how to find out where your aadhaar has been used using the new aadhaar app : नवीन आधार ॲपद्वारे जाणून घ्या
how to find out where your aadhaar has been used using the new aadhaar app : आधार कार्डच्या सुरक्षा संदर्भात सर्वांना चिंता असते. मात्र आता नवीन आधार ॲप द्वारे तुम्ही आधार कार्ड चा वापर कुठे कुठे केला आहे हे जाणून घेणे खूप सोपे झाले आहे. नवीन ॲप मध्ये Auth History हा पर्याय निवडून तारीख, वेळ आणि ठिकाण ची माहिती मिळते. येथे तुम्हाला आधार अथेंटिकेशन करता येते. हे ॲप हिंदी, इंग्रजी सह14 भाषेमध्ये उपलब्ध आहे.
आधार कार्ड च्या सुरक्षे संदर्भात अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. कारण यामध्ये संपूर्ण माहिती असते आणि जर ते चुकीच्या व्यक्तीच्या हाती लागले तर तुमचे बँक अकाउंट आणि अन्य सेन्सिटिव्ह डेटा पर्यंत पोहोचण्याचा मार्ग बनतो. अशा स्थितीमध्ये आपल्या आधारचा कधी आणि कुठे वापर होत आहे हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे असते.
या दरम्यान ही माहिती UIDAI च्या वेबसाईटवर माय आधार ॲप द्वारे काही माहिती दिल्यानंतर दिसत होती. मात्र आता नवीन आधार ॲपचा वापर करूनही ही माहिती तुम्हाला मिळवता येणार आहे. नवीन ॲप मध्ये ही माहिती पाहणे खूप सोपे झाले आहे. नवीन ॲप मध्ये एका क्लिकवर तुम्ही आधार अथेंटिकेशन हिस्टरी चेक करू शकता. याद्वारे तुम्हाला तात्काळ तुमच्या आधारचा वापर कुठे कुठे झाला आहे हे पाहता येईल.
कसे कळेल कुठे वापरले आहे आधार
how to find out where your aadhaar has been used using the new aadhaar app
सर्वात प्रथम तुम्ही आधार चे नवीन ॲप डाऊनलोड करा. त्यानंतर स्क्रीन स्क्रोल करा. यानंतर तुम्हाला अनेक सेवेचे पर्याय दिसतील. त्यातील तुम्हाला auth history हा पर्याय निवडायचा आहे. आता तुम्हाला पुढील स्क्रीनवर पूर्ण लिस्ट दिसेल. तेथे तुम्हाला तारीख, वेळ आणि ठिकाण दिसेल जिथे तुम्ही आधार अथेंटिकेशन केले आहे.
नवीन आधार ॲप मध्ये विशेष काय
how to find out where your aadhaar has been used using the new aadhaar app
नवीन आधार ॲप मध्ये अनेक सुरक्षेचे विचार देण्यात आले आहेत. तिथे तुम्हाला एका क्लिकवर आधारचा क्यूआर कोड शेअर करता येतो. हे ॲप असल्यामुळे तुम्हाला सतत फिजिकल आधार कार्ड सोबत ठेवण्याची आवश्यकता नाही. आधार कार्ड संबंधित जवळपास सर्व सेवा या ॲपवर सुरक्षित पद्धतीने उपलब्ध आहेत या ॲपचा वापर तुम्ही हिंदी, इंग्रजी सह एकूण 14 भाषांमध्ये करू शकता यामध्ये अनेक स्थानिक भाषांचाही समावेश करण्यात आला आहे.