Beti Bachao Beti Padhao Yojana 2024 In Marathi : बेटी बचाओ बेटी पढाओ योजना ठरतेय प्रभावी

Beti Bachao Beti Padhao Yojana 2024 Information : बेटी बचाओ बेटी पढाओ योजना 2024 मराठी माहिती

Beti Bachao Beti Padhao Yojana : देशातील महिलांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जात आहेत. देशातील मुलींची स्त्रीभ्रूणहत्या रोखणे आणि स्त्री-पुरुष गुणोत्तर प्रमाण वाढवणे यासाठी केंद्र सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना सुरू केली आहे.या योजनेचा भाग म्हणूनच बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना Beti Bachao Beti Padhao Yojana केंद्र सरकारने 22 जानेवारी 2015 रोजी सुरू केली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची सुरुवात केली आहे. देशभरातील महिलांचा विकास, महिला सक्षमीकरण आणि महिला आत्मनिर्भर होण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध जनकल्यानकारी योजना राबवत असते. बेटी बचाओ बेटी पढाओ योजना 2024 Beti Bachao Beti Padhao Yojana 2024 मुलींचे व महिलांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी महिला आणि बाल विकास मंत्रालयाद्वारे योजना चालवली जात आहे. या योजनेचा लाभ आपल्या मुलीला मिळावा यासाठी पालकांनी जवळच्या राष्ट्रीयकृत बँक अथवा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन या योजनेसाठी खाते उघडावे लागते. मुलीच्या जन्म झाल्यापासून ते तिच्या 10 वर्षे पूर्ण होईपर्यंत या योजनेअंतर्गत बँक खाते उघडता येते आणि या योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेच्या माध्यमातून मुलगी जन्माला आल्यापासून ते मुलगी 14 वर्षाची होईपर्यंत तिच्या पालकांना मुलीच्या बँक खात्यात निश्चित एक रक्कम जमा करावी लागते. नियमितपणे हप्ते भरल्यानंतर मुलीचे वय 18 वर्षे झाल्यानंतर रकमेपैकी 50 टक्के रक्कम पालक तिच्या शिक्षणासाठी काढू शकतात. देशभरात लिंग गुणोत्तर ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. मुलींच्या शिक्षणात होणारे अडथळे स्त्रीभ्रूणहत्या आणि मुलगा आणि मुलींमध्ये करण्यात येणारा भेदभाव यामुळे मुलींच्या संखेत मोठी घट दिसून येते. यासारख्या समस्यावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ योजना Beti Bachao Beti Padhao Scheme ही 2015 मध्ये सुरू केली आहे. केंद्र सरकार या योजनेच्या माध्यमातून महिलांना समान दर्जाचे जीवन जगता यावे व समाजामध्ये सन्मानाने त्यांना वावरता यावे यासाठी नियमित काम करत असते. त्या अनुषंगानेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ Beti Bachao Beti Padhao योजना सुरू केली आहे या योजनेची अंमलबजावणी देशात मोठ्या प्रमाणात झाली असून देशभरातील मुला मुलींना समान दर्जा मिळावा यासाठी ही योजना महत्त्वाची ठरत आहे. मुलींना कोणी कमी लेखू नये मुलाप्रमाणेच मुलगी ही भावना समाजात रुजवण्यासाठी ही योजना काम करत आहे. मुलगा आणि मुलींमध्ये असलेला भेदभाव संपवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

Beti Bachao Beti Padhao Yojana

Beti Bachao Beti Padhao Yojana 2024 देशातील स्त्रीभ्रूणहत्या थांबवण्यासाठी सरकारने लैंगिक चाचणी करण्यावर बंदी घातलेली आहे. त्यामुळे स्त्रीभ्रूणहत्या होण्याच्या घटनेत मोठी घट झालेली आहे. समाजातील काही अंधश्रद्धा पाळणारे नागरिक स्त्रीभ्रूणहत्येचा आहारी जाताना आपल्याला दिसतात, त्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा बेटी बचाओ बेटी पढाओ Beti Bachao Beti Padhao Scheme योजनेचा महत्त्वाचा उद्देश मानला जातो.

बेटी बचाओ बेटी पढाओ Beti Bachao Beti Padhao योजना म्हणजे देशातील मुलींच्या हत्या रोखून त्यांना जीवन देणे व त्यांचे संरक्षण करणे याला प्राधान्य दिले जाते. तसेच मुलीला शिक्षण घेण्यासाठी प्रेरित करणे आणि मुलींना शिक्षण घेण्यात अडचणी येऊ नयेत याची खबरदारी सरकार घेत असते. देशातील एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने सरकारने यासाठी विविध योजनाही सुरू केल्या आहेत. या योजनेच्या माध्यमातून मुलींना शिक्षण देणे त्यांचा सामाजिक आर्थिक विकास घडवून आणला जातो.

केंद्र सरकारने Beti Bachao Beti Padhao बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेमध्ये 2023 मध्ये काही नवीन सुधारणा केलेल्या आहेत या योजनेच्या सुधारणेमध्ये मुलींना या योजनेचा अधिकाधिक लाभ कसा देता येईल, त्यांच्या शिक्षण घेण्याच्या पद्धतीमध्ये उच्च दर्जाचे शिक्षण, त्यांना आर्थिक मदत तसेच योजनेमध्ये बालविवाहाला आळा घालने यासारख्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. 2011 च्या जनगणना मध्ये स्त्री व पुरुषाची गणना केल्यास असे आढळून आले की, पुरुषाच्या तुलनेत स्त्रियांची संख्या कमी झाली आहे. स्त्री पुरुष गुणवत्ता समान करण्यासाठी लैंगिक चाचण्या बंद करण्यात आल्या आहेत. मुलीच्या जन्माबद्दल लोकांमध्ये सकारात्मकता निर्माण करणे. हा ही Beti Bachao Beti Padhao या योजनेचा उद्देश मानला जातो. देशभरात ज्याप्रमाणे पुरुषांची संख्या आहे तेवढीच स्त्रियांची संख्या असायला हवी, मात्र स्त्रीभ्रूणहत्या मुलीला न मिळणारा समान अधिकार यामुळे लिंग गुणोत्तराचे प्रमाण देशात घटले आहे. देशातील स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तराचे प्रमाण वाढवण्यासाठी सरकार या योजनेच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे व मुलीच्या जन्मासाठी जागरूकता निर्माण करत आहे.

ठळक मुद्दे :

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेची थोडक्यात माहीती

Beti Bachao Beti Padhao Yojana In Short

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेची उद्दिष्टे

Beti Bachao Beti Padhao Yojana purpose

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेची वैशिष्ट्ये

Beti Bachao Beti Padhao Yojana Features

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेबाबत महत्त्वाचे मुद्दे

Beti Bachao Beti Padhao Yojana Importance

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचे फायदे

Beti Bachao Beti Padhao Yojana Benefits

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेत किती पैसे जमा करावे लागतील किती परत मिळतील?

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेसाठीची पात्रता

Beti Bachao Beti Padhao Yojana Eligibility

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे

Beti Bachao Beti Padhao Documents

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेसाठी अर्ज प्रक्रिया

Beti Bachao Beti Padhao Yojana Online Form Apply

FAQ’s

Beti Bachao Beti Padhao Yojana

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेची थोडक्यात माहीती

Beti Bachao Beti Padhao Yojana In Short

योजनेचे नावबेटी बचाओ बेटी पढाओ
कोणी सुरू केलीकेंद्र सरकारने
योजनेची सुरुवात22 जानेवारी 2015
लाभार्थी कोणदेशभरातील मुली
उद्देश कायस्त्रीभ्रूणहत्या रोखणे आणि मुलीच्या जन्माला प्रोत्साहन देणे
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
अधिकृत वेबसाईटhttps://wcd.nic.in

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेची उद्दिष्टे

Beti Bachao Beti Padhao Yojana purpose

  • बेटी बचाओ बेटी पढाओ योजना Beti Bachao Beti Padhao Scheme ही योजना 22 जानेवारी 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सुरू केली.
  • देशातील ग्रामीण भागातील मुलींचे आणि महिलांचे सक्षमीकरण करणे हा योजनेचा हेतू आहे.
  • देशातील मुलींच्या साक्षरतेचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न करणे.
  • मुलगी जन्माला आली की कुटुंबामध्ये मुलीकडे होते म्हणून पाहिले जाते तसेच समाजामध्ये स्त्रीभ्रूणहत्या चे प्रमाणही मोठे आहे हे प्रमाण थांबवणे या योजनेचा उद्देश आहे.
  • देशातील लिंग गुणोत्तराचे प्रमाण वाढवण्यासाठी ही या योजनेच्या माध्यमातून जागृती केली जाते.
  • स्त्री भ्रूण हत्या थांबवणे आणि लैंगिक निवडीला प्रतिबंध करणे या योजनेचे ध्येय आहे.
  • मुलीच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून विविध शिष्यवृत्ती योजना आणि शिक्षणाच्या खर्चामध्ये सवलती दिल्या जात आहेत.
  • मुलीला आत्मनिर्भर बनवण्यासाठी कौशल्य विकासाच्या माध्यमातून मुलींना प्रशिक्षणही दिले जाते जेणेकरून त्या आपल्या पायावर उभा राहू शकतील.
  • मुलींसाठी सरकार विविध आरोग्य आणि पोषण योजना राबवत आहे.
  • मुलींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
  • लैंगिक हिंसाचाराविरुद्ध कायद्याची अंमलबजावणी करणे मुलींना लैंगिक हिंसाचारापासून संरक्षण देणे लैंगिक समानतेची जागरूकता निर्माण करणे अधिक कामेही या योजनेच्या माध्यमातून केली जातात लोकांमध्ये जनजागृती करणे ही या योजनेचा एक भाग आहे.
  • बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या जन्मापासून ते 10 वर्षाची होईपर्यंत तुम्ही तिचे बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खाते उघडू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता.
  • मुलीचे संरक्षण आणि मुलीच्या उच्च शिक्षणासाठी ही योजना फायदेशीर आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून स्त्रीभ्रूण हत्या थांबवणे हा मुख्य उद्देश आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून मुलीच्या हातात जमा होणारी रक्कम पालक तिच्या शिक्षणासाठी आणि विवाहासाठी वापरू शकतात.
  • या योजनेच्या माध्यमातून मुलगा आणि मुलगी असा होणारा भेदभाव कमी करणे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे.
  • बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेच्या माध्यमातून तुम्ही भरलेली रक्कम आणि सरकारने केलेली आर्थिक मदत अशी एकूण रक्कम तुम्हाला मुलीचे 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दिली जाईल.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणीही करू शकता.
  • या योजनेच्या माध्यमातून तुम्ही मुलीचे खाते बँकेत उघडल्यानंतर तुम्हाला मुलीचे शिक्षण, विवाह, वैयक्तिक गरजा आदीसाठी खर्च करण्याची आवश्यकता नाही.
  • बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना अत्यंत महत्त्वाची असून यामुळे मुलींचे शिक्षण आणि विवाह खर्च पालकांना ओझे वाटत नाही.

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेची वैशिष्ट्ये

Beti Bachao Beti Padhao Yojana Features

  • बेटी बचाओ बेटी पढाओ Beti Bachao Beti Padhao योजनेचा लाभ घेण्यासाठी पालकांना आपल्या मुलगी 10 वर्षाची होईपर्यंत तिचे बँक किंवा पोस्ट ऑफिस कार्यालयात जाऊन त्याच्या नावाचे खाते उघडावे लागते.
  • त्यानंतर मुलीच्या नावावर प्रति महिना 1000 रुपये भरल्यानंतर वार्षिक 12 हजार रुपये जमा होतात तसेच मुलगी 14 वर्षाची होईपर्यंत 1 लाख 68 हजार रुपये एवढी रक्कम जमा होते. मुलीचे वय 21 वर्षे होईपर्यंत या खात्यामध्ये 6 लाख 7 हजार 128 रुपये एकूण रक्कम जमा होते. या रकमेच्या माध्यमातून मुलीचे शिक्षण, विवाह आदीसाठी तिचे पालक ही रक्कम वापरू शकतात.
  • तुम्ही जर या योजनेच्या माध्यमातून प्रतिवर्ष 1 लाख 50 हजार रुपये भरत असाल तर मुलगी 14 वर्षाची होईपर्यंत ही रक्कम 21 लाख रुपये जमा होते तसेच मुलगी 21 वर्षे झाल्यानंतर तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून 72 लाख एवढी रक्कम तुम्हाला मिळते.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही जवळचा राष्ट्रीयकृत बँक किंवा पोस्ट कार्यालयात जाऊन मुलीच्या नावाने खाते उघडू शकता आणि योजनेचा लाभ घेऊ शकता.
Beti Bachao Beti Padhao Yojana

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेबाबत महत्त्वाचे मुद्दे

Beti Bachao Beti Padhao Yojana Importance

  • देशातील स्त्री भ्रूणहत्या रोखणे
  • मुलींना संरक्षण पुरवणे
  • शिक्षणासाठी मुलींना अधिकाधिक प्रोत्साहित करणे.
  • मुलीच्या जन्मबाबत सकारात्मक विचार निर्माण करणे.
  • समाजात मुलाप्रमाणे मुलींनाही समान दर्जा प्राप्त करून देणे.
  • स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर प्रमाण समान करण्यासाठी प्रयत्न करणे.

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचे फायदे

Beti Bachao Beti Padhao Yojana Benefits

  • या योजनेच्या Beti  Bachao Beti Padhao माध्यमातून मुलीच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा होईल.
  • या योजनेच्या माध्यमातून स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर प्रमाण वाढवण्यात मदत होईल.
  • या योजनेच्या माध्यमातून रकमेवर कोणत्याही प्रकारचा कर आकारला जाणार नाही.
  • या योजनेच्या माध्यमातून मुलीचे नावावर मोठी रक्कम जमा होते या रकमेचा उपयोग मुलीचे शिक्षण आणि विवाह करण्यासाठी पालकांना होतो त्यामुळे पालकांना मुलगी ओझे वाटत नाही.
  • या योजनेमुळे मुलीच्या शिक्षण घेण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे देशभरात चित्र दिसत आहे. Beti  Bachao Beti Padhao

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेत किती पैसे जमा करावे लागतील किती परत मिळतील?

Beti Bachao Beti Padhao Scheme या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 14 वर्षाच्या कालावधीसाठी पैसे बँकेत ठेवावे लागतील. मुलीला 18 वर्षे पूर्ण झाल्यावर तुम्ही काही पैसे काढू शकतात आणि मुलीचे वय 21 वर्षे झाल्यावर संपूर्ण रक्कम काढू शकतात आणि ही योजना संपते.

जर तुम्ही वार्षिक 12 हजार रुपये जमा केले तर तुम्हाला मासिक 1000 रुपयाची गुंतवणूक करावी लागेल. त्यामुळे 14 वर्षात तुमचे 1 लाख 58 हजार रुपये जमा होतील. बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेत तुम्हाला मिळणारी रक्कम 6 लाख 7 हजार 108 रुपये आहे.

जर तुम्ही वर्षाला दीड लाख रुपये जमा करत असाल तर 14 वर्षात तुमचे बँक खात्यात 21 लाख रुपये जमा होतील व या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला एकूण 72 लाख रुपये रक्कम मुलीचे 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दिली जाईल.

तुम्ही या योजनेचा लाभ घेतलाय का?

नमो ड्रोन दीदी योजना

प्रधानमंत्री सौभाग्य योजना

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेसाठीची पात्रता

Beti Bachao Beti Padhao Yojana Eligibility

  • Beti Bachao Beti Padhao Yojana या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे.  
  • एकाच कुटुंबामध्ये दोन पेक्षा अधिक अपत्य असल्यास या योजनेचा पालकांना लाभ घेता येत नाही.  
  • बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेत Beti Bachao Beti Padhao Scheme खाते खोलण्यासाठी तुमच्या मुलीचे वय दहा वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  • दोन पेक्षा अधिक मुले असल्यास या योजनेचा पालकांना लाभ घेता येत नाही.

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे

Beti Bachao Beti Padhao Documents

  • आधार कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • जन्म प्रमाणपत्र
  • रेशन कार्ड
  • बँक खाते
  • आई-वडिलांचे ओळखपत्र
  • पासपोर्ट साईज फोटो
Beti Bachao Beti Padhao Yojana

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेसाठी अर्ज प्रक्रिया

Beti Bachao Beti Padhao Yojana Online Form Apply

बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेसाठी तुम्ही ऑनलाइन नी ऑफलाइन या दोन्हीही पद्धतीने अररज करू शकता. आज आपण या दोन्हीही पद्धतीने अर्ज कसा करता येईल ही बघूया.

Beti Bachao Beti Padhao या योजनेच्या माध्यमातून ज्यांच्या घरी मुलीचा जन्म झाला आहे अशा पालकांनी मुलीचे वय दहा वर्ष होण्यापूर्वी बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेअंतर्गत बँकेत किंवा पोस्ट ऑफिस कार्यालयात खाते उघडावे.

यासाठी बँकेत जाऊन तुम्ही या योजनेचा अर्ज घेऊन संपूर्ण माहिती अर्जात भरावी.  

अर्ज भरण्यासाठी अनेक प्रकारची कागदपत्रे लागतात सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रति त्या अर्जासोबत जोडाव्यात.  

अर्ज संपूर्ण भरून झाल्यानंतर एकदा अचूक आहे का याची खात्री करावी.

त्यानंतर अर्ज बँकेत जमा करावा.  

बँकेच्या माध्यमातून अशा प्रकारे बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचे खाते तुम्ही सुरू करू शकता.

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेसाठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात प्रथम तुम्ही महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

त्यानंतर तुमच्यासमोर होम पेज उघडेल तेथे तुम्हाला महिला सक्षमीकरण योजनेचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज उघडेल या पेजवर तुम्हाला बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा पर्याय दिसेल त्याची निवड करा.

नवीन पेजवर तुम्हाला बेटी बचाओ बेटी पढाओ योजने संबंधित तपशील माहिती वाचा आणि नमूद केल्याप्रमाणे अर्ज प्रक्रियेची अनुकरण करा.

येथे तुम्हाला संपूर्ण जाहिरात मिळेल ही जाहिरात हिंदी किंवा इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

तरी तुम्ही या योजनेचा माहिती घेऊन ऑनलाईन पद्धतीने ही अर्ज करू शकता.

FAQ’s

प्रश्न: बेटी बचाओ बेटी पढाओ योजना Beti Bachao Beti Padhao Yojana म्हणजे काय?

उत्तर: बेटी बचाओ बेटी पढाओ योजना ही मुलींचे शिक्षण आणि सक्षमीकरण करण्यासाठी सरकारने सुरू केलेली योजना आहे.

प्रश्न: बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेची Beti Bachao Beti Padhao Scheme अर्ज कसा करावा?

उत्तर: सरकारच्या अधिकृत वेबसाईट वर किंवा जवळच्या राष्ट्रीयकृत बँक किंवा पोस्ट कार्यालयात जाऊन तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.  

प्रश्न: बेटी बचाओ बेटी पढाओ Beti Bachao Beti Padhao योजनेचा फायदा काय?

उत्तर: या योजनेच्या माध्यमातून मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित केले जाते आणि मुलाप्रमाणे त्यांनाही समान दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न केले जातात.

प्रश्न: बेटी बचाओ बेटी पढाओ BBBP योजनेचे उद्दिष्ट काय?

उत्तर: देशातील स्त्रीभ्रूणहत्या रोखणे आणि लैंगिक निवडीला प्रतिबंध करणे मुलीच्या शिक्षणास प्रोत्साहन करणे आदी उद्दिष्टे आहेत.

प्रश्न: बेटी बचाओ बेटी पढाओ BBBP योजनेचे प्रमुख घटक कोणते?

उत्तर: मुलीबद्दल जनजागृती, आर्थिक मदत, कायदेशीर उपाय, संस्थात्मक मजबुती आदी

प्रश्न: बेटी बचाओ बेटी पढाओ BBBP योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे?

उत्तर: प्रथम या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावे लागेल तसेच अधिक माहितीसाठी तुम्ही महिला व बाल विकास मंत्रालयाचे अधिकृत वेबसाईटला भेट देऊन देऊ शकता.

प्रश्न: बेटी बचाओ बेटी पढाओ BBBP या योजनेचा प्रभाव काय झाला?

उत्तर: या योजनेमुळे देशातील स्त्रीभ्रूण हत्येचे प्रमाण घटले असून मुलीकडे पाहण्याचा सामाजिक दृष्टिकोनही बदलत आहे.

प्रश्न: बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेअंतर्गत BBBP Scheme सरकार किती रक्कम देते?

उत्तर: केंद्र आणि राज्य सरकार मिळून 50 – 50 टक्के निधी योजनेसाठी देतात 2023 आणि 24 साठी केंद्र सरकारने योजनेसाठी 2000 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे.

प्रश्न: बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेची BBBP Yojana अधिकृत वेबसाईट?

उत्तर: https://wcd.nic.in ही अधिकृत वेबसाईट आहे.

प्रश्न: बेटी बचाओ बेटी पढाओ BBBP Yojana साठीचा हेल्पलाइन नंबर काय?  

उत्तर: बेटी बचाओ बेटी पढाओ साठीचा हेल्पलाइन 1 800 102 94 94

प्रश्न: बेटी बचाओ बेटी पढाओ योजना BBBP Scheme कधी सुरू झाली?

उत्तर: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 जानेवारी 2015 या योजनेची सुरुवात केली आहे.

प्रश्न: बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा BBBP Scheme कोणाला मिळतो लाभ?

उत्तर: या योजनेचा लाभ देशभरातील सर्व मुलींना दिला जातो.

प्रश्न: BBBP योजनेमध्ये भरलेली रक्कम कधी परत मिळते?

उत्तर: मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर मुलीच्या शिक्षणासाठी काही रक्कम आणि मुलीचे 21 वर्षे पूर्ण झाल्यावर मुलीला संपूर्ण रक्कम दिली जाते.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA