how to make ayushman card at home : आयुष्मान कार्ड घरी बसल्या कसे तयार करावे

how to make ayushman card at home step by step guide : चला पाहू स्टेप बाय स्टेप प्रोसेस

how to make ayushman card at home step by step guide : आयुष्मान कार्ड एक आवश्यक झालेले कार्ड आहे. या कार्डद्वारे गरजू लोक 5 लाख रुपये पर्यंत मोफत उपचार घेऊ शकतात. जर तुम्हालाही आयुष्यमान कार्ड बनवायचे आहे तर तुम्हाला कुठल्याही सरकारी कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घरबसल्या आयुष्यमान कार्ड बनवू शकता चला जाणून घेऊया प्रक्रिया.

आज प्रत्येकासाठी आयुष्मान कार्ड असणे खूप गरजेचे झाले आहे. या कार्डद्वारे सरकारकडून आपल्याला 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार कुठल्याही रुग्णालयामध्ये घेता येतात. तसेच हे कार्ड तयार करण्यासाठी कुठलेही सरकारी कार्यालयात किंवा पैसे खर्च करायची आवश्यकता नाही ते मोफत बनवता येते. आयुष्मान कार्ड साठी जास्त काही कागदपत्रही लागत नाहीत.

आयुष्मान कार्डसाठीची कागदपत्रे

Ayushman Card Documents

आधार कार्ड
रेशन कार्ड
इन्कम प्रूफ
श्रमिक रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट
आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर

आयुष्यमान ॲप द्वारे कसे बनवावे कार्ड

Ayushman Card App

सर्वात प्रथम तुम्हाला प्ले स्टोअर वर जाऊन आयुष्मान ॲप डाऊनलोड करायचे आहे.
ॲप डाऊनलोड झाल्यानंतर लॉगिन अँड बेनिफिशरी हा पर्याय निवडायचा आहे.
नंतर कॅपच्या भरायचा आहे आणि रजिस्टर मोबाईल नंबर टाकायचा आहे.
त्यानंतर तुमच्या आधारशी रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो तुम्ही तिथे टाका.
त्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल तिथे तुम्हाला स्कीम आणि सब स्कीम PMJAY आणि तुमचे राज्य नाव नोंदवा.
त्यानंतर सर्च बाय असलेल्या पर्यायावर क्लिक करा.
तुम्हाला आधार नंबर, फॅमिली आयडी किंवा रेशन कार्ड नंबर टाकावा लागेल.
त्यानंतर कॅपच्या कोड भरा जर तुम्ही पात्र असाल तर या योजनेअंतर्गत कार्ड बनवू शकाल.
त्यानंतर तुम्हाला ई-केवायसी करावी लागेल.
ई-केवायसी झाल्यानंतर तुमचे आयुष्यमान कार्ड डाउनलोड करू शकता.
अशा सोप्या पद्धतीने तुम्ही आयुष्मान कार्ड घरबसल्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून बनवू शकता.

कोनाला नाही मिळणार कार्डचा फायदा

Ayushman Card Non Eligibility

आयुष्मान कार्डची सुरुवात विशेष करून गरीब आणि गरजवंत लोकांसाठी करण्यात आली आहे. या योजनेचा फायदा असे लोक घेऊ शकतात जे असंघटित क्षेत्रामध्ये काम करतात किंवा जे लोक इन्कम टॅक्स भरत नाहीत. याबरोबरच जर ESIS चा लाभ घेत असाल किंवा पगारीतून पीएफ कटत असेल तरीही तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत. याबरोबरच सरकारी नोकरी करणारेही या कार्डचा लाभ घेऊ शकणार नाहीत.