Ganpatichi Aarti Sangrah Marathi : गणपतीच्या आरत्या
Ganpatichi Aarti Sangrah Marathi नमस्कार वाचकहो, गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया कोणत्याही आरतीची सुरुवात करताना सर्वप्रथम गणपती बाप्पाची आरती म्हणली जाते. तर आज आपण गणपतीच्या सर्व आरत्या या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. खाली गणपतीच्या काही आरत्या दिलेल्या आहेत त्याचबरोबर गणपती श्लोक देखील आहे.
ठळक मुद्दे
गणपती आरती संग्रह मराठी
Ganpatichi Aarti Sangrah Marathi
(गणपतीची आरती) सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची
(गणपतीची आरती) जय देव जय देव जय मंगलमूर्ती
(गणपतीची आरती) शेंदूर लाल चढायो
(श्री गणेशजी की आरती) जय गणेश, जय गणेश, जय गणेश देवा।
घालिन लोटांगण
Ghalin Lotangan Aarti
गणपती श्लोक
Ganapati Shlok
सदा सर्वदा योग तुझा घडावा
Ganesh Shloka Sada Sarvada
Upasanela Drudh Chalavave
Kailash rana shiv chandra mauli
Udala udala kapi to udala
Morya Morya Mee Bal Tanhe
Jya jya thikani man jay maze
Alankapuri punyabhumi pavitra
गणपती आरती संग्रह मराठी
Ganpatichi Aarti Sangrah Marathi
(गणपतीची आरती) सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची |
नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची |
कंठी झळके माळ मुक्ताफळाची || १ ||
जय देव जय देव जय मंगलमूर्ती |
दर्शनमात्रे मनकामना पुरती ||
रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा |
चंदनाची उटी कुंकुमकेशरा |
हिरे जडित मुकुट शोभतो बरा |
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया || 2 ||
लंबोदर पितांबर फनी वरवंदना |
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना |
दास रामाचा वाट पाहे सदना |
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना |
जय देव जय देव जय मंगलमूर्ती |
दर्शनमात्रे मनकामना पुरती || ३ ||
(गणपतीची आरती) जय देव जय देव जय मंगलमूर्ती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
तुझे गुण वर्णाया मज कैंची स्फूर्ती ॥ ध्रु० ॥
नानापरिमळ दूर्वा शमिपत्रें ।
लाडू मोदक अन्नें परिपूरित पातें ।
ऐसें पूजन केल्या बीजाक्षरमंत्रें ।
अष्टहि सिद्धी नवनिधि देसी क्षणमात्रें ॥१॥
तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती ।
त्यांची सकलहि पापें विघ्नेंही हरती ॥
वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती ।
सर्वहि पावुनि अंती भवसागर तरती ॥ जय देव० ॥ २ ॥
शरणागत सर्वस्वे भजती तव चरणीं ।
कीर्ति तयांची राहे जोंवर शाशितरणी ॥
त्रैयोक्यों ते विजयी अद्भुत हे करणी ।
गोसावीनंदन रत नामस्मरणीम ॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
तुझे गुण वर्णाया मज कैंची स्फूर्ती ॥३॥.
(गणपतीची आरती) शेंदूर लाल चढायो
जय जयजी गणराज विद्या सुखदाता ।
धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥ ध्रु० ॥
शेंदुर लाल चढायो अच्छा गजमुखको ।
दोंदिल लाल बिराजे सुत गौरीहरको ॥
हाथ लिये गुडलड्डू साई सुरवरको ।
महिमा कहे न जाय लागत हूँ पदको ॥१॥
अष्टी सिद्धी दासी संकटको बैरी ।
विघ्नविनाशन मंगलमूरत अधिकाई ॥
कोटीसुरजप्रकाश ऐसी छबि तेरी ।
गंडस्थलमदमस्तक झुले शशिबहारी ॥जय० ॥२॥
भावभगतिसे कोई शारणागत आवे ।
संतति संपति सबही भरपूर पावे ।
ऐसे तुम महाराज मोको अति भवे ।
गोसावीनंदन निशिदिन गुण गावे ॥ जय० ॥३॥
(श्री गणेशजी की आरती) जय गणेश, जय गणेश, जय गणेश देवा।
जय गणेश, जय गणेश, जय गणेश देवा।
माता जाकी पार्वती, पिता महादेवा॥ x2
एकदन्त दयावन्त, चार भुजाधारी।
माथे पर तिलक सोहे, मूसे की सवारी॥ x2
(माथे पर सिन्दूर सोहे, मूसे की सवारी॥)
पान चढ़े फूल चढ़े, और चढ़े मेवा।
(हार चढ़े, फूल चढ़े, और चढ़े मेवा।)
लड्डुअन का भोग लगे, सन्त करें सेवा॥ x2
जय गणेश, जय गणेश, जय गणेश देवा।
माता जाकी पार्वती, पिता महादेवा॥ x2
अँधे को आँख देत, कोढ़िन को काया।
बाँझन को पुत्र देत, निर्धन को माया॥ x2
‘सूर’ श्याम शरण आए, सफल कीजे सेवा।
माता जाकी पार्वती, पिता महादेवा॥ x2
(दीनन की लाज राखो, शम्भु सुतवारी।
कामना को पूर्ण करो, जग बलिहारी॥ x2)
जय गणेश, जय गणेश, जय गणेश देवा।
माता जाकी पार्वती, पिता महादेवा॥ x2.
घालिन लोटांगण
Ghalin Lotangan Aarti
घालीन लोटांगण वंदीन चरण ।
डोळ्यांनी पाहिन रूप तुझे ।
प्रेमें आलिंगीन आनंद पूजन ।
भावे ओवाळिन म्हणे नामा ।।
त्वमेव माताच पिता त्वमेव ।
त्वमेव बन्धु: सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव ।
त्वमेव सर्वं मम देवदेव ।।
कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा ।
बुध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् ।
करोमि यद्यत् सकलं परस्मै ।
नारायणायेती समर्पयामि ।।
अच्युतं केशवं राम नारायणम्
कृष्णदामोदरं वासुदेवं भजे।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभम्
जानकीनायकं रामचंद्र भजे ।।
हरे राम हरे राम राम राम हरे हरे
हरे कृष्ण हरे कृष्ण कृ्ष्ण कृ्ष्ण हरे हरे ।।
।। मंगलमुर्ती मोरया ।।
।। गणपतिबाप्पा मोरया ।।
गणपती श्लोक
Ganapati Shlok
सदा सर्वदा योग तुझा घडावा
Ganesh Shloka Sada Sarvada
सदा सर्वदा योग तुझा घडावा |
तुझे कारणी देह माझा पडावा ||
उपेक्षु नको गुणवंता अनंता |
रघुनायका मागणे हेचि आतां ||१||
Upasanela Drudh Chalavave
उपासनेला दृढ चालवावें|
भूदेव संताशी सदा नमावें ||
सत्कर्म योगे वय घालवावें |
सर्वामुखी मंगल बोलवावें ||२||
Kailash rana shiv chandra mauli
कैलासराणा शिव चंद्रमौळी |
फणिंद्र माथा मुकुटी झळाळी ||
कारुण्य सिंधू भवदुःखहारी |
तुजवीण शंभो मज कोण तारी ||३||
Udala udala kapi to udala
उडाला उडाला कपि तो उडाला |
समुद्र उलटोनी लंकेशी गेला ||
लंकेशी जाऊनी चमत्कार केला |
नमस्कार माझा त्या मारूतीला ||४||
Morya Morya Mee Bal Tanhe
मोरया मोरया मी बाळ तान्हें |
तुझीच सेवा करु काय जाणे ||
अन्याय माझे कोट्यानुकोटी |
मोरेश्वरा बा तू घाल पोटी ||५||
Jya jya thikani man jay maze
ज्या ज्या ठिकांणी मन जाय माझे |
त्या त्या ठिकांणी निजरूप तुझे ||
मी ठेवितो मस्तक ज्या ठिकांणी |
तेथे तुझे सदगुरू पाय दोन्ही ||६||
Alankapuri punyabhumi pavitra
अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र |
तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र ||
तया आठविता महापुण्यराशी |
नमस्कार माझा सदगुरू ज्ञानेश्वराशी ||७||