गणपती प्रार्थना
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
Ganpati Bappa : सर्वांनाच माहिती आहे की गणपती बाप्पा हा बुद्धीचे देवता म्हणून ओळखला जातो. प्रत्येक कार्यात सर्वप्रथम पूजा केली जाते ती म्हणजे गणपती बाप्पाची. कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना सर्वप्रथम गणपती बाप्पा मोरया हे नावाने सुरुवात केली जाते आणि गणपतीची पूजा केली जाते. त्यानंतर आपण शुभ कार्य करण्यासाठी पुढाकार घेतो. गणपती बाप्पा हा आपल्या सगळ्यांचा लाडका बाप्पा आहे. चला तर मग आज आपण एक छोटीशी गणपतीची कथा जाणून घेऊ गणपतीला बुद्धीची देवता का म्हणतात? हे अनेकांना माहिती आहे आणि अनेकांना ही माहिती नाही आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण गणपतीच्या बुद्धीची कथा पाहू.
Ganpati Bappa गणपती बाप्पाची पूजा म्हणजे विघ्न दूर करणारे पूजा समजली जाते. म्हणजे याचा अर्थ असा की गणपतीची पूजा केल्याने पुढे होणारे कार्य सुरळीतपणे पार पडणार आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न येणार नाही यासाठीच गणपती बाप्पाला विघ्नहर्ता असे देखील नाव आहे. बाप्पाची अनेक नाव आहेत. गणपती बाप्पाला एकदंत, वक्रतुंड, लंबोदर, विनायक, गणेश अशा अनेक नावांनी ओळखलं जातं.
गणपतीला बुद्धीची देवता का म्हणतात याची एक छोटीशी कथा
Ganpatila Buddhichi Devata Ka Mhantat
Shree Ganesh पौराणिक कथेनुसार एकदा सर्व देवी देवतांवर एक मोठं संकट आलं त्यातून बाहेर कसं पडायचं याचा मार्गच कोणालाही समजत नव्हता. त्यामुळे सर्व देवी-देवता भगवान श्री शंकराकडे मदत मागण्यासाठी गेले. शंकराने गणपती आणि कार्तिकेय या आपल्या दोन्ही मुलांना या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्यास सांगितले. तेव्हा त्यावेळी दोन्ही भाऊ म्हणजेच गणपती आणि कार्तिकेय यांनी असे म्हणाले की ते ही समस्या सहज सोडवू शकतील. यामुळे भगवान शंकर द्विधा मनस्थितीत अडकले त्यांना असा प्रश्न पडला की, या आपल्या दोन्ही मुलांपैकी कोणाला ही अडचण सोडवण्यासाठी पाठवावी? यावर भगवान श्री शंकराने एक उपाय सुचवला. त्यांनी दोन्ही मुलांना सांगितले की जो पृथ्वीला प्रदक्षिणा घालून सर्वात आधी येईल तोच देवतांची समस्या सोडवील. हे ऐकताच श्री कार्तिकीय एका क्षणाचाही विलंब न करता मोरावर स्वार झाले आणि पृथ्वी प्रदक्षिणेला सुरुवात केली. गणपती बाप्पाचे वाहन तर उंदीर आहे आणि उंदीर हा मोराच्या तुलनेत कमी चालणार प्राणी आहे. उंदीर हा परिक्रमा पूर्ण लवकर पूर्ण करू शकणार नव्हता तेव्हा गणपतीने त्यांच्या बुद्धीचा वापर करून पृथ्वीला प्रदक्षिणा न घालता तिथेच बसलेल्या शंकर पार्वतीला सात प्रदक्षिणा पूर्ण केल्या. त्यावेळी भगवान शंकराने गणपतीला विचारलं की तू असे का केलेस? तेव्हा गणपती म्हणाला की, आई वडिलांच्या चरणांपाशी संपूर्ण जग आहे मग पूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा घालण्याची काय गरज यासाठीच मी पृथ्वी एवजी तुम्हाला प्रदक्षिणा घातली. हे गणपतीचे उत्तर ऐकून शंकराने पार्वती खुश झाले आणि त्यांनी देवांवरचं संकट दूर करण्यासाठी गणपती बाप्पाची निवड केली. यामुळेच गणपती बाप्पाला बुद्धीची देवता असे म्हणले जाते.