल्यानंतर नियमानुसार 3 महिन्यानंतर अर्थात 1 नोव्हेंबर 2024 पासून या योजनेचा लाभ मिळू शकतो ही माहिती उदाहरणे दाखल दिली आहे.