Digital Agriculture Mission 2024 In Marathi : शेती होणार डिजिटल

Digital Agriculture Mission 2024 Information In Marathi : डिजिटल कृषी मिशन 2024 मराठी माहिती

Digital Agriculture Mission 2024 : देशातील शेतकऱ्यांना डिजिटल करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. यासाठी केंद्र सरकारने नवीन 7 योजना सुरू केले आहेत. या योजनेला डिजिटल कृषी मिशन असे नाव देण्यात आले आहे. या मिशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना डिजिटल तंत्रज्ञानाशी जोडले जाणार आहे.

Digital Agriculture Mission या डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, हवामानाचा अचूक अंदाज, कीटकनाशकांचा योग्य वापर पद्धती, उत्पादन वाढीसाठीचे मार्गदर्शन आदी गोष्टीची माहिती दिली जाणार आहे, जेणेकरून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होऊन देशाचे उत्पन्न वाढण्यात मदत होईल.

केंद्र आणि राज्य सरकार मिळून शेतकऱ्यांसाठी विविध जनकल्याणकारी योजना राबवत असते. या योजनेच्या माध्यमातूनच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी सात योजनांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये डिजिटल कृषी मिशन ही योजना सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

Digital Agriculture Mission केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी डिजिटल कृषी मिशन ही योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारने 2817 कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी नवीन 7 योजना सुरू करण्यात आले आहेत.

Digital Agriculture Mission 2024 केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या डिजिटल कृषी मिशन योजनेची आपण संपूर्ण माहिती आजच्या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. डिजिटल कृषी मिशन म्हणजे काय? याचा कोणाला लाभ होतो. याची संपूर्ण माहिती आज पाहू…

ठळक मुद्दे

डिजिटल कृषी मिशन 2024 मराठी माहिती

Digital Agriculture Mission 2024 Information In Marathi

शेतकऱ्यासाठी केंद्र सरकारने घेतलेले 7 निर्णय

Digital Agriculture Mission 2024

डिजिटल कृषी मिशन म्हणजे काय?

What Is Digital Agriculture Mission

डिजिटल कृषी मिशनचे उद्दिष्ट

Digital Agriculture Mission Purpose

डिजिटल कृषी मिशन साठी 2817 कोटी रुपये निधी मंजूर

Digital Agriculture Mission 2024 In Marathi

डिजिटल कृषी मिशनचे फायदे

Digital Agriculture Mission Benefits

Digital Agriculture Mission

शेतकऱ्यासाठी केंद्र सरकारने घेतलेले 7 निर्णय

Digital Agriculture Mission 2024

  1. डिजिटल कृषी मिशन साठी 2817 कोटी रुपये
  2. पीक विज्ञानसाठी 3979 कोटी रुपये.
  3. कृषी शिक्षण आणि व्यवस्थापनाच्या सक्षमीकरणासाठी 2291 कोटी रुपये.
  4. शाश्वत पशुधन आरोग्य आणि उत्पादनासाठी 1702 कोटी रुपये.
  5. फल उत्पादनाचा विकासासाठी 860 कोटी रुपये.
  6. कृषी विज्ञान केंद्राच्या बळकटीकरणासाठी 1202 कोटी रुपये.
  7. नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनासाठी 1115 कोटी रुपये.

डिजिटल कृषी मिशन : या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये शेतकऱ्यांची नोंदणी करणे, जमिनीची नोंदणी करणे, पिकाची माहिती अशी सर्व कामे ऑनलाईन केली जाणार आहेत यातून शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचेल.

अन्न आणि न्यूट्रिशनल सुरक्षा : याद्वारे शेतकऱ्यांना हवामान बदलाचा सामना करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणि पद्धती शिकवली जाणार आहे.

कृषी शिक्षण : याद्वारे कृषी क्षेत्रात नवीन संशोधन आणि तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

शाश्वत पशुधन : दूध उत्पादन वाढीसाठी आणि पशुपालनात आधुनिक तंत्रज्ञान वापरासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

फलोत्पादन : फळाची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करणे आणि दर्जेदार फळांचे उत्पादन घेण्यासाठी मार्गदर्शन.

कृषी विज्ञान केंद्राचे बळकटीकरण : या मिशनच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्रांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

नैसर्गिक संसाधनाचे व्यवस्थापन : पाणी जमीन आणि इतर नैसर्गिक संसाधनाचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून भर देण्यात येणार आहे.

डिजिटल कृषी मिशन म्हणजे काय?

What Is Digital Agriculture Mission

केंद्र सरकारने सुरू केलेली डिजिटल कृषी मिशन ही योजना एक महत्त्वकांक्षी योजना म्हणून ओळखली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून सध्याच्या आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या युगात कृषी क्षेत्रामध्ये देखील डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिक अधिक वापर व्हावा या हेतूने सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवले जाणार आहे. त्याबरोबरच कृषी क्षेत्राची उत्पादकता वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

Digital Agriculture Mission या डिजिटल कृषी मिशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बियाण्याची गुणवत्ता, हवामानाचा अचूक अंदाज, बाजारपेठेंची संपूर्ण माहिती, कीटकनाशकांची माहिती, अशा कृषी संबंधित संपूर्ण माहिती ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि त्यांच्या मालाला अचूक भाव मिळेल. यातून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास करणे हा मुख्य उद्देश ठेवण्यात आलेला आहे.

Digital Agriculture Mission या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना डिजिटल उपकरणे आणि शेतीची संसाधनाबद्दल माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या शेतामध्ये तंत्रज्ञानाच्या आधारावर शेती करेल आणि शेतीचा विकास करण्यास त्याला मदत होईल, जेणेकरून त्याच्या उत्पन्नात वाढ होईल आणि त्याला कोणावरही अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही, हा सरकारचा मुख्य उद्देश आहे.

डिजिटल कृषी मिशनचे उद्दिष्ट

Digital Agriculture Mission Purpose

देशातील कृषी क्षेत्राचा विकास करणे, जलस्रोतांचे योग्य व्यवस्थापन करणे, कृषी क्षेत्राची प्रगती, कृषी क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा अधिक अधिक वापर करणे. शेतीची उत्पादन क्षमता वाढवणे, जमिनीची कस वाढवणे, शेतीवरील होणारा खर्च कमी करून त्याला तंत्रज्ञानाची जोड देणे.

शेतीमध्ये नवनवीन प्रकल्प निर्माण करणे. शेतकऱ्यांचे काम कमी करून त्यांना तंत्रज्ञानाची जोड देऊन डिजिटल पद्धतीने शेती कशी करावी याचे माहिती देणे.

डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून कमी वेळात अधिकाधिक उत्पन्न कसे मिळवता येईल या संदर्भात डिजिटल कृषी मिशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माहिती दिली जाणार आहे, अशा प्रकारची उद्दिष्टे या योजनेच्या माध्यमातून ठेवण्यात आली आहेत.

Digital Agriculture Mission

डिजिटल कृषी मिशन साठी 2817 कोटी रुपये निधी मंजूर

Digital Agriculture Mission 2024 In Marathi

Digital Agriculture Mission केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी डिजिटल कृषी मिशन योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून 2817 कोटी रुपयाचा निधीही मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. शेतीमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पन्न कसे वाढवले जाईल हा या योजनेचा मुख्य उद्देश ठेवण्यात आलेला आहे.  या योजनेच्या माध्यमातून डिजिटल एग्रीकल्चर मिशनसाठी पुढाकार घेण्यात आला आहे.

डिजिटल कृषी मिशनचे फायदे

Digital Agriculture Mission Benefits

  • डिजिटल तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ होण्यास मदत होईल.
  • तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळेल.
  • शेतकऱ्यांना पिकाचे योग्य नियोजन करून नैसर्गिक आपत्तीपासून शेतीचे नुकसान देखील वाचवता येईल.
  • तंत्रज्ञानाच्या आधारे कमी कालावधीमध्ये अधिकाधिक उत्पन्न कसे घ्यावे याचीही माहिती यातून मिळणार आहे.
  • शेतकऱ्यांच्या पुढील पिढ्यांसाठी डिजिटल कृषी मिशन खूप महत्त्वाचे आहे.
  • शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाशी जोडणे अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे केंद्र सरकारने पुढाकार घेऊन डिजिटल कृषी मिशन सुरू केले आहे, जेणेकरून देशातील शेतकरी तंत्रज्ञानाची जोडून आपले उत्पादन वाढवून आर्थिक समृद्ध होऊ शकतील.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना 2024

महिलांसाठीच्या सरकारी योजना लिस्ट 

महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजना

ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2024 

जिव्हाळा योजना 2024 

 गाव तेथे गोदाम योजना 2024