Balika Samriddhi Yojana In Marathi : मुलीच्या जन्मापासून शिक्षणापर्यंत सरकार देत आहे आर्थिक मदत

Balika Samriddhi Yojana 2025 In Marathi : जाणून घ्या कसा मिळवावा लाभ

Balika Samriddhi Yojana : बालिका समृद्धी योजना 1997 मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेचा उद्देश मुलीच्या जन्मापासून 10 वी पर्यंतच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे आहे. BPL कुटुंबातील मुलींना जन्म झाल्या झाल्या 500 रुपये आणि शिक्षणाच्या विविध टप्प्यामध्ये आर्थिक मदत दिली जाते.

Balika Samriddhi Yojana In Marathi : केंद्र सरकारकडून मुलीच्या प्रगतीसाठी अनेक प्रकारच्या योजना चालवल्या जातात. यातीलच एक म्हणजे सुकन्या समृद्धी योजना सर्वाधिक मानली जाते आणि ही योजना लक्षात घेऊनच केंद्र सरकारने बालिका समृद्धी योजना सुरू केलेली आहे.

या योजनेचा उद्देश मुलींना प्रोत्साहित करणे, बालविवाह सारख्या प्रथा पासून त्यांचे संरक्षण करणे आहे. चला जाणून घेऊ या योजनेची काय विशेष बाबी आहेत.

बालिका समृद्धी योजना म्हणजे काय

What Is Balika Samriddhi Yojana

1997 मध्ये केंद्र सरकारने बालिका समृद्धी योजना ची सुरुवात केली. या योजनेचा उद्देश मुलीच्या जन्मापासून त्यांच्या शिक्षणापर्यंत आर्थिक मदत करणे. या योजनेअंतर्गत सर्वात प्रथम मुलीच्या जन्मावर आईला प्रसूतीनंतर 500 रुपये मदत केली जाते.

त्यानंतर मुलीच्या शिक्षणासाठी विविध टप्प्यामध्ये 10 वी पर्यंत सरकार आर्थिक मदत करते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवळ BPL कुटुंबातील मुलीच पात्र आहेत आणि एका कुटुंबातील केवळ 2 मुलींनाच या योजनेचा लाभ दिला जातो.

मुलीच्या जन्मावर किती मिळतो लाभ

Benefit Amount Of Balika Samriddhi Yojana

मुलीचा जन्म झाल्यानंतर सरकार आईच्या नावावर 500 रुपये देते याव्यतिरिक्त त्या मुलीच्या शिक्षणासाठी विविध टप्प्यावर आर्थिक मदत केली जाते.
पहिली ते तिसरी पर्यंत वर्षाला 300 रुपये
चौथ्या वर्गासाठी 500 रुपये
पाचवीसाठी 600 रुपये सहावी आणि सातवी साठी वर्षाला 700 रुपये आठवीसाठी वर्षाला 800 रुपये नववी आणि दहावी साठी वर्षाला 1000 रुपये
अशाप्रकारे ही योजना मुलीच्या जन्मापासून मुलीच्या दहावीपर्यंत शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते.

आवश्यक कागदपत्रे

Balika Samriddhi Yojana Documents

जन्म प्रमाणपत्र
मुलीचे आधार कार्ड
आई-वडिलांचे आधार कार्ड
रहिवासी प्रमाणपत्र
रेशन कार्ड
उत्पन्न प्रमाणपत्र
पासपोर्ट आकाराचा फोटो
बँक पासबुक

कोण करू शकते अर्ज

Balika Samriddhi Yojana Eligibility

दारिद्र रेषेखालील BPL कार्डधारक या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
यासाठी मुलीचे वय 18 वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
कुटुंबाकडे मुलीचे जन्म प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया

Balika Samriddhi Yojana Apply

जवळच्या अंगणवाडी केंद्र ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिस किंवा महिला व बालविकास विभाग मध्ये अर्ज करता येतो.
या अर्जासोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जोडावी लागतील.
यात मुलीचे जन्म प्रमाणपत्र, कुटुंबाचे BPL कार्ड आधार कार्ड, बँक किंवा पोस्ट ऑफिसचे खाते विवरण.