Budget 2026 In Marathi : उद्या सादर होणार अर्थसंकल्प

Budget 2026 In Marathi : काय होणार घोषणा

Budget 2026 In Marathi : 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी सरकारचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात काय मोठ्या घोषणा होतात? काय स्वस्त होते? काय महाग होते? त्याबरोबरच काय नवीन योजनांची घोषणा होते? हे पाहणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे.

याबरोबर सर्वसामान्यांसाठी हक्काचं घर देण्यासाठी मोदी सरकार कुठली घोषणा करेल हेही पाहणे महत्त्वाचे राहणार आहे. याबरोबरच कुठली नवीन कर प्रणाली लागू होणारे याकडे सर्वांचे लक्ष लागले असून देशभरातील महिला, कामगार, मजूर, शेतकरी या वर्गाला काय मिळणार हे यासारखे अर्थसंकल्पातून कळेल.

Budget 2026 अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी अनेक निर्णय होण्याची शक्यता आहे. कर प्रणाली बाबत महत्त्वाची घोषणा देखील केली जाऊ शकते. अर्थसंकल्पात जुनी करप्रणाली बंद केली जाण्याची दाट शक्यता आहे.

सध्या देशात जुनी कर प्रणाली आणि नवी कर प्रणाली या दोन्ही आहेत. त्यामुळे कर दाते त्यांच्या सोयीनुसार करप्रणाली स्वीकारून आयटीआर फाईल करतात. आता याबाबतचा महत्त्वाचा निर्णय या अर्थसंकल्पात होईल अशी आशा आहे.

सरकार मागच्या अनेक वर्षांपासून नवीन कर प्रणालीला प्रोत्साहन देताना दिसत आहे. 2025-26 मध्ये नवीन कर प्रणाली स्वीकारण्यास सांगितले आहे. जर करदात्यांनी स्वतःहून नवीन कर प्रणाली निवडली नाही तरीही डिफॉल्ट नवीन कर प्रणाली लागू व्हायची त्यामुळेच जुने कर प्रणाली रद्द करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तज्ञांच्या माहितीनुसार जुन्या करप्रणालीने अनेक करदाते आयटीआर फाईल करतात त्यामध्ये एचआरए, हाय रेट अलाऊंटमध्ये सूट देखील मिळते. त्याबरोबर होम लोन वरील व्याजात 2 लाखांपर्यंत सूट मिळते तसेच सेक्शन ८०c अंतर्गत 1.5 लाखांची कर सुट मिळते. दरम्यान या सुविधा नवीन कर प्रणालीत दिल्या जात नाहीत त्यामुळे मध्यमवर्गीयांना अतिरिक्त टॅक्स भरावा लागू शकतो.

नवीन कर प्रणालीचा फायदा

Budget 2026 Expectation Of Tax Regime

Budget 2026 Expectation Of Tax Regime नवीन कर प्रणालीत टॅक्स स्लॅब सरळ आणि सोपे आहेत. 12 लाखांचे उत्पन्न हे करमुक्त करण्यात आलेले आहे. त्यामुळे जास्त कागदोपत्री काम करावे लागत नाही प्रत्येक कर्मचारी जुन्या किंवा नवीन कर प्रणालीतील एक निवडू शकतो.

त्याचबरोबर कोणत्या गोष्टींमध्ये कपात होईल, काय स्वस्त होईल, काय महाग होईल हे देखील आपल्याला या अर्थसंकल्पात करणार आहे. त्याचबरोबर या अर्थसंकल्पात नवीन कोणती घोषणा होणार का याचे याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.