financial aid beyond 5 lakh for treatment of 9 critical illnesses : हृदय, यकृत आणि फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी सरकार देणार 20 लाख रुपयांची मदत

financial aid beyond 5 lakh for treatment of 9 critical illnesses : सरकारचा मोठा निर्णय

maharashtra govts big decision : राज्यात एकीकडे गरजेच्या तुलनेत आजही मेंदूमृत रुग्णाकडून अवयव दान कमी होते. त्याचबरोबर दुसरीकडे पाहायला गेले तर सरकारी मदत कमी असल्याने अवयव प्रत्यारोपणाची संख्या देखील खूप कमी झाली आहे. त्यामुळे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विविध अवयव प्रत्यारोपणासह महागड्या 9 गंभीर आजारांच्या उपचारासाठी 5 लाखांपेक्षा जास्त मदत सरकारमार्फत दिली जाणार आहे.

maharashtra govts big decision सरकारच्या या निर्णयामुळे राज्य आरोग्य विमा योजनेतील राखीव निधी आता 5 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 9 गंभीर आजारांच्या उपचारांसाठी वापरला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

maharashtra government organ transplant aid health insurance cover heart liver lung poor patients relief राज्य आरोग्य विमा योजनेतील राखीव निधी 5 लाख रुपयांवरून अधिक किमतीच्या अशा 9 गंभीर आजारांच्या उपचारासाठी वापरण्याला मंत्रिमंडळाने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत दाव्यांचा निपटारा 20 टक्के आता राज्य आरोग्य विमा सोसायटीच्या राखीव निधीत हस्तांतरित केला जाणार आहे.

maharashtra government organ transplant aid health insurance cover heart liver lung poor patients relief सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार महागड्या प्रक्रियांमध्ये यकृत, फुफ्फुस, हृदय व अस्थिमज्जा प्रत्यारोपणाचा समावेश असेल. यकृत प्रत्यारोपणासाठी 22 लाख रुपये, फुफ्फुस किंवा एकत्रित हृदय फुफुस प्रत्यारोपणासाठी 20 लाख रुपये, हृदय प्रत्यारोपणासाठी 15 लाख रुपये तर अस्थिमज्जा प्रत्यारोपणासाठी 9.5 ते 17 लाख रुपये देण्यात येणार आहेत.

त्याचबरोबर हृदयाच्या झडपांवरील ट्रान्स कॅथेटर ऐर्थिक प्लांटेशन आणि ट्रान्स कॅथेटर ऐर्थिक रिप्लेसमेंट या प्रक्रियांसाठी प्रत्येकी 10 लाख रुपयांपर्यंत खर्चाचा समावेश केला जाणार आहे. या व्यतिरिक्त टीव्हीआय आणि टीव्हीआर साठी हृदयाच्या झडपांच्या प्रक्रियेसाठी प्रत्येकी 10 लाख रुपये पर्यंत खर्च येईल.

या उपचारांमध्ये सामील असलेल्या डॉक्टर आणि सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या प्रोत्साहन भत्त्यात सुधारणा करण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. शस्त्रक्रियेचे दर, निधीचा वापर आणि रुग्णालयांना मजबूत करण्यासाठी उपाययोजनांवर लक्ष ठेवण्यासाठी आरोग्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन केली जाईल.

financial aid beyond 5 lakh for treatment of 9 critical illnesses राज्यात अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेतील रुग्णांची प्रतीक्षा यादी मोठी आहे. गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांना पैसे अभावी प्रत्यारोपण करता येत नाही. सरकारच्या या निर्णयामुळे गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांना आता अवयव प्रत्यारोपण करणे सोपे झाले आहे. त्यामुळे राज्यात अवयव प्रत्यारोपणाची संख्या वाढवण्यात मोठी मदत होणार आहे.