Ayushman Bharat Card Update 2026 In Marathi : जाणून घ्या काय आहे प्रोसेस
Ayushman Bharat Card Update 2026 In Marathi : केंद्र सरकारने सुरू केलेल्या आयुष्यमान योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांनाच आयुष्यमान कार्ड देण्यात येते. मात्र ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांना अनेक अडचणी येत होत्या. यावर आता तोडगा निघाला आहे. आता रेशन कार्ड नसले त्यांनाही आयुष्यमान काढता येणार आहे. ते कसे काढता येणार आहे चला जाणून घेऊया.
Ayushman Bharat Card Update News In Marathi आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 5 लाख रुपये पर्यंत विमा देण्यात येतो. याद्वारे कुटुंबातील व्यक्ती 5 लाख रुपयापर्यंतचे मोफत उपचार घेऊ शकतात. पण अनेकांकडे रेशन कार्ड नसल्यामुळे त्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागत होते. तर ज्यांच्याकडे आहे त्यांनाही अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता.
रेशन कार्ड लिंक न होणे, रेशन कार्ड वरील बारा अंकी नंबर न जुळणे अशा तक्रारी येत होत्या. मात्र आता यापासून सर्वांना सुटका मिळणार आहे. कारण आता रेशन कार्ड नसलेल्या पात्र नागरिकांना प्रतिज्ञापत्र व तहसीलदाराच्या पडताळणीच्या आधारे आयुष्मान कार्ड देण्यात येणार आहे.
तांत्रिक अडचणी, अपूर्ण माहिती आणि ऑनलाइन प्रणालीतील त्रुटी मुळे अनेक गरजू कुटुंब या योजने पासून वंचित राहत होते. यावर आता सरकारने तोडगा काढला आहे.
हा तोडगा म्हणजे स्वतः प्रतिज्ञापत्र आणि तहसीलदार कडून पडताळणी करून घेतलेल्या पत्राद्वारे जिल्ह्यात आयुष्मान कार्ड ची नोंदणी करण्यात येत आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाहीये त्यांनी तत्काळ या गोष्टीचा लाभ घेऊन आपले आयुष्यमान कार्ड काढून घ्यावे.
जेणेकरून त्यांना मोफत उपचाराचा लाभ घेता येईल. मात्र पात्र लाभार्थ्यांची संख्या लक्षात घेता ही नोंदणी अपुरी असल्याचे आरोग्य क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे.
ही सेवा केंद्र सेतू सुविधा केंद्र व तालुका आरोग्य केंद्राला मध्ये आयुष्मान कार्डासाठी मोठी गर्दी होत आहे. मात्र यातील काही तांत्रिक अडचणी प्रशासनाने दूर केल्या तर अनेकांना यातून दिलासा मिळू शकतो.
सर्वात प्रथम पात्र नागरिकांनी प्रतिज्ञापत्र व तहसीलदारांच्या पडताळणीवर आयुष्यमान कार्ड काढावे. त्याबरोबरच योग्य कागदपत्रासह अधिकृत ई-सेवा केंद्र किंवा तालुका आरोग्य केंद्राशी संपर्क साधून त्यांनी अर्ज केल्यास त्यांचा अर्ज मान्य केला जातो.
प्रतिज्ञापत्राद्वारे काढा आयुष्मान कार्ड
Ayushman Bharat Card Update News In Marathi
आयुष्मान भारत जन आरोग्य कार्ड काढण्यासाठी रेशन कार्ड, आधार कार्ड, आधार ओटीपी, मोबाईल नंबर वैयक्तिक माहिती असे प्रक्रिया होती. मात्र यामुळे अनेकांना अडचणीचा सामना करावा लागत होता. मात्र आता प्रशासनाने याची दखल घेत प्रतिज्ञापत्र आणि तहसीलदार कडून करण्यात आलेली पडताळणी ग्राह्य धरून लाभार्थी कुटुंबाला आयुष्यमान कार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अनेक नागरिकांना फायदा होणार आहे.
आयुष्मान कार्डद्वारे 5 लाखाचे उपचार
Ayushman Bharat Card Update News In Marathi
केंद्र सरकारच्या आयुष्मान कार्ड योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांचे मोफत उपचार देण्यात येतात. यामध्ये गंभीर आजार, शस्त्रक्रिया, तसेच निवडक खाजगी व सरकारी रुग्णालयात कॅशलेस उपचार या योजनेअंतर्गत देण्यात येतात.
तांत्रिक अडचणी दूर
आयुष्मान कार्ड ची नोंदणी करताना रेशन कार्ड वरील बारा अंकी क्रमांक मागितला जातो. मात्र हा क्रमांक प्रणालीत उपलब्ध नसल्यामुळे अनेकांचे अर्ज अडकतात. अनेक नागरिकाकडे वैध आधार व इतर कागदपत्रे असूनही कुटुंब आयुष्मान कार्डच्या नोंदणी मध्ये अडकतो. जुना डेटा, विभक्त कुटुंबाची नोंद नसणे या अडचणी येतात. मात्र आता प्रशासनाने याची दखल घेऊन तहसीलदारांच्या पडताळणीनंतर आयुष्मान कार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांना लाभ होईल.