HSC 12th Board Exam Online Hall Ticket Download In Marathi : या पद्धतीने करा डाऊनलोड
HSC 12th Board Exam Online Hall Ticket Download : विद्यार्थ्यांची दहावी आणि बारावीची परीक्षा अगदी तोंडावर आलेली आहे. आता प्रत्येक विद्यार्थ्याला हॉल तिकीट कधी मिळणार असा प्रश्न पडला आहे. ते हॉल तिकीट आता विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने डाऊनलोड करता येणार आहे.
HSC Board Exam महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. बारावीच्या फेब्रुवारी -मार्च 2026 मध्ये होणाऱ्या लेखी परीक्षांपूर्वी विद्यार्थ्यांना हॉल तिकीट 12 जानेवारी 2026 पासून उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
ही परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च पर्यंत असणार आहे. बारावी परीक्षेसाठी ऑनलाईन हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे याची संपूर्ण माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
मंडळाच्या माहितीनुसार बारावी बोर्ड ची लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी 2026 पासून 18 मार्च 2026 पर्यंत चालणार आहे. बारावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. हे ऑनलाईन पद्धत आज आपण पाहू.
संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी ही हॉल तिकीट डाऊनलोड करून त्यांचे प्रिंटआऊट विद्यार्थ्यांना द्यावे असे निर्देश देखील राज्य मंडळाकडून देण्यात आले आहेत. बारावीच्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन प्रवेश पत्र देण्यात येणार असून त्यासाठी विद्यार्थ्याकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.
मात्र शाळा किंवा ज्युनिअर कॉलेजने दिलेल्या हॉल तिकिटावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांची सही व शिक्का असणे बंधनकारक आहे. फोटो असलेल्या प्रवेश पत्रावर अधिकृत स्वाक्षरी आणि शिक्का असणे गरजेचे आहे. अन्यथा ते अवैध्य ठरले जाईल असे मंडळांनी स्पष्ट केले आहे.
परीक्षा च्या काळात परीक्षा केंद्रावर जाताना प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापले हॉल तिकीट सोबत ठेवणे बंधनकारक आहे. लेखी परीक्षेसोबतच प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी व अंतर्गत मूल्यमापन तसेच एनएससीक्यूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रात्यक्षिक परीक्षा 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2026 यादरम्यान घेण्यात येणार आहेत.
HSC Board Exam या परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळामार्फत आयोजित केल्या जाणार आहेत.
हॉल तिकीट असे करा डाऊनलोड
Maharashtra Board Class 12 Exam Hall Ticket Download Process
- सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईट www.mahahsscboard.in वर जा.
- वेबसाईट सुरू होताच एक होमपेज दिसेल त्यामध्ये तुम्हाला HSC Hall Ticket 2026 वर क्लिक करा.
- दिलेली माहिती भरून लॉगिन करा.
- स्क्रीनवर तुमचे हॉल तिकीट दिसेल.
- त्याची तपासणी करून हॉल तिकीट डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा.