First candidate for Legislative Assembly announced by NCP : हे आहेत अजित दादांचे पहिले उमेदवार

 First candidate for Legislative Assembly announced by NCP : अजित दादांच्या उमेदवारीत पहिले नाव

 First candidate for Legislative Assembly announced by NCP : सध्या विधानसभा निवडणुकीची सर्वत्र जोरदार तयारी चालू आहे. विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाने आघाडी घेत रविवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या जाहीर केलेल्या यादीमध्ये 99 जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्याचबरोबर दुसरीकडे भाजपच्या पहिल्या यादीनंतर आता शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या गटात देखील चांगली खळबळ सुरू झाली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून आता कोणत्याही क्षणी उमेदवारांची पहिली यादी जाहीर होईल. दरम्यान त्यापूर्वी राष्ट्रवादीकडून उमेदवारी असेलेले जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांनी अजित पवार यांची भेट घेण्यासाठी देवगिरी बंगल्यावर गर्दी केली. राष्ट्रवादीचे नेते भरत गावित यांनी अजित पवार यांची भेट घेतली.

काय म्हणाले भरत गावीत

First candidate for Legislative Assembly announced by NCP भरत गावित यांनी देवगिरी बंगल्यावर जाऊन अशोक पवार यांची भेट घेतली त्यादरम्यान ते अजित पवार यांना म्हणाले की, ‘ मला खूप आनंद झाला आहे, आज पक्षाकडून नवापूर मतदार संघासाठी उमेदवारी मिळाली आहे. अजित पवार यांनी मला अनेक सूचना केल्या आहेत. २४ तारखेला मी उमेदवारी अर्ज भरणार आहे. त्याकरिता सुनील तटकरे हे उपस्थित राहणार आहेत. माझे वडील माणिकराव गावित हे केंद्रीय मंत्री होते. त्यांनी सलग 9 वेळा निवडणूक लढवली आहे. मी आदिवासी सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन आहे. त्यामुळे मला अजित पवार यांनी वेळोवेळी मदत केली आहे. काँग्रेस पक्षाचं आव्हान मला वाटत नाही, माझा जनसंपर्क मोठा आहे. आज अजित पवार यांनी अनेक विद्यमान आमदारांना एबी फॉर्म दिला आहे. संविधान वाचवण्यासाठी मी काम करत राहणार असं गावित यांनी म्हटलं आहे’.