Best Government Savings Schemes In Marathi : या सरकारी बचत योजनेत मिळते सर्वाधिक व्याज

Best Government Savings Schemes In Marathi : टॉप मध्ये आहेत या दोन योजना

Best Government Savings Schemes In Marathi : तुम्हीही अशा सरकारी योजनेच्या शोधात आहात ज्यामध्ये बचत सोबतच चांगला परतावा मिळतो. चला तर मग अशाच दोन योजना बद्दल माहिती जाणून घेऊ तेथे तुम्हाला चांगला परतवा मिळत आहे अशा कुठल्या दोन्ही योजना आहेत?

highest interest rates these two schemes आज गुंतवणूक करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. मात्र लोक सुरक्षित गुंतवणूक पर्यायचा निवड करत आहे. अनेक लोक सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास पसंती दर्शवतात. तर तुम्हीही बचत योजनेमध्ये गुंतवणूक करण्याची प्लॅनिंग करत आहात तर जाणून घ्या की, कुठल्या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे की, 1 आक्टोंबर पासून सुरू झालेल्या तिमाही साठी डिसेंबर 2025 पर्यंत लघु बचत योजनेचा व्याजदर कायम राहील.

कुठली सरकारी योजना देते सर्वाधिक व्याज

Best Government Savings Schemes In Marathi : जेव्हा सरकारी योजनेमध्ये गुंतवणूक करण्याची वेळ येते त्यावेळेस सर्वात प्रथम राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आणि सार्वजनिक भविष्य निधी खाते लोकांच्या डोक्यात येते. अधिकतर लोकांना वाटत असेल की या योजनांमध्ये सर्वाधिक व्याज परतावा मिळतो. मात्र खरी गोष्ट वेगळीच आहे. दरम्यान सर्वाधिक व्याज सुकन्या समृद्धी योजना आणि सीनियर सिटीजन सेविंग स्कीम मध्ये दिले जाते. मात्र दोन्ही योजनेमध्ये गुंतवणूक करण्याची वेगवेगळ्या अटी आहेत.

1. सुकन्या समृद्धी योजनेमध्ये मिळते सर्वाधिक व्याज

Sukanya Samriddhi Yojana

सुकन्या समृद्धी योजना अन्य सरकारी बचत योजना परतावा प्रकरणांमध्ये सर्वाधिक पुढे आहे. या योजनेअंतर्गत 8.2% दराचे व्याजदर परतवा मिळतो आणि PPF अकाउंट वर बोलायचे झाले तर यावर 7.1% व्याज परतावा मिळतो. या व्यतिरिक्त नॅशनल सेविंग सर्टिफिकेटवर 7.7% व्याज दिले जाते.

सुकन्या समृद्धी योजनेमध्ये गुंतवणुकीची योजना

या योजनेमध्ये प्रत्येक जण गुंतवणूक करू शकत नाही ही योजना केवळ मुलीचे भविष्य लक्षात घेऊन सुरू करण्यात आलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत केवळ 10 वर्ष पर्यंत मुलीच्या नावावर पालक गुंतवणूकीला सुरुवात करू शकतात. जेणेकरून मुलीचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होऊ शकेल. या योजनेअंतर्गत मुलीचे शिक्षण लग्नासारख्या मोठे खर्चासाठी पालकावर बोजा पडू नये यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. यामुळे मोठा फंड जमा होतो.

किती करू शकता गुंतवणूक

सुकन्या समृद्धी योजनेमध्ये आई-वडील किंवा कायदेशीर पालक आपल्या मुलीच्या नावावर 2.5 लाख रुपये वर्षाला एका मुलीचे नावे गुंतवणूक करू शकतो. या योजनेमध्ये केवळ दोन मुलींच्या नावे गुंतवणुकीचा लाभ घेता येतो. तर कुटुंबातील पहिले एक मुलगी आणि त्यानंतर दोन जुळ्या मुली जन्मल्या तर अशावेळी तिन्ही मुलींना या योजनेचा लाभ घेता येतो.

2. सीनियर सिटीजन सेविंग स्कीम मधील व्याज

Senior Citizen Saving Scheme

सुकन्या समृद्धी योजनेप्रमाणेच सीनियर सिटीजन सेविंग स्कीम मध्ये 8.2% व्याजदर मिळते. ज्याप्रमाणे सुकन्या समृद्धी योजना विशेष करून मुलींना लक्षात ठेवून ठरवण्यात आली आहे. तसेच सीनियर सिटीजन सेविंग स्कीम विशेष करून ज्येष्ठ नागरिकांना लक्षात ठेवून ठरवण्यात आलेली महत्त्वाची योजना आहे. यामध्ये 60 वर्ष किंवा 55 वर्ष पेक्षा अधिक निवृत्त व्यक्ती या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात.

सीनियर सिटीजन सेविंग स्कीम मध्ये गुंतवणुकीची मर्यादा

या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 5 वर्षापर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते. ग्राहकाला वाटली तर लॉक इन अवधी तो वाढू शकतो. सीनियर सिटीजन स्कीम मध्ये 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू केली जाऊ शकते आणि जास्तीत जास्त 30 लाख रुपये पर्यंत ती होऊ शकते. या योजनेमध्ये सुकन्या समृद्धी योजनेसारखा आयकर अधिनियम 80 c अंतर्गत टॅक्स मध्ये सूट दिली जाते.