Gruha Lakshmi Yojana In Marathi : महिलांना सरकार देत आहे महिन्याला 2000 रुपये

Gruha Lakshmi Yojana Information In Marathi : जाणून घ्या कसा करावा अर्ज

Gruha Lakshmi Yojana In Marathi : केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळून विविध जनकल्याणकारी योजना राबवल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे कर्नाटक सरकारने सुरू केलेली गृहलक्ष्मी योजना आहे. या योजनेअंतर्गत कुटुंबप्रमुखाच्या नावावर त्याच्या बँक खात्यामध्ये एक निश्चित रक्कम ट्रान्सफर करण्यात येते. चला जाणून घेऊया या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतात. आणि किती रक्कम मिळते.

Gruha Lakshmi Yojana gets 2000 rupees by govt या योजनेअंतर्गत कुटुंबातील प्रमुख महिलेच्या नावावर रक्कम जमा करण्यात येते. जेणेकरून त्यांना घर चालवण्यासाठी आर्थिक मदत मिळू शकेल.

Griha Lakshmi Yojana या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे आणि स्वतःच्या पायावर उभे करणे. या योजनेअंतर्गत डीबीटीच्या माध्यमातून ऑनलाईन पैसे अकाउंटवर जमा करण्यात येतात. कर्नाटक सरकारकडून महिलांच्या खात्यावर 2 हजार रुपये जमा करण्यात येतात.

कोण घेऊ शकतो लाभ

Gruiha Lakshmi Yojana gets 2000 rupees by govt

कर्नाटक राज्यातील महिला या योजनेसाठी पात्र आहेत. कुटुंबातील प्रमुख महिला या योजनेसाठी अर्ज करू शकते.
कुटुंबाची आर्थिक उत्पन्न जास्त नसावे. त्या कुटुंबातील कोणीही सरकारी नोकरी करणारे नसावे व इन्कम टॅक्स भरणारे ही नसावे. महिलाचे वय 18 वर्षापेक्षा अधिक असावे आणि कुटुंबाकडे राशन कार्ड असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे

Gruha Lakshmi Yojana Documents

आधार कार्ड
रेशन कार्ड
रहिवासी प्रमाणपत्र
उत्पन्न प्रमाणपत्र
बँक पासबुक
पासपोर्ट साईजचा फोटो
मोबाईल नंबर आणि
सेल्फ असिस्टंट फॉर्म इत्यादी.

अर्ज प्रक्रिया

Gruiha Lakshmi Yojana gets 2000 rupees by govt how to apply

या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. त्यानंतर गृहलक्ष्मी योजना हा पर्याय निवडा. आता तुमच्यासमोर रजिस्ट्रेशन असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. तिथे तुमचा आधार नंबर टाका, त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओटीपी व्हेरिफिकेशन येईल ते ओटीपी भरा. त्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज ओपन होईल त्या अर्जामध्ये तुमची वैयक्तिक माहिती, बँकेची डिटेल्स, आवश्यक कागदपत्रे या अर्जासोबत अपलोड करा आणि फॉर्म सबमिट या बटनावर क्लिक करून अर्ज सबमिट करा.

ऑफलाईन अर्ज प्रक्रिया

तुम्ही आपल्या जवळच्या सीएससी केंद्रात जा किंवा तुम्ही ग्रामपंचायत कार्यालय किंवा नगरपरिषद कार्यालयात जाऊनही अर्ज प्राप्त करू शकता. अर्ज प्राप्त केल्यानंतर तुम्ही अर्जावर विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरा. त्यासोबत लागणारे कागदपत्रे सोबत जोडा. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याकडे तुमचा अर्ज जमा करा आणि त्यानंतर तुम्ही पोहोच पावती घ्यावी.