How Much Refund Will You Get If You Cancel Your Vande Bharat Sleeper Train Ticket : वंदे भारत स्लीपर रेल्वेचे तिकीट कॅन्सल केले तर किती मिळणार रिफंड?

How Much Refund Will You Get If You Cancel Your Vande Bharat Sleeper Train Ticket : वाचा सविस्तर

How Much Refund Will You Get If You Cancel Your Vande Bharat Sleeper Train Ticket : वंदे भारत स्लीपर रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी जर प्रवासाच्या 72 तासापूर्वी तिकीट रद्द केले तर त्यांना 75 टक्के रिफंड मिळणार आहे. याव्यतिरिक्त जर प्रवाशांनी 72 तासा नंतर तिकीट रद्द केले तर अशा स्थितीमध्ये त्यांना किती रिफंड मिळेल चला जाणून घेऊ.

भारतीय रेल्वे द्वारे प्रवाशांना अधिक सुविधा देण्याच्या उद्देशाने वंदे भारत स्लीपर रेल्वेची सुरुवात करण्यात आली आहे. या रेल्वेच्या तिकीट संदर्भात यापूर्वीच माहिती देण्यात आली आहे. मात्र आता रेल्वेने कॅन्सलेशन आणि रिफंड संबंधित नियमही जाहीर केले आहेत.

जर तुम्हीही वंदे भारत स्लीपर रेल्वेने प्रवास करण्याचे विचार करत असाल तर हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे की या रेल्वेचे तिकीट कॅन्सल करण्यानंतर तुम्हाला किती चार्ज दंड म्हणून भरावा लागेल.

वंदे भारत स्लीपर रेल्वे तिकीट कॅन्सलेशन नियम

How Much Refund Will You Get If You Cancel Your Vande Bharat Sleeper Train Ticket

भारतीय रेल्वे द्वारे प्रीमियम ओर नाईट सेवा साठी चालू करण्यात आलेल्या वंदे भारत स्लीपर रेल्वेचे तिकीट त्याच्या कॅन्सलेशन आणि रिफंड संदर्भात नियम व अटी प्रसिद्ध केले आहेत. या अंतर्गत जर प्रवाशांनी कन्फर्म तिकीट काढले आहे आणि प्रवासाच्या काही तासापूर्वी त्यांना हे तिकीट कॅन्सल करायचे आहे तर त्यांना किती चार्ज लागेल याची माहिती देण्यात आली आहे.

किती द्यावा लागेल चार्ज

वंदे भारत स्लीपर रेल्वेचे तिकीट कॅन्सलेशन आणि रिफंड संदर्भातील नियमानुसार जर प्रवासाने रेल्वे निघण्याचा 72 तासापूर्वी तिकीट कॅन्सल केले तर तिकिटाच्या पैशाची 25% रक्कम कपात करून बाकीची रक्कम रिफंड करण्यात येईल.
मात्र जर प्रवासाने रेल्वे निघण्याच्या 8 ते 72 तास च्या आधी जर टिकीट कॅन्सल केले तर किराया मध्ये 50% रक्कम कपात करण्यात येणार आहे आणि 50% रक्कम परत केली जाणार आहे.

8 तासापूर्वी तिकीट कॅन्सल केल्यास नाही मिळणार रिफंड

जर प्रवाशांनी रेल्वे निघण्याचा 8 तासापूर्वी तिकीट कॅन्सल केले नाही आणि त्यानंतर जर तिकीट कॅन्सल केले तर त्यांना रिफंड मिळणार नाही.
म्हणजे जर तुम्ही वंदे भारत स्लीपर रेल्वे मध्ये प्रवास करण्याची प्लॅनिंग करत असाल तर एकदा तिकीट बुक झाल्यानंतर जर तुम्ही तिकीट कॅन्सल करत असाल तर या गोष्टी तुम्ही आधी लक्षात घ्या की, रेल्वे निघण्याच्या 8 तासापूर्वी जर तुम्ही तिकीट कॅन्सल केले तर तर तुम्हाला काही रक्कम मिळू शकते. मात्र रेल्वे निघण्याच्या 8 तासात जर तुम्ही तिकीट कॅन्सल केले तर अशा स्थितीमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा रिफंड रेल्वे कडून देण्यात येणार नाही.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील पहिल्या वंदे भारत स्लीपर रेल्वेला हिरवा कंदील दाखवला. शनिवारी हावडा आणि कामाख्या दरम्यान वंदे भारत स्लीपर रेल्वेची सुरुवात करण्यात आली आहे.