HSRP Number Plate Installation Charges In Marathi : मुदत संपल्यानंतरही HSRP नंबर प्लेट बसवता येणार का?

HSRP Number Plate Deadline Information In Marathi : वाचा सविस्तर

HSRP Number Plate Installation Charges In Marathi : HSRP नंबर प्लेट बसवणे हे प्रत्येक वाहनधारकांना बंधनकारक आहे. HSRP नंबर प्लेट बसवण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 होती. त्यानंतर अजूनही अनेक वाहनधारकांची नंबर प्लेट बसवण्यात आलेली नाही.

आता ज्यांनी नंबर प्लेट बसवली नाही त्यांनी काय करावे? त्यांना पुन्हा नंबर प्लेट बसवता येईल का? की त्यांना कोणता दंड भरावा लागेल? याची सविस्तर माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

मुदतीनंतर HSRP नंबर प्लेट बसवता येईल का?

HSRP Number Plate Deadline Information In Marathi

एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 होती. परंतु असे अनेक वाहनधारक आहेत ज्यांचे अजूनही नंबर प्लेट बसत बसवली नाही. त्यानंतर तुम्ही एचएसआरपी नंबर प्लेट बसवू शकता का की तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.

दरम्यान जर तुम्ही 31 डिसेंबर आधी HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी बुकिंग केले असेल आणि नंबर प्लेट अजून बसवली नसेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा दंड भरावा लागणार नाही. परंतु मुदतीनंतर ही तुम्ही हे काम केले नसेल तर मात्र तुम्हाला यासाठी दंड भरावा लागणार आहे.

किती भरावा लागेल दंड?

HSRP Number Plate Deadline

HSRP Number Plate एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात आलेली नाही. त्यामुळे ज्या वाहनधारकांनी अजूनही नंबर प्लेट इन्स्टॉल केली नाही त्यांना दंड भरावा लागणार आहे.

सुरुवातीला हा दंड 1000 रुपये निश्चित करण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्यांदा पुन्हा तुमच्याकडून तीच चूक घडली तर तुम्हाला 5000 ते 10,000 रुपये पर्यंत दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक वाहनधारकांनी नंबर प्लेट बसवणे बंधनकारक आहे.

नंबर प्लेट बसवण्यासाठी खर्च किती

HSRP Number Plate Installation Charges

वेगवेगळ्या वाहनांसाठी वेगवेगळी फी आहे ती कशी हे पाहू
टू व्हीलर :- 531 ते 1325 रुपये
थ्री व्हीलर ऑटो रिक्षा :- 590 रुपये
फोर व्हीलर चार चाकी वाहने :- ८७९ ते २०५० रुपये
कमर्शियल वाहने :- 1345 ते 2060 रुपये