Government Scheme 2025 In Marathi : पंतप्रधान मोदींनी सुरू केली नवी योजना
Government Scheme 2025 In Marathi : केंद्र सरकारकडून राज्याच्या विकासासाठी विविध योजनांची घोषणा करण्यात येते. त्याची अंमलबजावणी ही प्रभावीपणे करण्यात येते. या योजनेचा भाग म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठी घोषणा केली आहे.
या घोषणे अंतर्गत त्यांनी तरुणांसाठी एक योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत तरुणांना दर महिन्याला 1000 रुपये मिळणार आहेत.
Government Scheme 2025 देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या तरुणांसाठी एक मोठे गिफ्ट दिले आहे. मोदींनी संवाद कार्यक्रमाद्वारे तरुणांशी संवाद साधला. हा कार्यक्रम ऑनलाईन आयोजित करण्यात आला होता.
Government Scheme या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी बिहारमधील हजारो तरुणांशी संवाद साधला यावेळी त्यांनी 62000 कोटी रुपयांपेक्षा अधिक प्रकल्पाचे उद्घाटन केले. अनेक योजनांची सुरुवात केली.
Bihar Scheme for Youth पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत मुख्यमंत्री स्वयं सहायता भत्ता योजना असे या योजनेचे नाव देण्यात आले आहे.
याद्वारे तरुणांना आर्थिक मदत करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत तरुणांना दर महिन्याला 1000 रुपये रक्कम दिली जाणार आहे.
काय आहे योजना
Bihar Scheme for Youth पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या योजनेअंतर्गत 5 लाख तरुणांना दर महिन्याला आर्थिक मदत करण्यात येणार आहे. पुढील 2 वर्षासाठी ही रक्कम दिली जाणार आहे. याबरोबरच तरुणांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. राज्यातील बेरोजगार तरुणांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे. बेरोजगारी कमी करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
स्टुडन्ट क्रेडिट कार्ड
Bihar Scheme for Youth पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टुडन्ट क्रेडिट कार्ड योजना ची सुरुवात केली आहे. या योजनेच्या माध्यमातून तरुणांना 4 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. हे संपूर्ण कर्ज विना व्याज असेल.
हे कर्ज विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी देण्यात येणार आहे. यामुळे 3.92 लाख विद्यार्थ्यांना फायदा होणार असून या योजनेअंतर्गत 7880 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात येणार असल्याची माहिती ही यावेळी देण्यात आली. ज्यामुळे बेरोजगारी कमी करण्यास मदत होणार आहे.