Deep Amavasya 2025 In marathi : दीप अमावस्या 2025 संपूर्ण माहिती

Deep Amavasya 2025 In marathi : कधी आहे दीप अमावस्या, कशी साजरी करावी

Deep Amavasya 2025 In marathi : श्रावण महिना हा अगदी पवित्र महिना मानला जातो. श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी अमावस्या येते त्या अमावस्येला दीप अमावस्या असे म्हणतात. या दिवशी घरातील दिव्यांची पूजा केली जाते. हा आषाढ महिन्यातला शेवटचा दिवस असतो. त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून श्रावण महिना हा पवित्र महिना सुरू होतो.

Deep Amavasya 2025 In marathi दीप अमावस्याच्या दिवशी सकाळी घरातील दिवे, समई, निरंजने घासून स्वच्छ करून पाटावर मांडून त्यांची पूजा केली जाते. पाटाभोवती सुंदर रांगोळी फुलांची सजावट करून सर्व दिव्यांमध्ये तेल वात प्रज्वलित करून ही दीप अमावस्या साजरी केली जाते.

Deep Amavasya 2025 आज आपण या लेखाच्या माध्यमातून दीप अमावस्या का साजरी करावी कशी साजरी करावी यामागे काय हेतू आहे याची सविस्तर माहिती आपण पाहणार. आहोत चला तर मग सुरुवात करूया लेखाला.

Deep Amavasya 2025 यंदा म्हणजेच 2025 साली 24 जुलै रोजी आषाढी अमावस्या आहे. त्याचबरोबर याला अजून एक शब्द आहे तो म्हणजे दिव्यांची अवस असेही म्हणतात. या दिवशी देवघरात दिवे स्वच्छ धुवून पुसून उजळून पाटावर मांडून बाजूला रांगोळी काढून त्याची पूजा केली जाते. या पूजेला कणकेच्या दिव्यांचा ही नैवेद्य दाखवला जातो हा एक परंपरेचा भाग आहे.

Pithori Amavasya 2025 in Marathi हिंदू धर्मात दीप अमावस्येला विशेष महत्त्व आहे. हा दिवस आषाढ महिन्यातील अमावस्येला साजरा केला जातो. या दिवशी दीपपूजन आणि पितृ पूजन यांना विशेष महत्त्व आहे. कारण या दिवशी पितरांचा आत्मा पृथ्वीवर येतो आणि दीपाच्या प्रकाशाने त्यांना शांती मिळते असे मानले जाते.

आषाढी अमावस्या ही पितरांच्या स्मरणासाठी आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी समर्पित आहे. असे मानतात की या अमावस्येला पित्रांचा प्रभाव अधिक असतो आणि त्यांना प्रसन्न केल्याने कुटुंबाला सुख, शांती, समृद्धी मिळते.

Pithori Amavasya 2025 in Marathi दीपप्रकाशाने पितरांना मार्ग दाखवला आहे म्हणून याला दिव्याची अमावस्या असे म्हणतात. दीपक लावून पितरांना अंधारातून मुक्ती मिळते आणि त्यांचा आत्मा प्रकाशकडे जातो. अमावश्या हा अध्यात्म आणि साधनेसाठी शुभ दिवस मानला जातो.

अशी करा दीप अमावस्येची पूजा

Pithori Amavasya दीप अमावस्या यावर्षी 23 जुलै 2025 रोजी आली आहे. या दिवशी गुरुवार आहे. त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योग देखील आहे. आपल्या घरात दिवे असतात जेवढे घरामध्ये दिवे असतील तेवढे समई, निरंजन तेवढे सर्व स्वच्छ धुऊन पाटावर मांडावी. समोर रांगोळी काढावी.

सर्व दिव्यांना व समईला त्यावर ठेवावे. पाटावर ठेवून फुलाने पाणी शिंपडावे त्यानंतर दूध शिंपडावे आणि गंध, अक्षदा, फुल वाहून वस्त्रमाळ वाहावी आणि दिव्यांची पूजा करावी. त्यानंतर दिव्यांना लाह्या फुटाण्याचा नैवेद्य दाखवला जातो.

Pithori Amavasya 2025 या दिव्यांमध्ये पणती देखील ठेवली जाते. अनेक ठिकाणी या दिवशी पिठाचे दिवे तयार केले जातात. पिठाचे दिवे तयार करून त्यामध्ये तेल वात लावून दिवा लावतात आणि त्याची पूजा करतात.

दीप अमावस्याची कथा

deep amavasya katha in marathi

deep amavasya katha in marathi आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याच्या घरी श्रावणातल्या अवसेच्या दिवशी वडिलांचे श्राद्ध असे. इकडे दरवर्षी काय होई ? ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याचे वेळेस बाळंत होऊन पोर मरून जाई. असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात. असे सहा वर्षे झाले.

सातव्या वर्षीही तसंच झालं, तेव्हा सासरा रागावला. ते मेलेले पोर तिच्या ओटीत घातले. तिला रानात हाकलून लावलं.

पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली. तिथे तिला झोटिंगाची बायको भेटली. ती म्हणाली, बाई बाई, तू कोणाची कोण? इथे येण्याचे कारण काय ? आलीस तशी लवकर जा. नाही तर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकील !

तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, त्या करताच मी इथे आले आहे. झोटिंगाची बायको म्हणाली, बाई बाई, तू इतकी जिवावर उदार का? तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली आणि इथे येण्याचे कारण सांगितले. सासऱ्यांनी घरातून घालवून दिले तर आता जगून तरी काय करायचे आहे? असं म्हणून रडू लागली.

तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली, बाई तू भिऊ नको, घाबरू नको. अशीच थोडी पुढं जा. तिथं तुला एक शिवलिंग दृष्टीस पडेल. बेलाचं झाड लागेल, तिथे एका झाडावर बसून राहा. रात्री नागकन्या, देवकन्या, साती अप्सरा तिथे पूजेला येतील.

पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील. असे झाल्यावर मी आहे म्हणून सांग. त्या तुला पाहतील. कोण, कोठची म्हणून चौकशी करतील. तेव्हा सगळी हकीकत त्यांना सांग.

ब्राह्मणाच्या सुनेने बरं म्हटलं. तिथून उठली, पुढं गेली. तो एक बेलाचे झाड पाहिलं. तिथेच उभी राहिली. इकडे तिकडे पाहू लागली. तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडले. तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली.

इतक्यात रात्र झाली. तशी नागकन्या, देवकन्या आणि सात अप्सरांच्या स्वार्‍यासुद्धा आल्या. त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखविला आणि अतिथी कोण आहे? म्हणून विचारलं.

ते ऐकताच तीने मी आहे म्हणून सांगितले. तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिलं. त्यांना आश्चर्य वाटलं. तिची कोण, कोठली म्हणून चौकशी केली. तिनं सर्व हकीकत सांगितली. नागकन्या- देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली.

पुढे तिच्या साती मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं. तिला श्रावणी अवसेचं हे व्रत सांगितलं. चौसष्ट योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्युलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं. तसे तिने विचारलं, ह्याने काय होतं ? अप्सरांनी सांगितलं. हे व्रत केले म्हणजे मुलबाळ दगावत नाहीत, सुखासमाधानात राहतात. पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली.

ती आपल्या गावात आली. लोकांनी हिला पाहिलं, ब्राह्मणाला जाऊन सांगितले. भटजी भटजी, तुमची सून घरी येत आहे. त्याला ते खोटं वाटलं. अर्ध घटकेनं पाहू लागला, तो मुलबाळं दृष्टीस पडू लागली.

पाठीमागून सुनेला पाहिलं. तसा उठला, घरात गेला, मूठभर तांदूळ, तांब्याभर पाणी आणलं. तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले. हातपाय धुऊन घरात आला. सर्व हकीकत सुनेला विचारली.

तिनं ती सारी सांगितली. पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुला-बाळांसहित सुखाने ती नांदू लागली. आणि प्रत्येक वर्षी पिठोरी अमावस्येचे व्रत करू लागली. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण.