Griha Lakshmi Yojana In Marathi : गृहलक्ष्मी योजनेतून मिळणार महिलांना 2000 रुपये महिना

Griha Lakshmi Yojana In Marathi : असा करा अर्ज

Griha Lakshmi Yojana In Marathi : केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक नवीन योजना सुरू केल्या आहेत. त्याबरोबरच राज्य सरकार देखील महिलांसाठी सतत योजना राबवत असते. महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना राबवली तसेच योजना इतर राज्य सरकारने राबवली आहे.

आता कर्नाटक सरकारने देखील महिलांसाठी खास योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव आहे गृहलक्ष्मी योजना. गृहलक्ष्मी योजने अंतर्गत महिलांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेअंतर्गत थेट कुटुंबातील मुख्य महिलेच्या खात्यामध्ये 2000 रुपये ट्रान्सफर केले जातात.

Griha Lakshmi Yojana या योजनेत गरीब कुटुंबातील नागरिकांना मदत केली जाणार आहे. महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.

Griha Lakshmi Yojana Women Get 2000 Rupees या योजनेचा लाभ फक्त कर्नाटक मधील रहिवासी महिलांना मिळणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबातील फक्त एकाच महिलेला मिळेल. घरातील मुख्य महिलेच्या खात्यात गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत पैसे जमा केले जातील. महिलेचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. त्यांच्या नावावर राशन कार्ड असणे आवश्यक आहे. महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे मर्यादेपेक्षा कमी असावे. आता या योजनेचा तुम्ही अर्ज कसा कराल हे आज पाहू.

असा करा गृहलक्ष्मी योजनेचा अर्ज

Griha Lakshmi Yojana Apply Online

सर्वप्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.

त्यानंतर गृहलक्ष्मी योजनेचा पर्याय निवडा.

त्यानंतर रजिस्ट्रेशन करा. तुम्हाला आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकावा लागेल. त्यानंतर ओटीपी टाका.

त्यानंतर तुम्हाला सर्व माहिती भरावी लागेल.

महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करा आणि तुमचा अर्ज सबमिट करा.

ऑफलाईन अर्ज प्रक्रिया

Griha Lakshmi Yojana Apply Offline

जर तुम्हाला या योजनेचा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर तुम्ही जवळच्या जनसेवा केंद्रात किंवा पंचायत कार्यालयात जाऊन अर्ज करू शकता. तिथे जाऊन तुम्हाला अर्जाचा फॉर्म ऑफलाइन पद्धतीने भरावा लागेल. अर्ज सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावे लागतील आणि अर्ज संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करावा लागेल.