Government Schemes For Farmers In Marathi : या आहेत महत्वाच्या योजना
Government Schemes For Farmers 2025 In Marathi : भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे मोठे योगदान आहे. या शेतकऱ्यांचा विकास होण्यासाठी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध कल्याणकारी योजना चालवल्या जातात.
नुकताच 23 डिसेंबर 2025 ला किसान दिवस साजरा झाला. या दिवसाचे विशेष महत्त्व म्हणजे विकसित भारत 2047 भारतीय कृषी क्षेत्राला जागतिक दर्जाचे बनवणे ही भूमिका यामध्ये ठेवण्यात आली.
Government Schemes For Farmers : चला तर मग जाणून घेऊया आज देशातील शेतकऱ्यांसाठी अशा कुठल्या योजना आहेत की ज्यामुळे शेतकरी त्या योजनेचा लाभ घेऊन आपले उत्पादन अधिक वाढवू शकतील आणि स्वतःबरोबर अध्यक्षाच्या विकासात हातभार लावू शकते.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना
PM Kisan Samman Nidhi Yojana
PM-KISAN प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना एक केंद्रीय सरकारी योजना आहे. या अंतर्गत सर्व जमीनधारक शेतकऱ्यांच्या कुटुंबाना वर्षाला 6000 रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम 2000 रुपये तीन टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट डीबीटीच्या माध्यमातून जमा केले जातात. याबरोबरच यामध्ये महाराष्ट्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना प्रमाणेच नमो शेतकरी योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये रक्कम दिली जाते.
किसान क्रेडिट कार्ड योजना
Kisan Credit Card Yojana
KCC केंद्र सरकारने या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती संबंधित आवश्यकता पूर्ण करण्यासाठी कमी व्याजदरावर या योजनेअंतर्गत कर्ज दिले जाते. याद्वारे शेतकरी बी बियाणे, खते, कीटकनाशके, अन्य आणि कृषी उपकरणे सहज पद्धतीने खरेदी करू शकते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंतचे कर्ज दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी आपल्या जवळच्या कृषी विभाग किंवा सरकारी पोर्टलवर सोप्या पद्धतीने संपर्क साधू शकतात आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
प्रधानमंत्री फसल बीमा योजना
PM Fasal Bima Yojana
PMFBY प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत शेतकऱ्यांना शेतीतील पिकांचे नैसर्गिक दुर्घटनांतून पिकाचे संरक्षण देण्याचे काम केले जाते. जर शेतकऱ्याचे पीक खराब झाले तर या योजनेअंतर्गत विमा संरक्षण प्रदान करण्यात येते.
यामध्ये शेतकऱ्यांना कमी प्रीमियम मध्ये अधिक परतावा मिळतो. शेतातील पिकाची नुकसान झाल्यास प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. जेणेकरून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये.
मृदा स्वास्थ कार्ड योजना
Soil Health Card scheme
Soil Health Card scheme या योजनेअंतर्गत शेतकरी आपल्या शेतीतील माती ची तपासणी करू शकतात. यामध्ये 12 पोषकतत्वे आहेत किंवा नाहीत याची माहिती मिळते. यामुळे मातीला आवश्यक असलेले पोषण खताच्या माध्यमातून शेतकरी देऊ शकतात आणि रासायनिक खताचा अधिक वापर होत नाही.
मृदा स्वास्थ कार्डमध्ये मातीची गुणवत्ता त्याची आवश्यकता आणि उपयुक्त पिकांची माहिती देण्यात येते. यामुळे शेतकरी योग्य पीक आपल्या शेतामध्ये घेऊ शकतो आणि कमी खताचा वापर करतो.
मृदा स्वास्थ कार्डमुळे शेतीची उत्पादन क्षमता कायम राहण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. जेणेकरून शेतीची उत्पादन क्षमता कायम टिकून राहील आणि अतिरिक्त खताचा वापर होणार नाही. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होईल हा या योजनेचा उद्देश आहे.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
PM Krishi Sinchan Yojana
PMKSY या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा योग्य वापर करणे हा आहे. या योजनेअंतर्गत ड्रीप स्पिंकलर सारख्या मायक्रो इरिगेशन प्रणाली खरेदीसाठी सबसिडी देण्यात येते. त्यामुळे शेतकरी कमी पाण्यामध्ये चांगले उत्पादन मिळू शकतात. त्याबरोबरच ड्रिप आणि स्पिंकलर खरेदीसाठी त्यांना मोठे अनुदान मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा या योजनेला मोठा पाठिंबा मिळत आहे.
प्रधानमंत्री कुसुम योजना
PM Kusum Yojana
PMKY प्रधानमंत्री कुसुम योजना अंतर्गत शेतकऱ्यांना सौर ऊर्जा वर चालणारे कृषी पंप देण्यात येतात. या योजनेअंतर्गत 30 ते 50 टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येते. शेतकरी अतिरिक्त वीज स्थानिक डिस्काउंट ला विक्रीही करू शकतात.
प्रधानमंत्री किसान मानधन योजना
PM Kisan Mandhan Yojana
PMKMY ही योजना छोट्या आणि सामंत शेतकऱ्यांसाठी स्वैच्छिक पेन्शन योजना आहे. यामध्ये 18 ते 40 वयोगटातील शेतकरी सहभागी होऊ शकतात. 60 वर्षे पूर्ण झाल्यावर शेतकऱ्यांना 3000 रुपये प्रति महिना पेन्शन दिली जाते. यामध्ये शेतकऱ्यांना ठराविक प्रीमियम वयानुसार भरावा लागतो.
ई राष्ट्रीय कृषी बाजार
Government Schemes For Farmers हे एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जो देशातील बाजार समित्यांना जोडण्यासाठी राष्ट्रीय कृषी बाजार बनवतो. याद्वारे ऑनलाईन व्यापार सहज शक्य होतो आणि पारदर्शक किंमत मिळते. यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन पिके चांगल्या दरामध्ये विक्री करता येतात.
कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंड
Government Schemes For Farmers या योजनेअंतर्गत कृषी क्षेत्रामध्ये विकास करण्यासाठी आर्थिक मदत देण्यात येते. या योजनेअंतर्गत गोदाम कोल्ड स्टोरेज पॅकेजिंग युनिट आणि कृषी उपकरणे खरेदीसाठी कमी व्याजावर कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.