Hartalika Pooja Shubh Muhurat 2025 In Marathi : कसे आणि का आचारावे हरितालिका व्रत

Hartalika Pooja Shubh Muhurat In Marathi : जाणून घेऊ हरितालिकेचे मुहूर्त पूजेचा विधी आणि पौराणिक कथा

Hartalika Pooja Shubh Muhurat : नमस्कार महिलांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून हरितालिकेचे व्रत का करावे? त्याचबरोबर हरितालिकेची पौराणिक कथा काय आहे? यावर्षी 2025 रोजी हरतालिकेच्या पूजेचे मुहूर्त कधी आहे? याची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत.

Hartalika Pooja Shubh Muhurat भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला हरतालिकेचे व्रत केले जाते. या व्रताला महिलांसाठी विशेष महत्त्व आहे. कारण विवाहित महिला सौभाग्य, ऐश्वर्य, सुख-समृद्धी साठी हरितालिकेचे व्रत नियमितपणे करतात.

Hartalika 2025 अविवाहित मुली चांगला जोडीदार मिळावा यासाठी हे व्रत करतात. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालिकेचा उपवास केला जातो. 2025 साली हरितालिका ही 26 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे.

Hartalika 2025 in marathi हरितालिका व्रत स्त्रियांच्या अखंड सौभाग्यासाठी केले जाते. विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. तर अविवाहित मुली चांगला जोडीदार मिळावा यासाठी हे व्रत करतात. हरितालिकेच्या पूजेचा मुहूर्त काय हे आपण पाहू.

हरतालिका पूजेचे मुहूर्त

Hartalika Puja Shubh Muhurat

Hartalika Puja Shubh Muhurat हरितालिका हे व्रत भाद्रपद महिन्यातील तृतीयेच्या तिथीला असते. यावर्षी 2025 रोजी दुपारी 12 वाजून 34 मिनिटांनी हे तिथी सुरू होणार आहे. तर 26 ऑगस्टला दुपारी 1 वाजून 54 मिनिटांनी तिथी संपन्न संपणार आहे. यावर्षी हरीतालिका पूजनाचा शुभ मुहूर्त हा 26 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 5 वाजून 56 मिनिटापासून ते सकाळी 8 वाजून 31 मिनिटापर्यंत आहे.

हरतालिका पूजेचा विधी

Hartalika Puja Shubh Muhurat

हरतालिकेची पूजा करण्यासाठी सर्वप्रथम चौरंगावर लाल कापड टाकून वाळू पासून शिवलिंग बनवावे. पार्वती, गणपती आणि शंकराचे प्रतिमा तिथे ठेवावी. बाजारात हलतालिकेच्या पूजनासाठीच्या मूर्ती मिळतात. चौरंगाच्या बाजूला समयी लावावी. चौरंगावर उजव्या हाताला तांदुळापासून अष्टकमल तयार करून त्यावर कलश ठेवावा. कलशावर स्वस्तिक काढावा आणि त्यात पाणी भरावे. त्यात सुपारी, नाणे आणि हळद घालावी. त्यावर नारळ ठेवावा. मूर्तींचा अभिषेक करावा आणि त्यानंतर देवी पार्वतीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्यात. पत्री आणि फुले अर्पण करावीत. वस्त्रमाळ वहावी. निरांजनाने आरती करावी. पंचामृत, गुळ खोबरे आणि एखादा गोड पदार्थाचे नैवेद्य दाखवावा.

हरितालिकेला तुमच्या राशीनुसार या रंगाची साडी नेसा

मेष – लाल रंगाची साडी

वृषभ – पिवळ्या रंगाची साडी

मिथुन – हिरव्या रंगाची साडी

कर्क – चांदीच्या रंगाची साडी

सिंह – लाल किंवा गुलाबी रंगाची साडी

कन्या – निळ्या रंगाची साडी

वृश्चिक – गुलाबी रंगाची साडी

धनु – पिवळ्या रंगाची साडी

मकर – निळ्या रंगाची साडी

कुंभ – जांभळ्या रंगाची साडी

मीन – गुलाबी रंगाची साडी

हरतालिका व्रताची कहाणी

Hartalika Vrat Katha In Marathi

Hartalika Vrat Katha In Marathi एके दिवशी शंकरपार्वती कैलास पर्वतावर बसले होती. पार्वतीनं शंकराला विचारलं, “महाराज, सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ, असं एखादं व्रत असलं, तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा.

” तेव्हा शंकर म्हणाले, “जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णु श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणं हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते ऐक.

हे व्रत भाद्रप्रद महिन्यातला पहिल्या तृतीयेला करावं. तू लहानपणी ‘मी तुला प्राप्त व्हावे’ म्हणून मोठं तप केलंस. चौसष्ट वर्षे तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तूझ्या वडलांना फार दुःख आणि ‘अशी कन्या कोणास द्यावी?’ अशी त्याला चिंता पडली.

इतक्यात तिथं नारदमुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, “तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी. तो तिच्यायोग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुजकडे मागणी करण्यास पाठविलं आहे. म्हणून इथं मी आलो आहे.”


हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यानं ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे आले. त्यांना ही हकीकत कळविली व आपण निघून दुसरीकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या वडलांनी ती गोष्ट तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुचली नाही.

तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस, ‘महादेवावाचून मला दुसरा पती करणं नाही’ असा माझा निश्चय आहे. असे असून माझ्या वडलांनी मला विष्णूला देण्याचं कबुल केलं आहे.

ह्याला काय उपाय करावा? मग तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपास केलास. तिथं माझी लिंग पार्वतीसह स्थापिलीस. त्याची पूजा केलीस.

तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हाललं, नंतर मी तिथं आलो. तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तू म्हणालीस, “तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही,” नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो.

दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस. इतक्यात तुझे वडील तिथे आले. त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व झालेली हकीकत त्याला सांगितलीस. पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला ‘हरितालिका व्रत’ असं म्हणतात. याचा विधी असा आहे.

“ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं. केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं. पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं. षोडशोपचारे त्याची पूजा करावी. मनोभावे त्याची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं.

या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. साती जन्माचं पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं, तर त्या जन्मवंध्या व विधवा होतात असे सांगितले जाते. दारिद्र्य येतं व पुत्रशोक होतो. कहाणी केल्यावर सुवासिनींना यथाशक्ति वाण द्यावं. दुसरे दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं.”
ही साठा उत्तराची कहाणी, पांचा उत्तरी, देवाब्राह्मणाचे द्वारी, गाईचे गोठी, पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण.

हरतालिकेची आरती

Hartalika Aarti In Marathi

जय देवी हरितालिके। सखी पार्वती अंबिके। आरती ओवाळीतें।
ज्ञानदीपकळिके।। धृ.।।

हरअर्धांगी वससी। जासी यज्ञा माहेरासी।

तेथें अपमान पावसी। यज्ञकुंडींत गुप्त होसी। जय. ।।1।।
जय देवी हरितालिके। सखी पार्वती अंबिके। आरती ओवाळीतें।
ज्ञानदीपकळिके।।

रिघसी हिमाद्रीच्या पोटी। कन्या होसी तू गोमटी।
उग्र तपश्चर्या मोठी। आचरसी उठाउठी ।।जय. ।।2।।

जय देवी हरितालिके। सखी पार्वती अंबिके। आरती ओवाळीतें।
ज्ञानदीपकळिके।।

तापपंचाग्निसाधनें। धूम्रपानें अधोवदनें।
केली बहु उपोषणें। शंभु भ्रताराकारणें। ।।जय.।।3।।
जय देवी हरितालिके। सखी पार्वती अंबिके। आरती ओवाळीतें।
ज्ञानदीपकळिके।।

लीला दाखविसी दृष्टी। हें व्रत करिसी लोकांसाठी।
पुन्हां वरिसी धूर्जटी। मज रक्षावें संकटीं।। जय.।। 4।।
जय देवी हरितालिके। सखी पार्वती अंबिके। आरती ओवाळीतें।
ज्ञानदीपकळिके।।

काय वर्ण तव गुण। अल्पमति नारायण।
मातें दाखवीं चरण। चुकवावें जन्म मरण। जय. देवी।।5।।
जय देवी हरितालिके। सखी पार्वती अंबिके। आरती ओवाळीतें।
ज्ञानदीपकळिके।।