HSRP Deadline In Marathi : वाहनांवर 30 नोव्हेंबर नंतर कारवाई?
HSRP Deadline In Marathi : देशभरातील सर्व वाहनांना HSRP नंबर प्लेट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत रविवारी म्हणजे आज समाप्त होणार आहे.
HSRP Deadline ज्या कोणी अजून पर्यंत आपल्या गाडीची नंबर प्लेट साठी नोंदणी केली नाही, अशांसाठी हा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यांनी लवकरात लवकर एचएसआरपी नंबर प्लेट साठी अर्ज करावा. अन्यथा त्यांना मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते.
वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट HSRP लावणे बंधनकारक केले आहे. राज्यातील अनेक वाहनधारकांनी आपल्या गाडीची नंबर प्लेट बदलून घेतली आहे.
मात्र अनेक असे ग्राहक आहे ज्यांनी आजपर्यंत एचएसआरपी नंबर प्लेट आपल्या गाडीला लावलेली नाही. अशा वाहनधारकांसाठी 30 नोव्हेंबर म्हणजेच आज शेवटचा दिवस आहे. ते आजच्या दिवसात आपल्या गाडीसाठी ची नंबर प्लेट ऑनलाइन बुक करू शकता. यानंतर सरकारकडून ज्यांनी नंबर प्लेट लावली नाही त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते.
HSRP Deadline राज्य सरकारकडून राज्यातील वाहनधारकांना HSRP नंबर प्लेट लावण्यासाठी तब्बल 5 वेळेस मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र तरीही अजून अनेक वाहनधारकांनी आपल्या गाडीला उच्च सुरक्षा नंबर प्लेट HSRP लावलेली नाही.
राज्य सरकारने ही नंबर प्लेट लावण्याची 30 नोव्हेंबर ही तारीख दिली होती. मात्र आज 30 नोव्हेंबर आहे आणि आज नंबर प्लेट ऑनलाईन बुक करण्याचे शेवटची तारीख आहे. त्यामुळे राज्यातील ज्या वाहनधारकांनी अजून पर्यंत आपल्या वाहनाला उच्च सुरक्षा नंबर प्लेट लावलेली नाही त्यांनी लवकरात लवकर ऑनलाइन जाऊन आपली नंबर प्लेट बुक करावी.
अन्यथा त्यांना कारवाईचा सामना करावा लागू शकतो. यातून दंडही केला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्हीही तुमच्या गाडीला नंबर प्लेट लावली नसेल तर लवकरच नोंदणी करा आज शेवटचा दिवस आहे.
केवळ पुणे शहराचा विचार केला तर पुणे शहरांमध्ये 24 लाख हून अधिक वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट लावणे बंधनकारक केले आहे. त्यापैकी सुमारे 9.5 लाख वाहनांनीच उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी नोंदणी केलेली आहे. 7 लाख 56 हजार 356 वाहनांना प्रत्यक्षात नंबर प्लेट लावण्यात आली आहे. तर सुमारे 15 लाख पेक्षा अधिक वाहनांना नंबर प्लेट लावल्या गेल्या नाहीत.
मात्र आता 30 नोव्हेंबर ही नोंदणीसाठी ची अंतिम तारीख आहे. जर या वाहनधारकांनी यामध्ये नोंदणी केली नाही तर त्यांना कारवाईचा सामोरे जावे लागू शकते किंवा राज्य सरकारी यामध्ये तारीख वाढवणार का हा प्रश्नही उपस्थित झाला आहे. राज्य सरकारने उच्च सुरक्षा नंबर प्लेट लावण्यासाठी ची तारीख वाढवली तर ज्या वाहनधारकांनी अजून नंबर प्लेट लावली नाही किंवा नोंदणी केली नाही यांना नोंदणी करता येऊ शकते आणि ते कारवाईपासून वाचू शकतात.