Government Schemes For Women 2026 In Marathi : जाणून घेऊ योजनेची माहिती
Government Schemes For Women 2026 In Marathi : देशभरातील महिलांना सक्षम आणि आत्मनिर्भर मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना चालल्या जातात. यामुळे महिलांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी बळ मिळते. या योजनेच्या माध्यमातून महिलांना थेट आर्थिक मदत, बचतीचे विविध पर्याय आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. Government Schemes For Women
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना
Ladki Bahin Yojana
महाराष्ट्र सरकारकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार महिलांच्या खात्यात प्रत्येक महिला 1500 रुपये जमा करते. ही योजना 28 जून 2024 पासून सुरू करण्यात आलेली आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना आरोग्य पोषण आणि कुटुंबातील महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी आर्थिक मदत करणे आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वय असलेली कुठलीही महिलासाठी पात्र आहे.
पात्र महिन्याच्या खात्यामध्ये महाराष्ट्र सरकारकडून प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये जमा केले जातात. यामुळे महिला सक्षमीकरणासाठी मदत होते.
सुभद्रा योजना
Subhadra Yojana
ओडीसा सरकारकडून सुभद्रा योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर बनवणे. सुभद्रा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना प्रत्येक वर्षाला दहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम महिलांच्या खात्यामध्ये दोन टप्प्यात जमा केली जाते. या योजनेअंतर्गत एकूण अधिकतर 50 हजार रुपये पर्यंत आर्थिक मदत करण्यात येते.
सुकन्या समृद्धी योजना
Sukanya Samriddhi Yojana
सुकन्या समृद्धी योजना ही एक लोकप्रिय योजनांपैकी एक आहे. ही योजना 22 जानेवारी 2015 रोजी सुरू करण्यात आलेली आहे. ही योजना देशभरातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली महत्त्वाची योजना आहे. ही योजना बेटी बचाव बेटी पढाव अभियानांतर्गत सुरू करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत आई-वडील आपल्या दहा वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या मुलीचे नावे गुंतवणूक करू शकतात आणि मोठा परतावा मिळू शकतात. सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत चांगले व्याजदर, चांगला परतावा आणि टॅक्स मधून सूटही दिली जाते. याबरोबरच ग्यारंटेड परतावा या योजनेतून मिळतो.
लखपती दीदी योजना
Lakhapati didi yojana
महिलांना आर्थिक आत्मनिर्भर बनवण्यासाठी लखपती दीदी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून बचत गट समूहाची संबंधित असलेल्या महिलांना प्रशिक्षण आणि आर्थिक मदत करण्यात येते. यामुळे त्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते.
या योजनेचे लक्ष म्हणजे महिलांना वर्षाला एक लाख रुपये पर्यंत उत्पन्न मिळवून देणे आणि कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी वाढवणे आहे.
लखपती दीदी योजनेअंतर्गत महिलांना ड्रोन प्रशिक्षणही दिले जाते, जेणेकरून त्यांचे प्रशिक्षण घेऊन या महिला ड्रोन द्वारे आधुनिक शेतीसाठी ड्रोनचा वापर करून आपले आर्थिक उत्पन्न वाढू शकतील.