EPFO- PF वरील व्याजदर कमी करण्याच्या तयारीत

तुमच्या सेविंगवर होणार परिणाम

EPFO Interest Rate : EPFO च्या सदस्याच्या व्याजदर कमी करण्याचा प्रस्ताव मार्चमध्ये समोर येऊ शकतो. आर्थिक स्थिरता कायम ठेवण्यासाठी पीएफच्या जमा रकमेवर मिळणाऱ्या व्याजदर 8.25% वरून कमी होऊन 8 ते 8.20% पर्यंत कमी केला जाऊ शकतो. मात्र निवडणुकीमुळे यावर राजकीय दबावही आणला जाऊ शकतो.

कर्मचारी भविष्य संघटनेच्या सदस्य असलेल्यांसाठी मोठी बातमी समोर आलेली आहे. एका अहवालानुसार मार्चमध्ये EPFO च्या 239 व्या केंद्रीय बोर्ड ऑफ ट्रस्टीजची बैठक होणार आहे. यामध्ये पीएफ डिपॉझिट वर मिळणारे व्याजदर कमी करण्याचा विचार आहे. सध्या पीएफ वर 8.25% व्याजदर मिळते मात्र या बैठकीमध्ये हे व्याजदर 8 ते 8.20% पर्यंत कमी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या हा अंदाज आहे आणि यावर अंतिम निर्णय या बैठकीत होऊ शकतो.

व्याजदर कमी करण्याचे कारण काय?

विकसित भारत एम्प्लॉयमेंट स्कीम अंतर्गत EPFO मध्ये नवीन सदस्य जोडले जात आहेत. यामुळे EPFO कडे जमा रक्कम वाढत आहे आणि भविष्यामध्ये आर्थिक स्थिरता कायम ठेवण्यासाठी ईपीएफओ जवळ मिनिमम फायनान्शियल बफर कायम ठेवणे आवश्यक आहे.

यामुळेच व्याजदर कमी करण्याची योजना आहे. EPFO कडे जेवढा अधिक फंड असेल तेवढेच त्याला भविष्यामध्ये आपले काम करणे सोपे जाईल. त्यामुळे व्याजदर कमी करणे एक स्थायी पाऊल मानले जात आहे.

एप्रिलमध्ये EPFO चे मोठे अपडेट

एका बाजूला व्याजदर कमी होण्याची चर्चा आहे तर दुसऱ्या बाजूला EPFO आपल्या सदस्यासाठी नवीन अपडेट ही घेऊन येत आहे. एप्रिलमध्ये ईपीएफ सदस्य यूपीआयच्या (UPI) माध्यमातून आपले पीएफची रक्कम काढू शकणार आहेत. ही रक्कम थेट त्यांच्या बँक अकाउंट मध्ये जमा केली जाणार आहे.

याबरोबरच या योजनेतील सदस्यांना काही रक्कम सुरक्षित ठेवावी लागेल आणि बाकी रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाईल. यूपीआय पिनच्या माध्यमातून ही प्रक्रिया सुरक्षित राहील आणि रक्कम बँकेच्या खात्यामध्ये आल्यानंतर एटीएम, डेबिट कार्ड किंवा इलेक्ट्रॉनिक पेमेंटच्या माध्यमातून त्याचा वापर सदस्य करू शकतील.