ayushman vay vandana card in marathi : वय वंदना कार्ड मध्ये मिळणार 5 लाखाचा आरोग्य विमा

ayushman vay vandana card Yojana In Marathi : वय वंदना कार्ड योजना

ayushman vay vandana card आयुष्मान वय वंदना कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्न किंवा कुठले अटी नियम पाळण्याची आवश्यकता नाही. जर तुमचे वय 70 पेक्षा अधिक आहे तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.

ayushman vay vandana card जर तुमचे वय 70 पेक्षा अधिक आहे तर तुम्ही सरकारच्या आयुष्मान वय वंदना कार्ड योजनेचा लाभ घेऊ शकता. कारण या योजनेअंतर्गत 70 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या वृद्ध व्यक्तींना 5 लाख रुपयांचे आरोग्य विमा कवच दिले जाते. ही पूर्ण योजना काय आहे. यासाठी कसा अर्ज करावा या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या योजनेच्या माध्यमातून पाहणार आहोत.

काय आहे वय वंदना कार्ड योजना

ayushman vay vandana card Yojana वय वंदना योजना कार्ड च्या माध्यमातून 5 लाख रुपयापर्यंत आरोग्य विमा संरक्षण दिले जाते. या योजनेअंतर्गत ७० किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व व्यक्तींना या योजनेचा लाभ दिला जातो. जर कोणी आयुष्मान भारत पीएम जेवाय योजनेचा लाभ घेत असेल तर तर त्याला 5 लाख रुपये पर्यंतचे एक्स्ट्रा टॉप ऑफ मिळेल. जर तुमच्याकडे एखाद्या खाजगी कंपनीचे आरोग्य विमा काढलेला असेल तरीही तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल.

योजनेचे बेनिफिट कसे मिळेल

ayushman vay vandana card Yojana योजनेमध्ये आर्थिक उत्पन्न किंवा कुठलेही नियम अटी लावण्यात आलेले नाहीत. 70 किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व व्यक्तींना या योजनेचा लाभ दिला जातो. जर तुम्ही पती-पत्नी दोघांचे वय 70 पेक्षा अधिक आहे. तर तुम्हाला 5 लाख रुपये पर्यंतचे आरोग्य विमा कवच दिले जाईल. ते दोघांसाठी फिफ्टी-फिफ्टी स्वरूपात असेल.

निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना मिळतो लाभ

जर तुम्ही सीजीएचएस इ सी एच एस सारख्या आरोग्य योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्याकडे पर्याय आहे. तुम्हाला वाटले तर तुम्ही वर्तमान योजना सुरू ठेवू शकता किंवा तुम्ही वय वंदना कार्ड योजनेचा पर्याय निवडू शकता.

आयुष्मान वय वंदना कार्ड योजनेची अर्ज प्रक्रिया

ayushman vay vandana card सर्वात प्रथम तुम्ही गुगल प्ले स्टोर ला जाऊन आयुष्यमान ॲप डाऊनलोड करा ॲप डाऊनलोड झाल्यानंतर लॉगिन बेनेफिशरी या पर्यायावर क्लिक करा. कॅपच्या भरा मोबाईल नंबर टाका. अथेंतिकेशन करा त्यानंतर तुम्हाला ओटीपी आणि कॅपच्या द्वारे लॉगिन करायचे आहे. त्यानंतर आपला फोन लोकेशन एक्सेस परमिशन द्यायचे आहे.

आता बेनीफिशरी डिटेल्स माहिती भरा जसे की यामध्ये राज्य, नाव, आधार संदर्भात माहिती. जर सिस्टीम मध्ये तुमचे नाव येत नाही तर ही केवायसी प्रक्रिया फॉलो करा आणि ओटीपी द्वारे डिक्लेरेशन द्या आणि आवश्यक माहिती भरा.

बेनीफिशरी चा मोबाईल नंबर आणि ओटीपी टाका कॅटेगिरी आणि पिन कोड संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरा कुटुंबातील व्यक्तींची माहिती भरा आणि अर्ज सबमिट करा.

जेव्हा ई-केवायसी पूर्ण होईल आणि तुम्हाला परमिशन मिळेल त्या नंतर तुम्हाला आयुष्यमान वय वंदना काळ डाऊनलोड करता येईल.