Ayushman Yojana 2025 In Marathi : दिल्लीमध्ये आयुष्मान योजना सुरू होईल?

Ayushman Yojana 2025 In Marathi : काय असेल केंद्र सरकारचा निर्णय

Ayushman Yojana 2025 In Marathi : दिल्ली विधानसभेचे नेता विजेंद्र गुप्ता Vijender Gupta यांनी उपराज्यपाल व्ही के सक्सेना यांना दिल्लीमध्ये आयुष्मान योजना लागू करण्यासाठीचे पत्र लिहिले होते. विजेंद्र गुप्ता म्हणाले की अरविंद केजरीवाल यांनी काही राजकीय कारणांमुळे दिल्लीमध्ये ही योजना लागू करू दिली नाही. यामुळे दिल्लीतील करोडो नागरिकांना या योजनेचा लाभ घेता आला नाही.

Ayushman Arogya Yojana दिल्ली विधानसभा निवडणूक मध्ये भाजपाने बहुमत मिळवून देखील सरकार स्थापनेबाबत निर्णय घेऊ शकले नाहीत. दिल्लीचे मुख्यमंत्री कोण होतील हे अजून पक्के झाले नाही. परंतु दिल्ली सरकारच्या विविध विभागांना त्यांच्या कृती आराखडासह तयार राहण्यास सांगण्यात आले आहे.

Ayushman Arogya Yojana सरकार स्थापन होताच दिल्लीचा वेगाने विकास करण्याची योजना आखली जात आहे. परंतु सरकार स्थापन होण्यापूर्वी दिल्ली विधानसभा चे नेता प्रतिपक्ष विजेंद्र गुप्ता Vijender Gupta यांनी उपराज्यपाल व्ही के सक्सेना यांना पत्र मध्ये आयुष्मान योजना सुरू करण्याची विनंती केली होती.

Ayushman Yojana आयुष्मान योजना 2019 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केली होती. या योजने अंतर्गत केंद्र सरकारने दिल्लीसाठी 2406 कोटी रुपये एवढे बजेट मंजूर केले होते. या अंतर्गत 1139 अर्बन हेल्थ अँड वेलनेस सेंटर, 11 जिल्हा एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा आणि 9 क्रिटिकल केअर ब्लॉक स्थापन होणार होते. आता दिल्लीमध्ये आयुष्मान भारत योजना सुरू होईल का आणि या करोड नागरिकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेता येईल का हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

Ayushman Yojana विधानसभा निवडणुकीनंतर बीजेपी ने आयुष्मान भारत योजना सुरू करण्याचा वचन दिले होते. या योजनेअंतर्गत देशातील 34 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 5 लाख रुपयापर्यंत मोफत विलाज केला जाणार होता. परंतु दिल्ली च्या नागरिकांना 10 लाख पर्यंत सुविधा मिळणार कारण बीजेपी ने असे घोषणापत्रात वचन दिले होते.

Vijender Gupta ज्या नागरिकांचे वय 70 वर्षांपेक्षा जास्त आहे म्हणजेच ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना मोफत ओपीडी आणि डायग्नोस्टिक सेवा देखील मिळणार. त्याचबरोबर त्यांना 10 लाखाचे स्वास्थ्य विमा कवर मिळणार.

कसा करावा अर्ज

Delhi Sarkar आयुष्मान योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीचा वापर करता येतो. परिवाराला या योजनेअंतर्गत स्वस्थ कार्ड दिले जाते. जे त्यांच्या परिवारातील संपूर्ण सदस्यांसाठी असेल. या कार्डच्या माध्यमातून हॉस्पिटलमध्ये विलाज घेणे अगदी सोपे जाते यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रक्रिया दिलेली आहे.

Delhi Sarkar जर तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया करायची असेल तर तुम्हाला आयुष्यमान भारत योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तेथे तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल. चेक युवर एलिजिबिलिटी किंवा एलिजिबिलिटी चेक असा पर्याय येतो तेथे तुमची संपूर्ण माहिती टाकून तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही हे कळते.

Delhi Sarkar त्याचबरोबर तुम्ही ऑफलाइन पद्धतीने जर रजिस्ट्रेशन करणार असाल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळील CSC केंद्रावर जावे लागेल किंवा सरकारी दवाखान्यात जाऊन तुमचे रजिस्ट्रेशन करावे लागेल आणि त्यानंतर अर्ज सोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडून अर्ज जमा करावा लागेल.